Breaking News

Ramprahar News Team

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये वाहतूक पोलिसांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल तालुक्यात वाहतूक नियमन करणार्‍या 70 वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, राजे प्रतिष्ठान कामगार …

Read More »

महिला व बालकल्याण विभागातील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन सभापती मोनिका महानवर यांनी केले आहे. या योजनांमध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती, खेळाडूंना आर्थिक मदत तसेच मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना आर्थिक मदत या योजनांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये शिष्यवृत्ती योजनेत वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या एमबीबीएस …

Read More »

पनवेल, उरणमध्ये बाप्पाचा जयजयकार; कोरोनाच्या नियमांचे पालन करीत माघी गणेशोत्सव उत्साहात

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्रीगणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. पनवेल, उरणमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येवून गणेशजयंती साजरी करतात, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा करण्यात आला. आधी …

Read More »

अश्विनची कमाल, इंग्लंड बेहाल!; दुसर्या दिवसाखेर भारताकडे 249 धावांची आघाडी

चेन्नई : वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवसाखेर भारताने दुसर्‍या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 54 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताने 329 धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या 134 धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला 195 धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसर्‍या डावात भारताचा सलामीवीर शुबमन …

Read More »

मुंबई वगळता राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू

मुंबई : राज्यातील महाविद्यालये सोमवार (दि. 15)पासून सुरू होणार आहेत, मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये सध्या सुरू होणार नाहीत. मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विचार होणार आहे. महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय जरी राज्य सरकारने दिला असला तरी स्थानिक प्रशासन यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय …

Read More »

नवी मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 14) घडली. भूषण पवार असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. भूषण पवार रविवारी सकाळी एपीएमसी पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी सर्व्हिस …

Read More »

मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे राज्यातील जनता मेटाकुटीस -चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ‘महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळीबाभडी जनता करीत आहे, …

Read More »

कामोठ्यात माजी सैनिकांचा सन्मान; भाजप युवा मोर्चाचा उपक्रम

कामोठे : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडलतर्फे माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवारी (दि. 13) करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण 60 माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास …

Read More »

रायगडात अपघातांचे प्रमाण घटले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण घटले आहे. टाळेबंदी (लॉकडाऊन) आणि त्यामुळे वाहतुकीवर घातले गेलेले निर्बंध यास कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात 599 अपघातांची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2019च्या तुलनेत चाळीस टक्क्यांनी कमी आहे. रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असे …

Read More »

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोलीस दबावात असल्याने कारवाई होत नाहीए!, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ज्या प्रकारे ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या आहेत ते पाहता कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र या प्रकरणात पोलीस कोणत्या ना कोणत्या दबावात काम करीत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे या प्रकरणी कोणतीही कारवाई होत नाहीए, असा आरोप विधानसभेतील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकारांशी …

Read More »