Breaking News

Ramprahar News Team

पिकांना एमएसपी कायम राहणार; पंतप्रधान मोदींची ग्वाही; शेतकरी नेत्यांना चर्चेचे निमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पिकांना एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत कायम राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 8) संसदेत बोलताना दिली. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी कोरोनापासून ते केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांबद्दल अनेक गोष्टींवर भाष्य केले. सुधारित कृषी कायद्यांवरून …

Read More »

‘भारतरत्नांची चौकशी करणारे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत’

मुंबई : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणार्‍या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्विट करणार्‍या भारतातील सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात …

Read More »

दीड शहाण्यांना चोख उत्तर

देशविरोधी कारवाया, शेतीच्या क्षेत्रातील सुधारणा, कोरोना काळातील शर्थीचे प्रयत्न, परदेशी गुंतवणूक अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारे पंतप्रधानांचे सोमवारचे संसदेतील भाषण लोकशाही व्यवस्थेतील एक महत्त्वाचे भाषण मानायला हवे. त्या भाषणात काय नव्हते? देशाबद्दल वाटणारी आत्मीयता, गरिबांबद्दलची तळमळ, देशविघातक वृत्तींबद्दलची चीड, विरोधकांच्या टीकेचा स्वीकार करणारी खिलाडूवृत्ती, ऐक्याचे आवाहन असे सारेच रंग पंतप्रधानांच्या …

Read More »

जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत नागोठण्यातील खेळाडूंचे यश

नागोठणे : प्रतिनिधी खारघर येथे झालेल्या जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत येथील सुपर डायमंट मार्शल आर्ट कराटे क्लासचे सर्वेसर्वा, मास्टर धनंजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना नागोठण्यातील खेळाडूंनी सब-ज्युनियर, ज्युनियर, सिनियर, वुशू अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धकांना जगताप तसेच गौरव राऊत, आदित्य जाधव, रोहन रोडेकर, अक्षय मांडवकर यांचे मार्गदर्शन मिळाले होते. …

Read More »

चेन्नई कसोटी रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी 381 धावांची, तर इंग्लंडला नऊ बळींची गरज

चेन्नई : वृत्तसंस्था इंग्लंडने दिलेल्या 420 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाखेर भारतीय संघाने एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाला शेवटच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 381 धावांची गरज आहे, तर इंग्लंड संघाला ऐतिहासिक नऊ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल …

Read More »

माणगावमध्ये लग्नघरी पापड-फेण्यांची परंपरा

माणगाव : सलीम शेख सण, उत्सव वा घरगुती सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या लग्नी पापड, फेण्यांची परंपरा माणगावात आजही जपली जात असून, ग्रामीण संस्कृतीची ओळख असणारी ही परंपरा आजही टिकून आहे.ग्रामीण भागातील लग्न म्हणजे संपूर्ण गावाचा सोहळा असतो. लग्न समारंभाच्या तयारीसाठी गावातील बहुसंख्य लोक यजमानांना मदतीचा हात देतात. यामध्ये महिलांचे प्रमाण …

Read More »

‘सागरमाला’ अंतर्गत मुंबई-काशीद जलवाहतूक

सागरमाला योजनेअंतर्गत काशीद येथे मोठी जेट्टी विकसित करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी 112कोटींचा निधी प्राप्त झाल्याने सध्या जेट्टी उभारणीच्या कामाने वेग घेतला आहे. डिसेंबर 2021अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून देण्यात आली आहे. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनार्‍याचा आंतरराष्ट्रीय ठिकाणात समावेश झाल्याने येथे दरवर्षी …

Read More »

शेळ्या-मेंढ्या अपहरणप्रकरणी खालापुरातील गोशाळाचालकावर गुन्हा दाखल

खोपोली : प्रतिनिधी पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या शेळ्या-मेंढ्या संगोपनासाठी गोशाळेत दिल्या होत्या. त्या तेथून गायब केल्याप्रकरणी रणजित खंडागळे आणि चेतन शर्मा (रा. आसरेवाडी, चौक ता. खालापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पूणे द्रूतगती मार्गावरील टोल नाक्यावर काही दिवसांपुर्वी प्राणीमित्रांनी बंगलोरकडे जाणारा ट्रक अडवला होता, त्यात दाटीवाटीने 269शेळ्या मेंढ्यांची …

Read More »

पनवेल : वहाळ येथील ओम साई सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी उपसरपंच अमर पाटील, साई संस्थानचे अध्यक्ष रविशेठ पाटील, भाजप युवा मोर्चाचे …

Read More »

नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वांत मोठे ‘कलिंग’; बर्ड फ्लूमुळे तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार

नंदुरबार : प्रतिनिधी राज्यातील सर्वात मोठे कलिंग नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये होणार आहे. नवापूरमध्ये तब्बल नऊ लाख कोंबड्या मारल्या जाणार आहेत. येथे बर्ड फ्लूचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर कोंबड्या मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला या ठिकाणी एक लाखपेक्षा अधिक पक्षी मारले जाणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाने 100 पथके तैनात केली …

Read More »