Breaking News

Ramprahar News Team

एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांमुळे खंडाळा घाटक्षेत्रातही वाहतूक कोंडी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी शासकीय सुट्याचे शनिवार, रविवार व लागून आलेला  नाताळ यामुळे सलग सुट्या आल्या आहेत. या सुट्याचा लाभ व हिवाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शुक्रवार  (दि. 25) सकाळपासूनच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. खालापूर टोल …

Read More »

केगावमध्ये काँग्रेस, शेकापला खिंडार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील काँग्रेस आणि शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहिररीत्या गुरुवारी (दि. 24) प्रवेश …

Read More »

चिरनेर-खारपाडा मार्गावर गॅस टँकरचा उलटला

उरण : प्रतिनिधी चिरनेर-खारपाडा मार्गावर दिघाटी खिंडीतील वळणावर भरधाव वाहने जात असलेला (क्र. जी. जे.12 झेडझेड-6053)अवजड गॅस टँकर चालकाला वेग न सावरल्याने उलटा होऊन दुर्घटना घडली आहे. गॅस टँकर उलटल्याने त्यामधून वायू गळती सुरू झाली होती. त्यामुळे या मार्गाला लागून असलेल्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. मात्र येथील नागरिकांच्या …

Read More »

बुलेट ट्रेन विरुद्ध मेट्रो!

अहमदाबाद ते मुंबई अशी अतिवेगवान बुलेट ट्रेन सुरू करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे जुने स्वप्न आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि अहमदाबाद हे देशातील एक महत्त्वाचे व्यापार केंद्र या दोन्ही शहरांना अतिजलद रेल्वेसेवेच्या माध्यमातून जोडण्याचा हा महाप्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना फायदेशीरच आहे हे सांगावयास कुण्या ज्योतिष्याची गरज …

Read More »

सिद्धिविनायक सोसायटीतील रहिवाशांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर आणि सभापती संतोष शेट्टी यांचे आभार

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सिध्दीविनायक सोसायटीला अनेक वर्षांनी  ना हरकत दाखला मिळाल्याने त्यांना पाण्याचे कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तेथील रहिवाश्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांचे गुरुवारी (दि. 24) आभार मानले. नवीन पनवेल सेक्टर 6 मध्ये सिध्दी विनायक सोसायटी  विकासक राजेंद्र कालेकर …

Read More »

कोरोनामुक्तीच्या दरात वाढ; पनवेल, नवी मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात 50,452 कोरोनाबाधितांपैकी 48432 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जून महिन्यात 57 टक्क्यांवर असलेला कोरोनामुक्तीचा दर नोव्हेंबर महिन्यात 94 टक्क्यांवर पोहचला होता. यात दोन टक्क्यांनी वाढ होत आता 96 टक्के झाला आहे. तसेच पनवेल पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के एवढे असून …

Read More »

पद्मदुर्ग जागर उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा मुरूडजवळील जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्यावर मंगळवारी (दि. 22) पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती वतीने  शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘पदमदुर्ग जागर‘ करण्यात आला. छत्रपती शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रात पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला आहे. या किल्ल्यावर पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीच्या माध्यमातून …

Read More »

रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू; रविवारी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद

अलिबाग : प्रतिनिधी करोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन तसेच पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनानेदेखील हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर कडक निर्बंध घालण्याचे ठरविले आहे. करोना विषयक नियमांचे उल्लघन करणार्‍या हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6वाजेपर्यंत संचारबंदी लागू …

Read More »

कंत्राटी कामगारांना संरक्षण द्या : अन्यथा जनआंदोलन; मुरूड भाजपचा महावितरणला इशारा

मुरूड : प्रतिनिधी महावितरण कंपनीने कंत्राटी कामगारांना तातडीने संरक्षक प्रावरणे द्यावीत, अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे मुरुड तालुका माजी उपाध्यक्ष महेश मानकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन महावितरण कंपनीचे मुरूड येथील उप कार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांना देण्यात आले. या वेळी भाजप शहर …

Read More »

खोपोलीतील स्वच्छता अभियानात गटारांचा अडसर

खोपोली : प्रतिनिधी  भुयारी गटार योजना लालफितीत अडकल्याने खोपोली शहरातील सर्वच गटारे उघडी आहेत. त्यातील बहुतांश गटारे तुटली असल्याने त्यातून सांडपाणी निचरा होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सदासर्वकाळ खोपोली शहरातील गटारे तुंबलेल्या स्थितीत आहेत. त्यात औषध फवारणी नियमितपणे होत नसल्याने खोपोलीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शहरात स्वच्छता सर्वेक्षण अभियान …

Read More »