Breaking News

Ramprahar News Team

पनवेल मनपाच्या विकासकामांची परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पनवेल शहरामध्ये विकासाची अनेक कामे सुुरू आहेत. या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांसह गुरुवारी (दि. 14) पाहणी केली. या वेळी त्यांनी अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. पनवेल शहरातील सावकर चौक येथे रस्ते दुरुस्ती आणि रुंदीकरण तसेच वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेच्या …

Read More »

जावयाच्या अटकेनंतर मंत्री नवाब मलिकांचा सावध पवित्रा

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेपाठोपाठ राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्जप्रकरणी अमली पदार्थविरोधी विभागाच्या (एनसीबी) पथकाने बुधवारी अटक केली. यावर मलिक यांनी सावध भूमिका घेतली आहे. ड्रग्जप्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई करण्यात आल्यानंतर समीर खान यांचे …

Read More »

कोरोना काळात भारताकडून उच्च संस्कृतीचे दर्शन; आमदार प्रशांत ठाकूर यांचे उद्गार; विशेषांकाचे प्रकाशन

खालापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीमध्ये संस्कृती, प्रकृती आणि विकृती हे होत असताना भारताने महामारीवर रामबाण हायड्रोक्लोरीन गोळी देऊन जगाला आपली संस्कृती उच्च असल्याचे दाखवून दिले, असे उद्गार भाजपचेे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली येथे काढले. खालापूर तालुका देशमुख मराठा समाजाच्या वतीने आणि सूर्यकांत देशमुख यांच्या संकल्पनेतून …

Read More »

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर -पवार

मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी केलेला खुलासा यामुळे राज्यातील राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान; प्रशासन सज्ज

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 15) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील व सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 10 …

Read More »

गुड न्यूज! कोविशिल्ड लस रायगड जिल्ह्यात दाखल

अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस बुधवारी (दि. 13) रात्री रायगड जिल्ह्यात दाखल झाली. लसीच्या नऊ हजार 700 कुप्या जिल्ह्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांना लस दिली जाणार आहे. …

Read More »

पुनीत बिश्तचा विक्रमी झंझावात; 51 चेंडूंत 146 धावा

इंदूर : वृत्तसंस्था सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी (दि. 13) मेघालयाचा कर्णधार पुनीत बिश्त याने 51 चेंडूंत नाबाद 146 धावा ठोकल्या. मिझोरमविरुद्धच्या सामन्यात त्याने 17 षटकार आणि सहा चौकारांची आतषबाजी केली. टी-20 मध्ये चौथ्या स्थानावर येऊन सर्वाधिक धावा ठोकण्याच्या विश्वविक्रमाची बिश्त याच्या नावावर नोंद झाली आहे. त्याने श्रीलंकेचा …

Read More »

शुटींगबॉल स्पर्धेत यजमान रांजणखार संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धेत यजमान मॉडेल रांजणखार संघाने विजेतेपद पटकाविले. वीर बहिरीदेव स्पोर्ट्स बहिरीचापाडा संघ उपविजेता ठरला, तर तृतीय क्रमांक ए वन संघ माणकुले व चतुर्थ क्रमांक विद्युत्त मांडवखार संघाने मिळविला. मॉडेल रांजणखार संघाने 62व्या वर्षांत पदार्पण केले असून, सातत्याने स्पर्धा भरवून जिल्ह्यासह राज्यात आदर्श निर्माण …

Read More »

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा; सायना, श्रीकांत दुसर्‍या फेरीत

बँकॉक : वृत्तसंस्था स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि माजी नंबर वन किदाम्बी श्रीकांत यांनी थायलंड ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. कश्यपने मात्र मांसपेशींच्या दुखण्यामुळे सामन्यातून माघार घेतली. सायनाने मलेशियाची प्रतिस्पर्धी सेल्वादुरारे किसोना हिचा 21-15, 21-15 ने पराभव केला, तर श्रीकांतने आपलाच सहकारी सौरभ वर्मा …

Read More »

ऑस्ट्रेलियाला धक्का; दुखापतग्रस्त विल पुकोव्हस्की संघाबाहेर

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींचे ग्रहण लागले असतानाच आता यजमान संघाला दुखापतीचा फटका बसताना दिसत आहे. पदार्पणातच अर्धशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा चौथ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. तिसर्‍या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना पुकोव्हस्की जमिनीवर पडला. त्याच्या शरीराचा भार त्याच्या हातावर आला …

Read More »