Breaking News

Ramprahar News Team

खराब रस्त्यांवरून आव्हाडांचा ठाकरे सरकारला घरचा अहेर

कल्याण : प्रतिनिधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांची उणीधुणी काढताना दिसतात. त्यावरून बरीच चर्चा रंगते. अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरून ठाकरे सरकारला घरचा अहेर दिला आहे. कल्याण पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस होणार भव्य अन् संस्मरणीय; विविध समाजोपयोगी कार्यक्रमांची असणार रेलचेल

पनवेल : हरेश साठे गोरगरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 70वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदाही सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून पण …

Read More »

औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा मुद्दा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये उफाळून आला आहे. शिवसेनेकडून वारंवार नामांतराची मागणी केली जात आहे, तर काँग्रेसकडून त्यास सातत्याने विरोध दर्शविला जात आहे. आता याच मुद्द्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला धर्मनिरपेक्षतेवरून टोला लगावला आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब …

Read More »

टोकियो ऑलिम्पिकबाबत संभ्रम

टोकियो : वृत्तसंस्था लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकबाबत काहीही घडू शकते, असे मत जपानचे संसदीय मंत्री तारो कोनो यांनी मांडले आहे. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षितपणे आणि सर्वांची काळजी घेऊन टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येईल, असे संयोजन समिती आणि जपान सरकारद्वारे ठामपणे सांगितले जात असताना कोनो यांच्या वक्तव्याने मात्र ऑलिम्पिकबाबत संभ्रम निर्माण …

Read More »

धोनीचा विक्रम मोडण्यासाठी पंतला फक्त एका धावेची गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चौथ्या व अंतिम कसोटीतील पहिल्या डावात ऋषभ पंतने 23 धावांची छोटेखानी खेळी केली. यासह आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत पंतच्या नावावर 999 धावा झाल्या आहेत. कसोटीमध्ये एक हजार धावा करण्यासाठी एका धावेची गरज असतानाच तो बाद झाला. त्यामुळे धोनीच्या नावावरील विक्रम मोडण्यासाठी त्याला आता आणखी एका धावेची गरज …

Read More »

तुला परत मानला रे ठाकूर!; विराटकडून मराठमोळ्या अंदाजात शार्दुलची प्रशंसा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी सुरुवातीला काहीशी डगमगली. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली. यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. भारताकडून पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक …

Read More »

भारताचे शेपूट ऑस्ट्रेलियाला पडले भारी; शार्दुल-वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था चौथ्या व निणार्यक ब्रिस्बेन कसोटीत मराठमोळा शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांच्या भागिदारीच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत 33 धावांची आघाडी मिळाली असून, तिसर्‍या दिवसाखेर त्यांनी बिनबाद 21 धावा केल्याने एकूण आघाडी 54 …

Read More »

उरण : जासई येथील सन 1984च्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी लढ्याच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिवादन केले.

Read More »

बर्ड फ्लूमुळे मटण, मासळीला पसंती; चिकनकडे ग्राहकांची पाठ

सुधागड : रामप्रहर वृत्त बर्ड फ्लूच्या धास्तीने ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन हंगामात चिकन विक्रेते हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे मटण, मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस  आले आहेत. बर्ड फ्लूचा फैलाव राज्यातही झाला असून, त्याची लागण कोंबड्यांना सर्वाधिक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे चिकन विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. याबाबत …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात 78.80 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात एकूण 78.80 टक्के मतदान झाले. 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. 15) मतदान प्रक्रिया झाली. या निवडणुकीची मतमोजणी येत्या सोमवारी (दि. 18) होणार आहे. जिल्ह्यात 15 पैकी 10 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी होती. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. दरम्यान, …

Read More »