Breaking News

Ramprahar News Team

हिंदुत्वाची नवी ऊर्मी

याआधी काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून गाजलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील खासदारकी न मिळाल्यामुळे काँग्रेसला रामराम करून तडक शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांना कबूल केल्याप्रमाणे खासदारकी बहाल केली. दक्षिणेतील खुशबू सुंदर या अभिनेत्रीचा प्रवासदेखील अशाच प्रकारे डाव्या विचारसरणीकडून उजव्या विचारसरणीकडे झाला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील खासदारकी न मिळाल्यामुळे फार काळ वाट न …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानकालगतचे डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करा; भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वेस्थानकालगत व निवासी इमारतींच्या परिसरात पनवेल महापालिकेमार्फत तयार केलेले डम्पिंग ग्राऊंड आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे डम्पिंग ग्राऊंड लवकरात लवकर बंद करून दुसरीकडे हलवावे, अशी मागणी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात …

Read More »

पनवेलमध्ये आधार केंद्रावर फसवणूक; दोघांना अटक

पनवेल : वार्ताहर शहरातील साईनगर येथील आधार केंद्रावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी संगनमताने बोटाच्या ठश्यांचे बनावटी स्वरुपाचे रबरी ठसे तयार करून त्याचा वापर करून शासनाची व केंद्रावर येणार्‍या लोकांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक करणार्‍या दोघांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. यातील आरोपी प्रितेश संभावडे व …

Read More »

विवाह सोहळ्यांवरही कोरोनाचे सावट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेलमध्ये दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता वर्तविल्या जात असल्याने याचा परिणाम दिवाळीनंतर होणार्‍या लग्न समारंभावर झालेला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेकांनी पूर्वनियोजित सोहळे स्थगित केले आहेत, तर मंगल कार्यालयांनीही सावध पावित्रा घेत, पूर्वी केलेले बुकिंग रद्द केले …

Read More »

माथेरानमधील व्यावसायिक घेणार ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर’चा लाभ

कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये फुटपाथवर व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांचा पथविक्रेते म्हणून समावेश करण्यात आला आहे. पदपथावर व्यवसाय करणार्‍यांसाठी पंतप्रधान आत्मनिर्भर योजना जाहीर करण्यात आल्यानंतर या व्यावसायिकांचा नगरपरिषद कर्मचार्‍यांकडून सर्व्हे करण्यात आला होता. त्या अहवालावरून नगरपरिषदे मार्फत संबंधित योजनेचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले होते. ज्या व्यावसायिकांनी या योजनेमधील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली …

Read More »

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालीकरांची एकजूट; नदी, जॅकवेलमधील गाळ काढण्यासाठी श्रमदान

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल व बाजूचा परिसर गाळाने भरला होता. ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान मोहीम राबवून जॅकवेल व पाण्याच्या मार्गावर साचलेला गाळ काढला. त्यामुळे पालीमध्ये वेळोवेळी भासणारी पाणीटंचाई सध्या तरी दूर झाली आहे. अष्टविनयकापैकी एक स्थान असलेल्या पाली गावाला येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा केला …

Read More »

नागोठण्यातील आंदोलनाला पनवेल, उरणच्या संघटनांचा पाठिंबा

नागोठणे : प्रतिनिधी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने 27 नोव्हेंबरपासून नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर प्रारंभ करण्यात आलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (दि. 1) पाचव्या दिवशी सुरूच आहे. मात्र आमदार रविशेठ पाटील यांच्या व्यतिरिक्त पालकमंत्री तसेच एकही लोकप्रतिनिधी आणि रिलायन्सच्या अधिकार्‍यांसह कोणताही सरकारी अधिकारी याठिकाणी पोहोचलेला नाही. दरम्यान, आंदोलनकर्त्यांचा उत्साह दररोज …

Read More »

…तोपर्यंत भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नाही; थकबाकी मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक

कर्जत : बातमीदार नेरळ येथील भात खरेदी केंद्रात गेल्या वर्षी विक्री केलेल्या भाताचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संप्तत झालेल्या या सर्व शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत नेरळ केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही, असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगला …

Read More »

महामार्गावर तीन अपघातांत तिघे जखमी; वाहतूक ठप्प

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात सोमवारी (दि. 30) सकाळी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पहिला अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला. पुण्याहून मुंबईकडे दूध घेऊन जाणार्‍या टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने तो …

Read More »

आंदोलनकर्त्यांना वाढता पाठिंबा; ‘रिलायन्स’विरोधातील आंदोलनाचा चौथा दिवस

नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, निवृत्त कामगार आणि सुशिक्षित तरुण बेरोजगारांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा सोमवारी चौथा दिवस होता. पोलीस वगळता एकही सरकारी अधिकारी तसेच रिलायन्सचा वरिष्ठ अधिकारी आजपर्यंत येथे पोहचला नसला तरी आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे विविध गावांमधून त्यांना वाढता …

Read More »