रेवदंडा : प्रतिनिधी तळेखार ते वाघूलवाडी परिसरातील शेतकर्यांचा प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्पास रास्त विरोध असून, मनसे या शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असेल. वेळ पडल्यास येथे खळ खट्याक आंदोलन छेडू, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चोरढे येथे दिला. तळेखार ते वाघूलवाडी येथील प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिक शेतकर्यांचा विरोध आहे. मनसे …
Read More »सुपारी पिकविणारे बागायतदार अडकित्त्यात
कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. कोकणातील समुद्रकिनारी असलेल्या भागात नारळ व सुपारी पिकांची मोठी बागायत जमीन आढळून येते. नारळ व सुपारीची उंच झाडे कोकणाचे वैभव वाढवत असतात. सुपारी हे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पीक आहे.झाडावर आलेली सुपारी काढल्यानंतर तिला कडक उन्हात शेकवल्यावर तिची कातणी केल्यावर व …
Read More »सूड आणि आसूड
जनतेच्या प्रश्नांकडे संपूर्ण डोळेझाक करून आपापल्या खुर्च्या तेवढ्या सांभाळण्याच्या कामात व्यग्र असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराकडे पाहून कपाळावर हात मारावा की संतापाने उसळून उठावे असेच महाराष्ट्रातील तरुण पिढीला वाटत असेल. जनतेच्या समस्यांचा मुद्दा आला की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे अंगलट आल्यावर चांगले काम करणार्या व्यक्तींना सूडबुद्धीने कायद्याच्या …
Read More »पोलीस दलाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; नवी मुंबईत फक्त नऊ जण बाधित
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबइ पोलीस दलात कोरोनाबाधितांचा आकडा एक हजार 700पर्यंत गेला होता तर मृतांचा आकडा 20 झाला होता. मात्र आता यातील फक्त नऊ जण बाधित राहिले आहेत. यातील आठ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील पोलीस दलाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर …
Read More »पोलादपूर एसटी बसस्थानकातील सांडपाणीप्रश्नी मनसेची स्वाक्षरी मोहीम
पोलादपूर : प्रतिनिधी येथील एसटी बस स्थानकामध्ये स्वच्छतागृह आणि गटारांचे दूर्गंधीयुक्त सांडपाणी मोठया प्रमाणात वाहू लागले आहे. त्या संदर्भात मनसेने सोमवारी (दि. 4) स्वाक्षरी आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रवासी आणि जनतेने पाठिंब्याची स्वाक्षरी केली. पोलादपूर एसटी बस स्थानकांतून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर येणार्या सांडपाण्याबाबत यापूर्वी मनसेने बॅनरबाजी करून आंदोलन केले होते. आता …
Read More »पोलादपुरात खोदकामादरम्यान आढळल्या 15 अश्मयुगीन मूर्ती; राज्य सरकारने तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढवीतील फणसकोंड येथून प्रथम गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळयाची वाडी या आठ गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगांव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाणमंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्डयातील माती उपसण्यात आली. मातीच्या ढिगार्यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मुर्ती …
Read More »राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकर्यांचे नुकसान; रावसाहेब दानवे यांनी केली टीका
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून मका आणि ज्वारीच्या आणखी खरेदीच्या परवानगीसाठी राज्य सरकार आवश्यक ती माहिती केंद्र सरकारला पुरवत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मका, ज्वारीच्या खरेदीबाबत हलगर्जीपणा दाखवणार्या महाआघाडी सरकारचा दुटप्पी चेहराच यातून उघड झाला आहे, अशी …
Read More »फाफडा पॉलिटिक्स
येत्या 10 जानेवारीस शिवसेनेतर्फे गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला खुद्द शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मुंबईत होर्डिंगबाजी सुरू झाली असून, जलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा अशी घोषणा देण्यात येत आहे. हे सारे पाहून मुंबईतील मराठी माणूस सोडाच गुजराती बांधवांसदेखील हसू …
Read More »‘त्या’ बलात्कार्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; बौद्धजन पंचायत समितीचे उरण पोलिसांना निवेदन
उरण : वार्ताहर पेण हद्दीतील आदिवासी समाजाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्त्या करण्यात आली. अशा नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, असे निवेदन बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 यांनी बुधवारी (दि.6) उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना दिले. निवेदनात असे नमूद केले आहे की, पेण हददीतील आदिवासी समाजाच्या …
Read More »शिक्षकांचा सत्कार; क्रांतिज्योती महिला विकास फाऊंडेशनचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून पनवेलमधील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व महिला वर्गाची फाऊंडेशनच्या सदस्यांनी महिलांना हळदी-कुंकू लावून ओटी भरली व कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवरांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper