Breaking News

Ramprahar News Team

स्मशानभूमीचे छत कोसळून 21 जणांचा मृत्यू

गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे रविवारी (दि. 3) स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक पाऊस आल्याने छताखाली उभे राहिले असताना ही दुर्घटना घडली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अनेक जण ढिगार्‍याखाली दबले गेले असल्याने …

Read More »

मंत्रालयात थकली खाण्या-पिण्याची उधारी; वसुलीसाठी राज्य शासनाने काढले परिपत्रक

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, सचिव कार्यालयाची खाण्या-पिण्याची उधारी एवढी झाली की अखेर शासनाला परिपत्रक काढून आता थकबाकी भरा; अन्यथा चहा, नाश्ता  मिळणार नाही असे सांगावे लागले आहे. थकबाकी असलेल्या कार्यालयांना केवळ आठ दिवसांचीच उधारी मिळणार आहे.मंत्रालयात असलेले उपहारगृह हे सामान्य प्रशासन विभागाकडून चालवले जाते, मात्र मागील काही …

Read More »

‘जल जीवन मिशन प्रभावीपणे राबवा’; पेणमधील 54 गावांसाठी 60 कोटी 78 लाखांचा निधी मंजूर

पेण : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत पेण तालुक्यातील 54 गावांमध्ये राबविण्यात येणार्‍या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 60 कोटी 78 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पेणमधील ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी प्रभावीपणे ही योजना राबवावी, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी रविवारी (दि. …

Read More »

भाजप किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अंतर्गत किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध मंडलाच्या अध्यक्षपदी पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 3) नियुक्तिपत्र देण्यात आले. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला …

Read More »

ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंदच; पर्यटक संख्येच्या मर्यादेमुळे बोटधारकांचे आंदोलन

मुरूड : प्रतिनिधी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी घातलेल्या बंदीचा कालावधी संपल्याने रविवारी (दि. 3) जलवाहतूक सोसायट्यांचे कर्मचारी पर्यटकांना किल्ल्यात नेण्यासाठी सज्ज झाले असतानाच, दिवसाला 400 पर्यटकांनाच किल्ल्यात नेता येईल अशी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशातील अट पुरातत्व खात्याकडून दाखविण्यात आली, मात्र या आदेशाची मुदत संपली असल्याचे सांगत सर्व बोट मालक व चालकांनी …

Read More »

कोरोना लशीसंदर्भात भारतीयांना गुड न्यूज!; कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनला मान्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी शस्त्र असलेली लस आता भारतातही लवकरच उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना देशात आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) व्ही. जी. सोमाणी यांनी रविवारी (दि. 3) पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. कोविशिल्ड लस ही …

Read More »

‘त्या’ खेळाडूंनी हॉटेलमध्ये खाल्ले बीफ?; बिलाचा फोटो होताोय व्हायरल

सिडनी : वृत्तसंस्था बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत मेलबर्नमध्ये झालेल्या तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत जोरदार कमबॅक केले होते, मात्र आत्मविश्वासाने भारलेला भारतीय संघ तिसर्‍या कसोटीपूर्वी वेगळ्याच कारणामुळे अडचणीत सापडला आहे. रोहित शर्मा आणि अन्य काही खेळाडूंना बायो बबलचे नियम मोडल्याने आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यातच आता या …

Read More »

कोरोनविषयक कठोर नियमांमुळे टीम इंडिया हैराण; ब्रिस्बेनला न जाता सिडनीतच राहण्याचा निर्णय?

सिडनी : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर, तर चौथा सामना ब्रिस्बेन येथील मैदानावर होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू सराव करीत असतानाच चौथ्या कसोटीसंदर्भात मोठे वृत्त समोर आले आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला न जाण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतल्याचे वृत्त …

Read More »

जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसदेत ‘सीकेटी’ची छाप; पौर्णिमा गायकवाडची राज्यपातळीवर निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणार्‍या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव-2021’ साठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) येथील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका पौर्णिमा गायकवाड (द्वितीय वर्ष-कला शाखा)ची जिल्हास्तरीय स्पर्धेमधून …

Read More »

उरण शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त

उरण : वार्ताहर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उरण पोलिसांनी शहरात व परिसरात नाका बंदी केली होती. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण गाड्या घेऊन फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. या वेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणार्‍या तसेच कोरोनाचे नियम भंग करणार्‍यांवर पोलीस कारवाई करीत होते. पिरवाड समुद्र किनारा, उरण चारफाटा, उरण शेवा-चार फाटा, …

Read More »