Breaking News

Ramprahar News Team

चक्रीवादळग्रस्तांना मदतीचा हात

पाली ः प्रतिनिधी कोरोना आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद सेवा मंडळ, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली यांच्या वतीने सुधागड तालुक्यातील दर्यागाव, पंचशील नगर, झेंडेवाडी येथील 250 चक्रीवादळग्रस्त कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चक्रीवादळामुळे अनेक जणांचे नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक सामान व …

Read More »

नागोठण्यात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव

नागोठणे ः प्रतिनिधी शहरासह विभागाची कोरोना रुग्णांची दोन महिने पाटी कोरी असतानाच काही दिवसांपासून कोरोनाने येथे शिरकाव करीत रोज आपली संख्या वाढतीच ठेवल्याचे स्पष्ट होत आहे. शहरात चार दिवसांपूर्वी ब्राम्हण आळीतील एका सरकारी कर्मचार्‍याला कोरोनाची लागण लागल्यावर संबंधित व्यक्तीच्या 55 वर्षीय आईलाही कोरोनाने गाठले आहे. येथील सूर्यदर्शन कॉलनीच्या परिसरात चार …

Read More »

निसर्ग चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांच्या व्यथा

निसर्ग चक्रीवादळ होऊन एक महिना उलटून गेला. तरीही वादळग्रस्तांच्या समस्या कायम आहेत. आधीच कोरोना या वैश्विक महामारीचा सामना करताना कोकणवासीय त्रस्त असताना नैसर्गिक आपत्तीने त्यांचे वर्तमान पुरते उद्ध्वस्त झाले असून, भविष्याबाबतही चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने त्यांना सर्वतोपरी साह्य करणे आवश्यक असताना साध्या मूलभूत सेवाही नीटपणे पुरविल्या जात …

Read More »

निजामपुरात कोरोनाचा शिरकाव; बाधितांची संख्या 55

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यात निजामपूर गावात कोरोनाने शिरकाव केला असून येथे एक 25 वर्षीय तरुण, माणगाव येथील एक, मोर्बा येथील दोन रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील 13 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती …

Read More »

कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना सहज जेवण डबा; सहजसेवा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील कोविड रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी खोपोलीतील सहजसेवा फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना रुग्ण असलेल्या व्यक्तीच्या घरी जेवण बनविण्यासाठी कोणी नसेल किंवा रुग्ण हॉस्पिटलमध्ये असेल अथवा त्यांच्या घरी छोटी मुले किंवा वृद्ध व्यक्तींना जेवणाची गैरसोय होत असेल तर त्यांच्यासाठी घरपोच निःशुल्क जेवण …

Read More »

मी कर्जतकरचा नागरिकांना दिलासा; आरोग्य सुविधा कर्जतकरांच्या दारी

कर्जत ः बातमीदार कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. या विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार करून पुढे गेला आहे. त्या अनुषंगाने कर्जत येथील भाजपच्या किसान मोर्चा प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांच्याकडून कर्जतमध्ये मी कर्जतकर हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत …

Read More »

‘अक्षरकार’ कमल शेडगे यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी सुप्रसिद्ध ‘अक्षरकार’ कमल शेडगे यांचे शनिवारी (दि. 4) मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. कमल शेडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. वृत्तपत्रात नोकरी सुरू केल्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळले.1962 साली ’रायगडाला जेव्हा जाग येते’ …

Read More »

करंजा-रेवस प्रवासी वाहतूक बंद

उरण : प्रतिनिधी लॉकडाऊननंतर 12 दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेली करंजा-रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक करणारी तरसेवा बंदरात तीन नंबरचा धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावण्यात आला असल्याने 4 जुलैपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर 22 जुनपासुन करंजा-रेवस तरसेवा शासनाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात …

Read More »

पमपा हद्दीत पाच खासगी कोविड रुग्णालयांना मान्यता

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी खाजगी कोविड हॉस्पिटल आवश्यक असल्याने शनिवारी (दि. 4) महापालिका आयुक्तांनी पाच खासगी रुग्णालयांना कोविड-19 रूग्णांलय म्हणून मान्यता दिली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपलब्ध हॉस्पिटलमध्ये …

Read More »

पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्याची ग्रामस्थांची मागणी

पनवेल : वार्ताहर तालुक्यातील कोंडले आणि मोरबे धरणावर पर्यटकांसाठी पनवेल परिसरासह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आदी भागातून पर्यटक दरवर्षी वर्षासहलीसाठी येत असतात. या पर्यटकांमुळे परिसरातील शांतता भंग पावतेच त्याचप्रमाणे जीवीतहानीचे प्रकारसुद्धा घडतात. सध्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावावर पोलीस यंत्रणेने अशा पर्यटकांना या ठिकाणी येण्यास बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक …

Read More »