महाड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळादरम्यान राज्यात सुरू झालेला पाऊस केवळ सलग 10 दिवस पडला व त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. गेली काही दिवस दिवसभरात कुठेतरी एखादी पावसाची सर कोसळत आहे. त्यातच ढग दिसेनासे झाल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी नसल्याने शेतकर्यांची भातलावणी रखडली आहे. गेली काही दिवस महाडसह …
Read More »आजपासून कर्जतमध्ये कडकडीत बंद; केवळ वैद्यकीय सेवा राहणार सुरू
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापारीवर्गाने सोमवारपासून (दि. 29) तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमधून फक्त वैद्यकीय सुविधांना वगळण्यात आले आहे. तालुक्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही …
Read More »सेना भवनाला कोरोनाचा विळखा; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर कोरोना पोहचल्यानंतर आता सेना भवनालाही कोरोनाचा विळखा बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भवनातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयात काम पाहणार्या काही कर्मचार्यांना कोरोनाची …
Read More »भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांना चोख प्रत्युत्तर; पंतप्रधानांचा ‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारत मैत्री निभावतो, मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणेही आम्ही जाणतो. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांना लडाखमध्ये जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करीत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आणि नतमस्तक आहे, …
Read More »कळंबोलीत आढळला पुरुषाच्या हाडांचा सापळा
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोलीतील लोखंड बाजारातील एसिसी सिमेंट कापणीच्या मागील बाजूस व कळंबोली रेल्वे ट्रॅकच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात एक पुरुष जातीच्या व्यक्तीचा हाडांचा सापळा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास कळंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश घाडगे करीत आहेत. कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत 24 जूनच्या रात्री साडे …
Read More »लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीचे दागिने लंपास
खोपोली : बातमीदार लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीकडून 27 लाख 50 हजार 940 रूपये आणि दागिने हडप करणार्या प्रियकरा (रा. घोसाळवाडी ता. पनवेल) विरोधात पीडीतेने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लखोबा लोखंडेचा अवतार असलेल्या प्रियकराने त्याचे लग्न झाल्याचे देखील वर्षभर लपविले होते. खोपोलीत विरेश्वर सोसायटीत राहणारी पीडीत महिलेचे आणि …
Read More »पनवेल एसटी आगारातील कर्मचार्यांना ‘सोशल स्पार्क’तर्फे फेस मास्कचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे बनले आहे. पनवेल महापालिकेने ही मास्क न वापरणार्यांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना योद्धयांना अत्यावश्यक सेवेसाठी घेऊन जाण्याचे काम करणार्या पनवेल एसटी आगारातील कर्मचार्यांना ‘सोशल स्पार्क’तर्फे फेस मास्कचे वाटप करण्यात आले. पनवेल परिसरातून मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईमध्ये …
Read More »‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर
सातारा : प्रतिनिधी सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी, या हेतूने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या आणि राज्यासह कर्नाटक राज्यात शाखा विस्तार असलेल्या सातार्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार आणि चेअरमनपदी डॉ. अनिल पाटील यांची शनिवारी (दि. 27) फेरनिवड झाली, तर संस्थेचे सचिव म्हणून वाशी (नवी मुंबई) येथील डॉ. कर्मवीर भाऊराव …
Read More »उरण बाजारपेठेत नागरिकांची गर्दीच गर्दी; कोरोना प्रत्येक गावाच्या वेशीपर्यंत पोहचण्याची शक्यता
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा अधिक प्रमाणात वाढत असताना मात्र उरण शहरातील बाजारपेठेत दररोज लहान-सहान वाहने आणि काही नागरिकांचा चक्काजाम होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची मार्गावर असताना तालुक्यातील गावोगावी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र याचे गांभिर्य घेत …
Read More »खारघरमध्ये मसाज सेंटरचा सुळसुळाट; कारवाईची मागणी
पनवेल ः वार्ताहर खारघर परिसरात गेल्या काही दिवसापासून विविध भागामध्ये मसाज सेंटरचा सुळसुळाट झाला असून या विरोधात खारघर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी खारघरमधील जनता करीत आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी ग्राहकांसोबत अश्लिल चाळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग करून मसाज सेंटर सुरू आहे. काही दिवसापूर्वी खारघर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper