Breaking News

Ramprahar News Team

कोरोना काळात इतर आजारांवरील रुग्णांना जीवदान देणारे डॉक्टर नव्हे तर देवदूत!

पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे इतर रुग्णांचे हाल होत आहेत, पण काही डॉक्टर असे असतात की ते रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्यरत असतात. अशांपैकीच एक आहेत कॅन्सरवरील टाटा मेमोरीयल हॉस्पिटलमधील डॉ. शैलेश व्ही. श्रीखंडे. त्यांच्याबद्दल त्यांच्याकडूनच बरे झालेले सतीश भालचंद्र वैरागी यांनी सांगितलेले …

Read More »

नागोठण्यात आषाढी एकादशी उत्साहात

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि. 1) येथील ज्ञानेश्वर मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे चार वाजता काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहाटे पाच वाजता सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आणि डॉ. मिताली धात्रक तसेच श्री. व सौ. विजय पिंपळे या दोन दाम्पत्यांच्या …

Read More »

कोरोना, कोरोना आणि कोरोना!

टीव्ही लावा कोरोनाची बातमी, व्हॉट्सअ‍ॅप उघडा कोरोनाबद्दल माहिती, कुणी भेटले तरी कोरोनाचे नाव काढल्याशिवाय राहत नाही. घरादारात कोरोनाच्याच गप्पा. इतकेच नव्हे तर कोरोनावरून जोक्ससुद्धा आपण ऐकतो, वाचतो. दहाही दिशेला कोरोनाचाच विषय. या कोरोनाने जीवनशैली बदलून टाकली आहे. भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाजसुद्धा कुणाला लावता येत नाही. इतका महाभयंकर हा …

Read More »

माणगाववासीय अद्यापही मोफत रॉकेलपासून वंचित

माणगाव ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळ होऊन महिना व्हायला आला तरी अद्याप राज्य शासनाने जाहीर केलेल्या मोफत पाच लिटर रॉकेलपासून माणगाव नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थ वंचितच आहेत. 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यांबरोबरच माणगाव तालुक्यालाही जोरदार तडाखा बसला. अजूनही तालुक्यातील काही गावांमध्ये वीजप्रवाह खंडित असल्याने अंधार पसरला आहे. …

Read More »

वादळग्रस्तांचा निधी बँकेत जमा; नागरिकांची मोठी गर्दी

मुरूड ः प्रतिनिधीे मुरूड तालुक्यातील वादळग्रस्तांना शासनातर्फे त्यांच्या झालेल्या नुकसानीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने लोकांनी बँक ऑफ इंडियाच्या मुरूड शाखेत आपले पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारी बँक ऑफ इंडियामध्ये एकदरा ग्रामपंचायतमधील असंख्य लोकांची गर्दी दिसून आली.  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुरूड तहसील कार्यालयास पूर्ण व अल्प नुकसान झालेल्या …

Read More »

कोरोनावर मात केलेल्या डॉक्टर्स, परिचारिकेचे स्वागत

कर्जत ः बातमीदार कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेने कोरोनावर मात करून ते  पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहेत. या वेळी त्यांचे आरोग्य कर्मचार्‍यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. कोरोना विषाणूने कर्जतमध्ये शिरकाव केल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टर, परिचारिकांनाही ग्रासले होते. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिकारी-कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा …

Read More »

रोहा बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने रोहा बाजारपेठ गेली नऊ दिवस बंद होती. नऊ दिवसांनंतर रोहा बाजारपेठ बुधवारी (दि. 1) उघडल्यानंतर बाजारात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता नागरिक बाजारात खरेदीसाठी वावरताना दिसत होते. बुधवारी रोहा बाजारपेठ पूर्णपणे उघडल्याने रोहेकरांची खरेदीसाठी एकच …

Read More »

नॉन कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करा; नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी

पनवेल ः बातमीदार पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील नॉन कोविड रुग्णांना कोविडची चाचणी केल्याशिवाय उपचार केले जात नसल्याने त्यांना उपचार घेणे खूप अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पनवेल कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली …

Read More »

आता शुभमंगल ‘सावधान’!; नियमांचे पालन न केल्यास होणार गुन्हा दाखल

पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा व महत्त्वाचा क्षण… या वेळी सगळ्या नातेवाईकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावावी, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटत असते, पण कोरोनामुळे आता ते शक्य नाही. लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादित उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी शासनाने …

Read More »

सर्वेक्षणकामी गैरहजर कर्मचार्‍यांना आयुक्तांचा दणका; 500 रुपयांचा दंड

पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेचे शाळांतील शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक केली होती. यातील बरेच कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील गैरहजर कर्मचार्‍यांना गुन्हे दाखल करण्यापूर्वी 500 रुपये दंड …

Read More »