Ramprahar News Team

रायगडात शेतीच्या कामांना सुरुवात

अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून रायगडकर हळूहळू बाहेर पडतोय. स्वतःला सावरतोय. त्याने आता आपले व्यवहार सुरु केले आहेत. बळीराजा देखील कामाला लागलाय. खोळंबलेली शेतीची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यातील भाताच्या पेरण्याची लगबग सुरु झाली आहेत. जिल्ह्यात साधारण एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. …

Read More »

इंग्लंडच्या कोरोना योद्ध्यांना भारतीयांच्या अन्नछत्राचा आधार

पनवेल : प्रतिनिधी  लंडनमधील भारतीयांच्या सेवा डे या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेने इंग्लंडमध्ये एनएचएसच्या रुग्णालयात काम करणार्‍या कोरोना योद्ध्यांना जेवण पुरवून सेवाभावी वृत्तीचे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. मार्चच्या उत्तरार्धात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले तेव्हा यूके मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी सेवा डे या  इंग्लंडमध्ये नोंदणीकृत भारतीयांच्या विश्वस्त …

Read More »

भाजपमधून तिघांचे निलंबन

पनवेल : रामप्रहर वृत्त पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे कानपोली ग्रामपंचायतीच्या सरपंच विजया पाटील, तसेच श्याम पाटील व कैलास पाटील यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. कानपोली ग्रामपंचायत सरपंच नेमणुकीबाबत पक्षातर्फे सातत्याने सूचना देऊन सुद्धा पनवेल तालुका मंडल सदस्य श्याम पाटील, …

Read More »

पनवेल तालुक्यात 59 नवे पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 17) कोरोनाचे 59  नवीन रुग्ण आढळले असून  चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 21  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 41  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून  चौघांचा मृत्यू झाला आहे तर 16 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. …

Read More »

सुधारित तिकीटदरास स्थगिती देण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या कर्मचारी बससेवे बरोबरच सर्वसामान्य प्रवाशी नागरिकांसाठी बस सेवा कार्यान्वित केली आहे. मात्र आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एकास दोन तिकिटे असा आदेश काढला आहे. त्यामुळे बससेवा सुरु करीत असताना त्यासाठी येणार्‍या खर्चापोटीची रक्कम महापालिका किंवा राज्य शासनाकडून अनुदानरुपी …

Read More »

बलात्कार करून पळालेला चालक जेरबंद

पनवेल : वार्ताहर टी पॉईंट उरणकडे जाणार्‍या सर्व्हीस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून पळून जाणार्‍या आरोपीच्या चित्तथरारक पाठलागानंतर पनवेल पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे 3 वाजताच्या सुमारास टीपॉईंट उरणकडे जाणार्‍या रोडच्या सर्व्हिस रोडवर ट्रेलरमध्ये एका महिलेवर ट्रेलर चालकाने बलात्कार करून तो पळून गेल्याबाबत नियंत्रण कक्ष नवी मुंबई …

Read More »

माणगावमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण

माणगाव : प्रतिनिधी कोरोना साथीमुळे लॉकडाऊन काळात शाळांना सुटी आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21चे नवीन वर्ष लॉकडाऊन नसते तर 15 जून सोमवारी सुरू झाले असते. मात्र लॉकडाऊनमुळे नवीन शैक्षणिक सत्र जूलै महिन्यापासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात फक्त इयता नववी ते दहावी व बारावीचे वर्ग भरणार असून ऑगस्ट महिन्यात सहावी ते …

Read More »

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण कार्यक्रमातील कामे रखडली; प्रशासनाचे उदासीन धोरण

अलिबाग : प्रतिनिधी चक्रीवादळात घरांचे नुकसान होते. समुद्राला उधाण येते. वीजपुरवठा खंडित होतो. अशा परिस्थितीत नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पातून रायगड जिल्ह्यात किनारपट्टीवरील भागात निवारा केंद्र बांधणे. भूमिगत विद्युतवाहिन्या टाकणे व खारबंदिस्ती करणे ही कामे मंजूर करण्यात आली …

Read More »

उरण बाजारपेठेत छत्र्या व रेनकोट दाखल

उरण : वार्ताहर उरण : वार्ताहर रिमझिम पाऊस सुरु झाल्याने उरण बाजार पेठेत विविध रंगी छत्र्या, रेनकोट दाखल आले असून बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. यंदाही पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तसेच यंदाही सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने मार्केटमध्ये नवीन प्रकारच्या ब्रॅण्डेड छत्र्या दाखल झाल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीस वरुणराजाने …

Read More »

रानसई धरणात समाधानकारक पाणीसाठा

उरण : वार्ताहर उरण तालुक्याला पाणी पुरवठा करणार्‍या रानसई धरणात यावर्षी समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असल्याने उरणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रानसई धरणाची या वर्षी पाण्याची पातळी दोन मीटर जास्त आहे. त्यामुळे जूलै अखेरपर्यंत उरणकरांना हे पाणी पुरणार असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. …

Read More »