Breaking News

Ramprahar News Team

रायगड जिल्ह्यात 29 मिमी पावसाची नोंद

अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 29.49 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच 1 जूनपासून आज अखेर एकूण सरासरी 363.36 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार अलिबाग 2.00 मिमी, पेण 9.00 मिमी, मुरूड 24.00 मिमी, पनवेल 0.00 मिमी, उरण 2.50 मिमी, …

Read More »

सौर पथदिव्यांनी उजळून निघाल्या बेकरेवाडीच्या वाटा

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बेकरेवाडी येथील रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. या सौर पथदिव्यांमुळे विजेची मोठी बचत होणार असून रात्रीच्या वेळी येथून अंधारातून वाट काढणार्‍या ग्रामस्थांना आधार मिळाला आहे. ग्रामपंचायतीने यासाठी 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून साधारण दोन लाख रुपयांची तरतूद केली आहे. …

Read More »

नौदलाच्या पाणबुडीचे वॉल्व्ह चोरीला; गुन्हा दाखल

खोपोली ः प्रतिनिधी खालापुरातील एका कारखान्यातून सुमारे 80 लाखांचे वॉल्व्ह चोरीला गेल्याची घटना घडली. चोरी झालेल्या वॉल्व्हचा वापर नौदलाच्या पाणबुडीकरिता होत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. फिर्यादी पंडिता राध्या हिरेमठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुंभिवली गावाच्या हद्दीत असलेल्या सीएफएफ फल्युईड कंट्रोल प्रा. लिमिटेड कारखान्यात मरीन रूममध्ये उघड्या दरवाज्यावाटे चोरट्याने प्रवेश करून …

Read More »

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज सुरू

पेण ः प्रतिनिधी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन व लायसन्सविषयक सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. नेमून दिलेल्या कोट्याप्रमाणे अपॉइंटमेंट घेतली असेल व त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर केल्यानंतर कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिवहन कार्यालयातील …

Read More »

वादळग्रस्तांसाठी सरसावले संघ स्वयंसेवक; आळीपाळीने श्रमदान; जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

माणगाव ः प्रतिनिधी  निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले. अवघ्या तीन-चार तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने आलेला निसर्गाचा रौद्र झंझावात श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग, माणगाव, रोहा तालुक्यांची अपरिमित हानी करून गेला. या चक्रीवादळातील वादळग्रस्तांच्या मदतीला रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सरसावले असून मागील 17 दिवसांपासून विविध प्रकारे वादळग्रस्तांना मदतीचा हात …

Read More »

चीनला धडा शिकवायलाच हवा

भारत-चीन दरम्यानच्या लष्करी संघर्षात वीस जवानांचा बळी गेल्यानंतर देशातील जनमानसातील चीनविरोधाची धार तीव्र झाली असून जनतेने समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चीनविरोधी संताप व्यक्त केला आहे. चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी यातून जोमाने पुढे येत आहे. हिमालयाच्या खोर्‍यात भारत-चीन सीमाभागात गेला महिनाभर अधून मधून तणावपूर्ण स्थिती निर्माण होत होतीच. डिसेंबर महिन्यात …

Read More »

पेणमध्ये 12 नवे कोरोना रुग्ण

पेण : प्रतिनिधी पेणमध्ये कोरोनाग्रस्त  रुग्णंच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी (दि.17) 12 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. पेणमधील नव्याने वाढलेल्या 12 रुग्णांमध्ये चार गडब, दोन वडगाव, एक बेणसे येथील असून पाच रुग्ण हे पेण नगररिषद हद्दीतील आहेत. यामुळे बुधवारी पेणमधील एकूण रुग्ण संख्या 44 झाली असून यामधील 20 …

Read More »

रायगडात शेतीच्या कामांना सुरुवात

अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून रायगडकर हळूहळू बाहेर पडतोय. स्वतःला सावरतोय. त्याने आता आपले व्यवहार सुरु केले आहेत. बळीराजा देखील कामाला लागलाय. खोळंबलेली शेतीची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यातील भाताच्या पेरण्याची लगबग सुरु झाली आहेत. जिल्ह्यात साधारण एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. …

Read More »

इंग्लंडच्या कोरोना योद्ध्यांना भारतीयांच्या अन्नछत्राचा आधार

पनवेल : प्रतिनिधी  लंडनमधील भारतीयांच्या सेवा डे या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेने इंग्लंडमध्ये एनएचएसच्या रुग्णालयात काम करणार्‍या कोरोना योद्ध्यांना जेवण पुरवून सेवाभावी वृत्तीचे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. मार्चच्या उत्तरार्धात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले तेव्हा यूके मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी सेवा डे या  इंग्लंडमध्ये नोंदणीकृत भारतीयांच्या विश्वस्त …

Read More »

भाजपमधून तिघांचे निलंबन

पनवेल : रामप्रहर वृत्त पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे कानपोली ग्रामपंचायतीच्या सरपंच विजया पाटील, तसेच श्याम पाटील व कैलास पाटील यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. कानपोली ग्रामपंचायत सरपंच नेमणुकीबाबत पक्षातर्फे सातत्याने सूचना देऊन सुद्धा पनवेल तालुका मंडल सदस्य श्याम पाटील, …

Read More »