Breaking News

Ramprahar News Team

स्वच्छ हवा दुरापास्त

गेली काही वर्षे ऑक्टोबर ते जानेवारी या काळात देशातील नवी दिल्ली, मुंबई व कोलकाता या शहरांमधील हवेच्या दर्जाने अतिधोकादायक पातळी गाठणे नित्याचे झाले आहे. परिस्थिती बिकट होताच तातडीची उपाययोजना अवश्य केली जाते, परंतु अशी परिस्थिती ओढवूच नये या दिशेने मात्र फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. यापैकी वाहनप्रदूषणाच्या विरोधातील उपाययोजना जनतेच्या …

Read More »

व्यापक चर्चा आवश्यक

समलिंगी संबंध ही केवळ शहरी अभिजनांमधील संकल्पना आहे याबद्दल घटनापीठाने असहमती दर्शवली असली तरी आजच्या घडीला तरी बहुसंख्य भारतीयांना हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा वाटतो. घटनापीठातील पाच न्यायाधीशांनी यासंदर्भात चार वेगवेगळी निकालपत्रे दिली यावरून या विषयासंदर्भातील विभिन्न बाबींविषयी समाजातही केवढी मतभिन्नता असावी याचा प्रत्यय येतो. विशेष विवाह कायद्यांंतर्गत समलिंगी विवाहांना कायदेशीर …

Read More »

रायगडात भाजप महायुतीचा खासदार निवडून येईल -प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

अलिबाग ः प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून जनतेकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 खासदार भाजप महायुतीचे निवडून येतील. रायगड लोकसभा मतदारसंघातूनदेखील भाजप महायुतीचाच खासदार निवडून येईल, असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपतर्फे महाविजय 2024 अंतर्गत अलिबाग येथे …

Read More »

राजकारणाचाच शाप

काही भीषण अपघातांमुळे लोकांच्या मनात समृद्धी महामार्गाविषयी गैरसमज निर्माण झाले असून विरोधकांनी केलेली बेजबाबदार विधाने त्यात भरच घालू शकतात. प्रत्यक्षात या महामार्गावरून प्रवास करण्याचा अनुभव घेतलेले लोक मात्र समृद्धी महामार्गावरील प्रवास सुखकर असल्याचेच सांगतात. महामार्गाच्या बांधणीत कुठलाही दोष नसून महामार्ग गुणवत्तापूर्ण असल्याची ग्वाही तज्ज्ञ जाणकारांनीही यापूर्वीच दिली आहे. आपल्या वाहनाचा …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या वेळेत वाढ

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे दोन हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि दोन हजार 950 सदस्यपदांच्या, तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 …

Read More »

शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये देवीचे पूजन उलवे नोड ः रामप्रहर वृत्त भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (दि. 15)पासून सुरुवात झाली आहे. उलवे नोड खारकोपर येथे जय बजरंग कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळांच्या वतीनेही नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणच्या देवीचे पूजन माजी खासदार लोकनेते …

Read More »

पनवेलमधील दुंदरे, रिटघर, शिवणसईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. दुंदरे ग्रामपंचायत हद्दीतील दुंदरेसह रिटघर, शिवणसई येथील शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भाजप पनवेल तालुका व शहर …

Read More »

दुर्दैवाचा घाला

नांदेड येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी निश्चितच धक्कादायक आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी ठाण्यानजीकच्या छत्रपती शिवाजी सरकारी इस्पितळामध्ये एका रात्रीत 18 रुग्ण दगावले होते. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर पडणारे हे दुर्दैवाचे घाले तातडीने थांबायला हवेत यात शंकाच नाही. इस्पितळामधील हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याची चौकशी …

Read More »

पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वच्छतेला प्राधान्य देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पनवेल परिसरातही रविवारी (दि. 1) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः हाती झाडू घेऊन पनवेल शहरातील कृष्णाळे तलाव येथे या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिका तसेच भाजपच्या वतीने एक तारीख एक तास …

Read More »

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान : अलिबागमध्ये 2162 श्री सदस्यांचा सहभाग

अलिबाग ः प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवाडानिमित्ताने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 1) अलिबाग तालुक्यातील विविध गावांत 56 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. श्री सदस्यांनी गावात जाणारे रस्ते, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, बाजारपेठ, समुद्रकिनारा रस्ते चकाचक केले. या अभियानात 2162 श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब …

Read More »