पनवेल ः रामप्रहर वृत्त घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दवाखान्यात मोफत उपचारांसह सर्व प्रकारच्या तपासण्या होतात. रायगड जिल्ह्यात या उपक्रमाचा लाभ घेणार्यांची सर्वाधिक नोंद खारघरमध्ये झाली आहे. आरोग्याच्या मूलभूत सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या …
Read More »वेगवान विकास
आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग. जर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच आणि दूर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर तर काय करता येऊ शकते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिले आहे. उत्तुंग व विधायक कार्यातून मोदी सरकारने देशाचा कायापालट केला आहे. आता राज्यातही …
Read More »उरण विंधणे येथील विविध विकासकामांचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन
उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीत सहा कोटी 60 लाख रुपये खर्चाची विकासकामे करण्यात येत असून त्यांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 20) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक रविशेठ भोईर, माजी पंचायत समिती सदस्य दिशा पाटील, विंधणे ग्रामपंचायतीच्या …
Read More »करंजाडेतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी
14 कोटींची तरतूद; सरपंच मंगेश शेलार यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त करंजाडे वसाहतीमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या संदर्भात सरपंच मंगेश शेलार यांनी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्याने याकरीता 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन त्याची प्रक्रिया पूर्ण केली …
Read More »मोहोपाडा येथे शेकाप, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
रसायनी ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे शेतकरी कामगार पक्ष व उद्धव ठाकरे गटाच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.16) प्रवेश केला. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून वासांबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आश्वासन दिले. …
Read More »ऐक्याचा सावळा गोंधळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार वारंवार आपली मोदीविरोधी भूमिका स्पष्ट करून सांगत असले तरी महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे. उरलासुरला उद्धव ठाकरे गट आणि सुदैवाने आजवर तुलनेने अखंड राहिलेल्या काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला वगळून महाविकास आघाडी पुढे न्यायचे मनसुबे रचले आहेत असे बोलले जाते. वस्तुस्थिती तशी नाही असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतृत्व …
Read More »उरणमधील रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती उरण : वार्ताहर राज्य शासनाच्या बांधकाम विभागातर्फे ठाणे खाडीपुलावरील समर्पित माल वाहतूक मार्गिका प्रकल्पांतर्गत उरण तालुक्यातील रांजणपाडा येथे बांधण्यात येणार्या लेव्हल क्रॉसिंग क्र. 2 व 3 या रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी (दि. 16) करण्यात आले. हा कार्यक्रम …
Read More »मुरुड कोर्लई समुद्रकिनारी मोठा समुद्री कावळ्याचे दर्शन
रायगड जिल्ह्यात आढळलेला पहिला प्रौढ पक्षी पाली ः प्रतिनिधी रायगडातील मुरूड येथील कोर्लई समुद्रकिनारी लाईट हाऊसजवळ दुर्मिळ मास्कड बुबी लेेलू (मोठा समुद्री कावळा) पक्षाचे दर्शन झाले. रायगड जिल्ह्यात बहुदा पूर्ण वाढ झालेला हा पहिला पक्षी दिसला असण्याची शक्यता पक्षी व वन्यजीव अभ्यासकांनी वर्तवली आहे. अलिबाग येथील वन्यजीव अभ्यासक आणि वन्यजीव …
Read More »पनवेलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह
ध्वजारोहण, तिरंगा बाईक रॅली तसेच विविध कार्यक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यदिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने ध्वजारोहण तसेच युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा बाईक रॅली मोठ्या उत्साहात झाली. मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …
Read More »भविष्याचा रोडमॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामुळे बहुतांश भारतीय जनतेच्या मनात उत्साहाचे भरते आले. येत्या काही वर्षांतच भारतीयांच्या वाट्याला आणखी अच्छे दिन येणार याची खात्रीच जणू पटून गेली. हे अच्छे दिन भारतीय जनतेच्या वाट्याला यावेत यासाठी मोदी सरकार गेली नऊ वर्षे अहोरात्र राबत होते याची जाणीव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper