21st January 2020
महत्वाच्या बातम्या
खांदा कॉलनी : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याही हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित केले गेले. सोबत संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य.
Read More »
21st January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : वार्ताहर उरण नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आंतरशालेय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन मंगळवारी (दि. 21) नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते झाले. पालिकेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेच्या मैदानावर हा तीनदिवसीय महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शिक्षण सभापती रवी …
Read More »
21st January 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील कुंभारवाडा मिरची गल्लीतील बाळ गोपाळ क्रिकेट संघाने आयोजित केलेल्या अंडर आर्म स्पर्धेत रायझिंग स्टार कामोठे या संघाने विजेतेपद पटकाविले. एस. के. सुकापूर संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत 16 संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. स्पर्धेचे …
Read More »
21st January 2020
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नववर्षात श्रीलंकेनंतर बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमविणारा भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यासाठी रवाना झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा यंदाच्या वर्षातील हा पहिलाच परदेश दौरा आहे. भारताच्या न्यूझीलंड दौर्याला 24 जानेवारीपासून सुरुवात होणार असून, उभय संघांत पाच ट्वेन्टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. …
Read More »
21st January 2020
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन सलग्न शेळके जीमच्या वतीने आई गावदेवी चषक जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुरेश भातडे याने ज्युनियर रायगड श्री 2020 हा किताब पटकाविला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले. आशियाई संघटनेचे …
Read More »
20th January 2020
महत्वाच्या बातम्या
कोणत्या घरात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसले तरीही कर्तृत्वाच्या जोरावर एखादा माणूस जीवनात कसा यशस्वी होऊ शकतो याचे चालतेबोलते उदाहरण म्हणजे भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे होय. संजयआप्पा यांनी कष्ट, जिद्द व दूरदृष्टीच्या जोरावर यशाची शिखरे गाठली. तळाशेत इंदापूर येथील संजयआप्पा यांचे राजकीय व सामाजिक कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. …
Read More »
20th January 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारकडून निष्ठावंतांना डावलले आणि नव्यांना संधी दिली यावरून सर्वसामान्य शिवसैनिक मात्र चांगलाच संतप्त झाला. एकीकडे आ. भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने तसेच दुसरीकडे पालकमंत्रिपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नाराज असल्याचा कांगावा करण्यात आला होता, मात्र सेनाप्रमुखांनी वेळ …
Read More »
20th January 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
एखाद्या शहरात ‘नाइट लाइफ’ सुरळीत चालावयाचे असेल तर तेथील नागरी सुविधा अत्यंत चोख असाव्या लागतात. अशा नागरी व्यवस्था मुंबईत अस्तित्वात आहेत का हा खरा प्रश्न आहे. 2008साली 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला अजूनही कोणी विसरू शकलेले नाही. रात्री-अपरात्री स्त्रिया एकट्या-दुकट्या प्रवास करू शकतील अशीही परिस्थिती इथे नाही. अशा …
Read More »
20th January 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
कर्जत : प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून कर्जतमधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत आहे. आता तर या समस्येत अधिकच वाढ झाली आहे. याचा फटका बँक आणि पोस्टाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. खासगी बँका पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत, मात्र बीएसएनएलवरच अवलंबून सरकारी …
Read More »
20th January 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
नागोठणे : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गालगतच्या विद्युत वाहिन्या दुसर्या ठिकाणी हलविण्याच्या कामासाठी मंगळवारी (दि. 21) नागोठणे शहराचा विद्युत पुरवठा दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली. मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, …
Read More »