Breaking News

Ramprahar News Team

उरण येथून दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान

उरण ः वार्ताहर उरण येथून सोमवारी (दि. 2) सकाळी 9 वाजता श्रींची आरती करून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाले असून श्रींची पालखी मंगळवारी (दि. 10) सकाळी 10 वाजता श्रीक्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहचणार आहे या वेळी पालखी उरण शहरातून निघाल्यावर पालखी दिंडीचे जागोजागी स्वागत झाले. या सोहळ्याला बाबांच्या पालखी व …

Read More »

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या!, मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई ः वार्ताहर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच निर्णयात आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ नाणार प्रकल्प आंदोलनातीलही गुन्हे मागे घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सोबतच कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासाहित …

Read More »

पनवेलमध्ये मोफत मधुमेह मार्गदर्शन शिबिर

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल, नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिका व ब्रह्माकुमारीजमार्फत मोफत मधुमेह मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात  7 व 8 डिसेंबर रोजी हे शिबिर होणार आहे. 30 ते 60 वर्षे वयातील स्त्री पुरुषांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन …

Read More »

पनवेलकरांचे आठ तास विजेविना हाल!

पनवेल ः बातमीदार पनवेल शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले नवे गॅस इन्सुलेटेड उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेंद्रामधून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणने प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी उपकेंद्राचे काम करण्यासाठी पनवेल शहरातील वीजग्राहकांना तब्बल आठ तास विजेविना काढावे लागले. त्यामुळे पनवेलकरांची प्रचंड गैरसोय …

Read More »

उलवे येथे सुरक्षारक्षकाकडून कंत्राटदाराची हत्या; आरोपीस अटक

पनवेल ः बातमीदार उलवे येथील सेक्टर 25 मध्ये एका सुरक्षारक्षकाने कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. खगेंद्र बहादूर असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुनेश्वरकुमार उर्फ मनीष राम बाबू (30) हा सेंट्रिंगच्या कामाचे कंत्राट घेऊन कामगारांच्या माध्यमातून काम करवून घेत होता. मुनेश्वर याला उलवे …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पनवेलमध्ये अभिवादन कार्यक्रम

पनवेल ः वार्ताहर  विचुंबे येथील बौध्दवाडा येथे भारतीय जनता पक्ष व भीमगर्जना मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये गुरुवारी (दि. 5) रात्री 10 वाजता बौध्दाचार्य हिरामण गुरुजींचा पूजापाठ, मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलन होणार आहे. या वेळी …

Read More »

नियोजित विमानतळ परिसरातील शाळा जमीनदोस्त

पनवेल ः बातमीदार नवी मुंबई विमानतळासाठी सिडकोने आता गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी कोंबडभुजे गावातील शाळा पाडण्यात आली असून बुधवारी उलवेमधील शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे. विमानतळासाठी लागणारी 70 टक्के जागा सिडकोला सहजपणे मिळाली. मात्र उरलेल्या 30 टक्के जागेसाठी सिडकोला मोठा संघर्ष करावा लागला. या …

Read More »

तळोजा येथे ओला चालकास लुटले; तिघे जण गजाआड

पनवेल ः वार्ताहर एका ओला चालकास चौकडीने लुटल्याची घटना घडली असून यातील तिघांना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शेख (22), गौतम पाटील (19) आणि युसूफ शेख (22) अशी या तीन आरोपींची नावे आहेत. ओला चालक रियाज शेख यांना तळोजा येथील भाडे मिळाले. चार प्रवासी घेेऊन रियाज शेख तळोजा येथे …

Read More »

पनवेल तालुक्यात डेंग्यूचे थैमान, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

पनवेल तालुक्यात डेंग्यूचे थैमान, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन पनवेल ः बातमीदार पनवेल तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे 17 रुग्ण  आढळले असून महापालिका हद्दीतदेखील संशयितांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळेे परिसरात घबराट पसरली आहे. तर उरणमध्ये 9 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या खोबणीत, …

Read More »

एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांचे हाल, सर्व्हर सतत बंद असल्याने अनेक तास राहावे लागते रांगेत उभे

पनवेल  ः प्रतिनिधी ट्रायमॅक्स कंपनीचा सर्व्हर सतत बंद पडत असल्याने एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांचे रांगेत उभे राहून हाल होत आहेत. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार किमी मोफत प्रवासाची योजना जाहीर केली. त्यासाठी स्मार्ट कार्ड घेणे आवश्यक आहे. हे कार्ड घेण्यासाठी आगारात लांबच लांब रांगा लागत आहेत, पण त्यासाठी …

Read More »