सुधागड-पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीमधील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मागील अनेक महिन्यांपासून मच्छीविक्रेते बसत होते. या स्थानिक मच्छी विक्रेत्यांना पाली ग्रामपंचायतीने नुकतेच येथून हटविले आहे, पण आजही नागोठाणे येथून येणार्या मच्छीविक्रेत्या ठिकठिकाणी मच्छीविक्रीसाठी बसतात. मग पाली ग्रामपंचायत कारवाई का करीत नाही? येथे बसणार्यांवर कायदेशीर कारवाई करून मालाची विल्हेवाट …
Read More »आईवडिलांचा आदर करणारी मुलेच यशस्वी होतात -स्नेहलता देशमुख
कर्जत ः प्रतिनिधी हल्लीची पिढी विचार करीत नाहीत असे अनेकांचे मत आहे ते मला मान्य नाही. ही मुले फार हुशार व जिज्ञासू आहेत. जे चांगले असते तेच ते वाचतात. हल्लीच्या दिवसांत मुलांचे कौतुक म्हणजे त्यांच्या हातावर स्टार काढले जातात. आपल्या वेळी हे नव्हते. आईचे नाव आपल्या प्रमाणपत्रावर आणि गुणपत्रिकेवर असावे …
Read More »कशेळे-कर्जत राज्यमार्गावर धुळीचे साम्राज्य
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणार्या कशेळे-कर्जत राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून सिमेंट-काँक्रीटचे बनविले जात असून रस्त्याच्या कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणार्या धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहापूर-मुरबाड-कशेळे-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचे …
Read More »जागतिक एड्स दिनानिमित्त विशेष व्याख्यान
पोलादपूर : प्रतिनिधी जागतिक एड्स दिन व सप्ताहानिमित्त येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय पोलादपूरच्या एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी सेंटर) यांच्या सहकार्याने 1 डिसेंबर रोजी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान व जनजागृती प्रचार फेरीचे आयोजन करण्यात …
Read More »मातृवंदन शिबिरात महिलांना आधारकार्डचा लाभ
कर्जत ः प्रतिनिधी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान यांच्या माध्यमातून कडाव येथे मातृवंदन कार्यक्रमांतर्गत आधारकार्ड शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 127 महिलांना आधारकार्ड काढून देण्यात आली. तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कडाव आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन कडाव येथील ग्राम सचिवालय येथे करण्यात आले …
Read More »हुतात्मा भाई कोतवाल यांची जयंती उत्साहात साजरी
कर्जत : बातमीदार सन 1942च्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे आजाद दस्ता या क्रांतिकारी चळवळीचे प्रणेते माथेरानचे सुपुत्र वीर अण्णासाहेब उर्फ भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी वीर हिराजी पाटील यांनी भारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करताना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण पत्करले. या रक्तरंजित लढ्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची …
Read More »‘सावित्री’वरील पुलांची कामे प्रगतिपथावर
महाड : प्रतिनिधी महाड व माणगाव हद्दीतील सावित्री नदीवरील तिन्ही मोठ्या पुलांची दुरुस्ती केली जात आहे. हे तिन्ही पूल 1980च्या दशकात बांधण्यात आले असून सावित्री पूल दुर्घटनेनंतर या तिन्ही पुलांचे निरीक्षण करण्यात आले. यात या पुलांच्या पायामध्ये दुरुस्ती करण्याचे सुचवण्यात आले होते. त्यानुसार सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यात आंबेत …
Read More »मोरे महाविद्यालयात रक्तदान शिबिर
पोलादपूर : प्रतिनिधी शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे संस्थापक व महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री स्वर्गीय प्रभाकर मोरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या विशेष सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित …
Read More »वन विभागाकडून कर्नाळा अभयारण्य प्लास्टिकमुक्त
संपूर्ण पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 किमी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध असल्याने 12.11 चौ. किमीच्या क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा घोषित झाला. हे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांचे माहेरघर असल्याने दिवसरात्र येथे पक्ष्यांचे संमेलन भरलेले दिसते. पक्ष्यांसाठी …
Read More »भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळणार -राज्यपाल कोश्यारी
मुंबई : प्रतिनिधी अधिवेशनाच्या दुसर्याच दिवशी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेत अभिभाषण केले. विशेष म्हणजे राज्यपालांचे संपूर्ण भाषण हे मराठीत होते. या वेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला अनेक दिलासा देणारी आश्वासने दिली. आपल्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकर्या उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. त्यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper