Breaking News

Ramprahar News Team

पनवेल मच्छीमार्केटमध्ये ग्राहकांची फसवणूक

पनवेल : प्रतिनिधी पनवेलमधील मच्छीमार्केटमध्ये वजनकाट्यात फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामुळे मांसाहारी खवय्यांत खळबळ उडाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक मच्छीमार्केट आहेत. त्यातील गुणे हॉस्पिटलजवळ असलेल्या मच्छीमार्केटमध्ये वजनावर मच्छी घेणार्‍या ग्राहकांची विक्रेत्यांकडून  फसवणूक केली जाते. वजनकाट्याच्या खालील बाजूला प्लास्टिक पिशवीत दगड किंवा …

Read More »

महाआघाडीचे तीनचाकी सरकार चालणे कठीण, देवेंद्र फडणवीस यांचे भाष्य; मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरले नाही. त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच महाआघाडीचे तीनचाकी सरकार चालणे कठीण असल्याचे भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मंगळवारी (दि. 26) भरगच्च पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा, विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाच्या करंडकाने गौरविले जाणार

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे …

Read More »

संपकरी डॉक्टरांचा संप अखेर मागे

अलिबाग : प्रतिनिधी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांचे मानधन शासनाकडून वेळेत न दिल्याने डॉक्टरांनी संप पुकारला होता. जिल्हाधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक …

Read More »

उरणमध्ये बिबट्याची दहशत; लोक भयभीत

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिर्ले गाव परिसरात एका बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याच्या धास्तीने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. चिर्ले गावाच्या उत्तर दिशेला असणार्‍या जंगलात गेल्या काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते. एका व्यक्तीने बिबट्याला पाहिले होते, मात्र त्याच्या बोलण्यावर वनखात्याच्या कर्मचार्‍यांसह पोलीस यंत्रणेनेही विश्वास …

Read More »

पनवेल मनपातर्फे संविधान दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, नगरसेविकांसह प्रमुख वक्ते …

Read More »

संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजचा 26 नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस आहे. 70 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण विधिवत संविधान स्वीकारले होते. संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 26) काढले. संविधान दिनानिमित्त ते संसदेमध्ये बोलत होते. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताचे संविधान आपल्याला नागरिकांना …

Read More »

‘मी तिथे वेड्यासारखा उभा होतो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी 20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. या वेळी तेथे असलेला जगज्जेत्ता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने …

Read More »

आयपीएलपर्यंत वाट बघा; धोनीच्या, निवृत्तीच्या चर्चांवर रवी शास्त्रींचे सूचक विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्याच्या शक्यता धुसर झालेल्या आहेत, मात्र अशा परिस्थितीत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केले आहे. तो पुन्हा कधी खेळायला सुरुवात करतोय आणि आयपीएलदरम्यान कसा खेळ करतोय यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. सध्याच्या यष्टीरक्षकांची कामगिरी आणि …

Read More »

धोनी पुनरागमनाच्या तयारीत

रांची : वृत्तसंस्था 2019 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातील आपले स्थान गमावले आहे. आगामी टी-20 विश्वचषक आणि धोनीचे वाढते वय लक्षात घेता, त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी …

Read More »