Breaking News

Ramprahar News Team

जवानाची आत्महत्त्या

पनवेल : तळोजा येथील रॅपीड अ‍ॅक्शन फोर्समधील सुनील भोये (35) या जवानाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी कौटुंबिक कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील मृत सुनील भोये हे तळोजा येथील रॅपीड अ‍ॅक्शन …

Read More »

पीएमसी बँक ः आणखी एका खातेदाराचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही, या चिंतेत असलेल्या आणखी एका खातेदार महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. कुलदीपकौर विग (64) असे या महिलेचे नाव असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये सुमारे 17 लाख रुपये अडकले होते. दरम्यान, कुलदीपकौर या पीएमसी …

Read More »

एड्सबाधित बहिणींना भाऊबीज भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायानीतील श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण-अरविंद पाटील गेली सात वर्ष भावाच्या प्रेमापासून वंचित असणार्‍या 24 बहिणींना भाऊबीज करत आहेत. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला. एड्स आजाराची जनजागृती करून आजाराने निराश झालेल्या बाधित रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे कार्य …

Read More »

पनवेलमधील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

पनवेल : वार्ताहर परतीच्या पावसाने झालेल्या पनवेल तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल, अशीही …

Read More »

किल्ले रायगड परिसरात बिबट्याची दहशत

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड परिसरातील गावात बिबट्याची असलेली दहशत कायम असून, दोन दिवसांपूर्वी चरावयास गेलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. या भयानक हल्ल्यात तीन जनावरे ठार झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी परिसरातील एका वाडीवरील जनावरांवर सोमवारी बिबट्याने हल्ला केला. त्यात दोन शेतकर्‍यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात …

Read More »

माथेरानमधील कपाडिया मार्केटचे छप्पर कोसळले

कर्जत : बातमीदार माथेरानमधील कपाडिया मार्केटमधील ब्रिटिशकालीन मटण मार्केटचे छप्पर सोसाट्याच्या वार्‍याने पडले, मात्र रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली. माथेरानमधील कपाडिया मार्केटमध्ये भाजी मंडई, मच्छी व मटण मार्केटचा समावेश आहे. 1919मध्ये या कपाडिया मार्केटची निर्मिती करण्यात आली होती. 100 वर्षे उलटूनही हे मार्केट स्थानिकांसह पर्यटकांना भुरळ घालत होते. लाल …

Read More »

मुरूड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार, भाजप नेते अॅणड. महेश मोहिते यांची ग्वाही

मुरूड : प्रतिनिधी भाजपने अदाड गावातील विकासकामांना प्राधान्य देऊन या गावाचा विकास साधला आहे. त्याचप्रमाणे मुरूड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येताच मुरूड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील, अशी ग्वाही भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी अदाड येथे दिली. मुरूड तालुक्यातील …

Read More »

रोहे : शिवसेना, भाजप महायुतीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्रशेठ पाटील यांचे त्यांच्या निवासस्थानी कोलाड विभाग शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या वेळी विभागप्रमुख कुलदीप सुतार, युवा सेना अधिकारी नितीन खामकर, अमिर तेलंगे, ढमाले, निलेश गोरीवले, वैभव जैतपाल, संतोष पडवळ, विजय बोरकर, ज्ञानेश्वर खामकर आदी उपस्थित होते.

Read More »

जिते ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना मानाची भाऊबीज

कर्जत, कडाव : बातमीदार दिवाळी सणानिमित्त कर्जत तालुक्यातील जिते ग्रामपंचायत हद्दीमधील भवानी माता मंदिरात परिसरातील महिलांसाठी मानाची भाऊबीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे कर्जत तालुका संघटक राजेश जाधव यांच्या सक्रिय पुढाकाराने गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे राबविण्यात येत आहे.  शिवसेना शाखा जिते, ग्रुप ग्रामपंचायत जिते आणि गायत्री बहुउद्देशीय …

Read More »

किल्ले सजावट स्पर्धेत शिवदुर्ग प्रतिकृती प्रथम

पेण : प्रतिनिधी  येथील शिवप्रतिष्ठान मंडळाने आयोजित केलेल्या किल्ले सजावट स्पर्धेत चिंचपाडा येथील शिवसूर्य मंडळाच्या शिवदुर्ग प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर राहुल रमेश पाटील (तरे आळी, पेण) व विराज हुंबरे (धावटे) यांनी उभारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला.  पेण येथील शिवप्रतिष्ठानतर्फे दरवर्षी किल्ले सजावट स्पर्धेचे आयोजन …

Read More »