Breaking News

Ramprahar News Team

प्रभाकर मोरेंना अखेरचा निरोप

महाड : प्रतिनिधी माजी ग्रामविकास तथा गृहराज्यमंत्री प्रभाकर (भाऊ) मोरे यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 15) महाडच्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्व. मोरे यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाड विधानसभा मतदारसंघात विकासाची …

Read More »

गोदावरी नदीत बोट उलटली ; आंध्र प्रदेशमध्ये 12 जणांचा मृत्यू

अमरावती ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी नदीत रविवारी (दि. 15) दुपारी बोट उलटून 12 जणांचा मृत्यू झाला. बोट बुडाल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, 23 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला होता. अशातच 61 जणांना घेऊन निघालेली आंध्र प्रदेश पर्यटन विकास …

Read More »

रायगड जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा

पनवेल : बातमीदार लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 260 स्पर्धकांनी सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिला. नवीन पनवेल येथील सिडको समाज मंदिरात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मनेश्वर नायक यांच्या हस्ते झाले, तर …

Read More »

इंग्लंड दौर्‍यासाठी महिला हॉकी संघ सज्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा मारलो येथे 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान खेळली जाणार आहे. या दौर्‍यासाठी 18 जणींच्या भारतीय संघात गोलरक्षक सविता उपकर्णधार आहे. जपानमधील ऑलिम्पिकपूर्व तयारी हॉकी स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय संघातील …

Read More »

चिवे शाळेच्या दोन संघांची निवड; मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धा

पाली : प्रतिनिधी मुंबई येथे होणार्‍या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सुधागड तालुक्यातील चिवे आश्रमशाळेच्या दोन कबड्डी संघांची निवड झाली आहे. या संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. अलिबाग येथील पीएनपी संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या सर्व म्हणजे 15 तालुक्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. यात चिवे आश्रमशाळेच्या 14 …

Read More »

भारताचा लक्ष्य सेन विजेता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने द्वितीय मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेंडसेन याचा पराभव करीत बेल्जियन आंतरराष्ट्रीय चॅलेंज खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. आशियाई कनिष्ठ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणार्‍या 18 वर्षीय लक्ष्यने 34 मिनिटे रंगलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिक्टरचा 21-14, 21-15 असा पराभव केला. या यशाबद्दल लक्ष्य …

Read More »

कर्मवीर मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; पावसावर उत्साहाची मात

नवी मुंबई : प्रतिनिधी पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या 132व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कूल आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 15) कर्मवीर मॅरेथॉन घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल 1200 विद्यार्थी धावपटूंनी सहभाग घेत उदंड प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे भरपावसात खेळाडूंनी दौड …

Read More »

सोनं गाठणार 50 हजारांचा टप्पा!

मुंबई : सोन्याचे दर गगनाला भिडणार असून वर्षअखेरपर्यंत सोने प्रति तोळे 50 हजार रुपयांपर्यंत मजल मारण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. एक हजार 550 डॉलरवर असलेले प्रति औंस सोन्याचे दर दोन हजार डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने वर्तवली आहे. सध्या सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर सुमारे 39 ते 40 हजारांच्या …

Read More »

सावरोलीत सर्पदंशाने आदिवासी तरुणाचा मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात सावरोली आदिवासी वाडीतील तरुण पातळगंगा नदीवर मासेमारी करण्यासाठी गेला असताना विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 11) घडली. परशुराम कृष्णा पवार असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यावर गावठी व पारंपरिक विष उतरविण्याचे उपचार करण्यात आले. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला …

Read More »

नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी नव्या मोटार वाहन दुरुस्ती कायद्याला सर्व स्तरातून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या कायद्याला महाराष्ट्रात तुर्तास स्थगिती दिली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी (दि. 11) पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या नव्या कायद्याबाबत केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही …

Read More »