कर्जत : प्रतिनिधी पारंपारिक शेतपीक घेण्यापेक्षा कोणत्या शेतमालाचा दर चांगला आहे, ते पाहून पीक घेतल्यास शेतीचा व्यवसाय फायदेशीर ठरेल, असा विश्वास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी सोमवारी (दि. 1)व्यक्त केला. कृषिदिनाचे औचित्य साधून कर्जत प्रेस क्लबने साळोख तर्फे नीड या गावात आयोजित केलेल्या आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात …
Read More »‘स्वच्छतेच्या कामात सातत्य राखा’
पेण : प्रतिनिधी सफाईच्या बाबतीत कर्मचार्यांनी सातत्य राखावे, असे आवाहन पेणच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी सफाई कर्मचार्यांना केले. स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता सर्व्हेक्षण 2020 च्या अनुषंगाने पेण नगर पालिका सभागृहात सफाई कर्मचार्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छता सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असून, त्यामध्ये पेण …
Read More »कर्जत वंजारवाडीमध्ये वृक्ष लागवड
कडाव : प्रतिनिधी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील वंजारवाडी परिसरातील संरक्षित वन क्षेत्रात पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनल वळवी, पंचायत समिती सदस्या सुरेखा हरपुडे, अरुण हरपुडे यांच्या उपस्थितीत सोमवारी वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. 1 जुलै ते 30 ऑगष्टपर्यंत सुरु राहणार्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वंजारवाडीमधील वनविभागाच्या …
Read More »एकच लक्ष्य, 2019मध्ये 33 कोटी वृक्ष!
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यांतील संयुक्त व्यवस्थापन केलटे, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व म्हसळा वन क्षेत्र विभागाच्या माध्यमातून केलटे येथे सोमवारी (दि. 1) वृक्ष लागवड तालुक्यातील वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. म्हसळा तालुक्यात 11 लाख 64 हजार 998 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. प्रास्ताविकात वनपाल बाळकृष्ण गोरनाक यानी वनांचे …
Read More »महाडमधील निराधारांना पेन्शनचा आधार
महाड : प्रतिनिधी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच समितीचे अध्यक्ष महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाड तहसिलदार यांच्या दालनात झाली. या बैठकीत 150 निराधारांना पेन्शन मंजूर करण्यात आली. तर दाखल्यांच्या अभावी आठ अर्ज स्थगित ठेवण्यात आले. दरम्यान, निराधारांची पेन्शन 600 वरून 1000 रुपये केल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »ग्रामविकासाला चालना ; अलिबागेत जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळा उत्साहात
अलिबाग : जिमाका गावा-गावात तयार केलेल्या बचतगटांना बँकानी पतपुरवठा केल्यास बचतगटांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी निर्माण होऊन ग्रामविकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी मंगळवारी (दि.2) येथे केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्हा परिषद सभागृहात मंगळवारी जिल्हास्तरीय बँकर्स …
Read More »जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 172 मि.मि. पावसाची नोंद
अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 172.41 मि.मि पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जूनपासून एकूण सरासरी 874.70 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतचे दैनंदिन पर्जन्यमान : अलिबाग 64.00 मि.मि., पेण-214.00 मि.मि., मुरुड-145.00 मि.मि., पनवेल-234.20 मि.मि., उरण-227.00 मि.मि., कर्जत-136.00 मि.मि., खालापूर-157.00 मि.मि., माणगांव-270.00 मि.मि., रोहा-188.00 मि.मि., …
Read More »अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली ; पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी, पाच तास वाहतूक ठप्प
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला सोमवारी (दि.1) मुसळधार पावसाने झोडपले. मंगळवारी (दि.2) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे तालुकयातील जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी पहाटे वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पाच तास ठप्प झाली होती. सकाळी सव्वा नऊ वाजता पाणी ओसरल्यावर वाहतूक …
Read More »नेरळमधील रस्ते गेले पाण्याखाली
कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशन लगत असलेल्या निर्माण नगरी भागात असलेले रस्ते पावसात पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी पाडा भागातून स्टेशनकडे वाहणारे पाणी रेल्वेने नवीन मोरी खोदून निर्माण नगरी भागात सोडले आहे. त्यामुळे निर्माण नगरी भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून, नेरळ ग्रामपंचायतीने तात्पुरती सोय म्हणून नाला तयार करून पाणी वळविले …
Read More »नागोठण्यात मुसळधार पाऊस, अंबा नदीला पूर
नागोठणे : प्रतिनिधी मागील पाच दिवस संततधार पडणार्या मुसळधार पावसाने येथील अंबा नदीने पहाटे आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने एसटी बसस्थानक, मरिआई मंदिर परिसर, कोळीवाडा तसेच हॉटेल लेक व्ह्यू परिसरात पुराचे पाणी भरले होते. मंगळवारी पहाटे सहा वाजता भरलेले पुराचे पाणी दुपारी ओसरायला सुरुवात झाली असली, तरी दुपारपर्यंत नदी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper