Breaking News

Ramprahar Team

डॉ. समीर आगलावे यांचे वर्तन आदर्शवत -वाय. टी. देशमुख

पनवेल ः रामप्रहर वृत्त वैद्यकीय शिक्षणासाठी घेतलेल्या आर्थिक मदतीचा परतावा करीत डॉ. समीर श्रीपत आगलावे यांनी युवा पिढीपुढे आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन  रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 15) येथे केले. तालुक्यातील कोळवाडी येथील डॉ. समीर आगलावे यांना इंग्लडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकरिता …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त विश्वरत्न डॉ. बबासाहेब आंबेडकर यांची 131 जयंती पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांनी गुरुवारी (दि. 14) उत्साहात  साजरी झाली. जयंत्तीनिमित्त विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना माजी खासदार लाकेनेते रामशेठ ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उपस्थिती लावली. उलवे नोड येथे …

Read More »

पनवेल परिसरात मातीच्या माठांना मागणी वाढली

पनवेल ः वार्ताहर उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाणी सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठाची मागणी नागरिकांकडून सुरू होते. याच पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील नागरिकांकडून मातीच्या माठाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. माठाची मागणी वाढल्याने माठ बनविणारे कारागीर देखील कामात मग्न असल्याचे चित्र पनवेल परिसरात कुंभारवाडा परिसरात व …

Read More »

वरिहा रावल ठरली एलीट मिस इंडिया

पनवेल ः वार्ताहर डिव्हेलिशिअस मिर्सेस युनिवर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एलिट मिस इंडिया आणि मिसेस इंडिया युनिवर्स मॉडेलिंग स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील वरिहा रावल आणि अनुपम चंदन ह्या विजयी ठरल्या. वरिहा रावल हिने एलीट मिस इंडिया तर अनुपम चंदन हिने डिवॅलिशिअस मिसेस इंडिया युनिव्हर्स 2022 हा किताब पटकावला. याबद्दल त्यांचे …

Read More »

कामोठे वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

पनवेल ः वार्ताहर कामोठे वसाहतीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखांली काढलेल्या भव्य मिरवणुकीला कामोठेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी जगदीश गायकवाड यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व भिमसैनिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. वाजत गाजत, ढोल-ताशा तसेच लाठी-काठीचे प्रदर्शन करीत कामोठे …

Read More »

घारापुरी बेटाबद्दल मिळणार इत्थंभूत माहिती

28 स्थानिक युवकांना लोकल गाईडची ओळखपत्रे उरण ः रामप्रहर वृत्त घारापुरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून लेणी परिसरात खासगी सुरक्षारक्षक म्हणून तीन, तर बेटावर पर्यटकांना माहिती करून देण्याचे काम करणार्‍या 28 स्थानिक युवकांना लोकल गाईडची ओळखपत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना या लेण्यांबाबत इत्थंभूत माहिती मिळणार आहे. उरण तालुक्यातील घारापुरी लेणी या …

Read More »

नेरूळची प्रयोगशाळा ठरतेय वरदान

आतापर्यंत 11 लाख 40 हजार आरटीपीसीआर चाचण्या नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पहिल्या लाटेत नवी मुंबई महापालिकेने नेरूळ येथील रुग्णालयात केवळ 11 दिवसांत आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उभारली होती. ही प्रयोगशाळा नवी मुंबईकरांना लाभदायी ठरत आहे. या प्रयोगशाळेत आतापर्यंत 11 लाख 40 हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या …

Read More »

रायगड जिल्ह्यात गुंजला जयभीमचा नारा

अलिबाग : प्रतिनिधी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती गुरुवारी (दि. 14) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. कोविडमुळे दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करता आली नव्हती. परंतु यंदा कोविडची बंधने काढण्यात …

Read More »

मुरूडमध्ये भगवान श्री महावीर जन्मकल्याणक उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी भगवान श्री महावीर जयंतीनिमित्त येथील जैन समाजातर्फे मुरूडमध्ये गुरुवारी (दि. 14) भगवान श्री महावीर स्वामी यांचा जन्मकल्याणक उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना नियमामुळे मागील दोन वर्षांपासून कोणतीही मिरवणूक अथवा सण साजरा करता आला नव्हता परंतु यंदा नियम शिथिल होताच मुरूडमधील जैन मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी भगवान महावीर यांच्या …

Read More »

अलिबाग शहरामध्ये माणुसकी वॉकेथॉनला उत्तम प्रतिसाद

अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद आणि अलिबाग नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 14) अलिबाग शहरात माणुसकी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. याला अलिबागकरांनी चांगला प्रतिसाद दिला. आपले आरोग्य सदृढ राहण्यासाठी चालणे हे अंत्यत गरजेचे आहे. चालाल तर …

Read More »