Breaking News

Ramprahar Team

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्तीला सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल येथील महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या. पनवेल शहरातून जाणार्‍या उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात आल्याने शहर अभियंता संजय कटेकर यांच्यासोबत उड्डाणपुलावर …

Read More »

डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते राऊत क्लिनिकचे उद्घाटन

उरण, चिरनेर : प्रतिनिधी पी. पी. खारपाटील एज्युकेशनच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरदास राऊत यांचे सुपुत्र डॉ. व्हॅन्युज सुरदास राऊत यांनी सुरू केलेल्या राऊत क्लिनिकचे उद्घाटन पनवेल येथील डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते नुकतेच चिरनेर येथे करण्यात आले. दिवसेंदिवस बदलणार्‍या वातावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आजाराचे …

Read More »

हनीट्रॅपमध्ये अडकवून बांधकाम व्यावसायिकाला लाखोंचा गंडा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीने पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे. हनीट्रॅप म्हणजे आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याची गुप्त माहिती किंवा त्याच्याकडून पैसे उकळणे होय. …

Read More »

ओबीसींची जनगणना करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे जन आशीर्वाद यात्रेसाठी आले असता आगरी कोळी समाज हॉलमध्ये ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसींची जनगणना 2021मध्ये होणार असे जाहीर केले होते, परंतु कोविंड या महामारी मुळे ते चालू करता …

Read More »

नवी मुंबई कोविड लसीकरण वेगात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविड लसीकरणाला वेग देताना कोणताही समाजघटक दुर्लक्षित राहू नये याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येत असून बेघर निराधार नागरिक, तृतीयपंथी व्यक्तींचे तसेच रेड लाईट एरिया, कॉरी क्षेत्र अशा काहीशा दुर्लक्षित भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील विविध वृध्दाश्रमांमधील वयोवृध्द …

Read More »

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर बिस्कीटचा टेम्पो उलटला

कर्जत : बातमीदार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कर्जत- कल्याण राज्यमार्गावरील आषाणे गावाजवळ सोमवारी (दि. 16) पारले बिस्किटांचा टेम्पो उलटला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पारले कंपनीचे बिस्किटे भरलेला टेम्पो सोमवारी कर्जतहून कल्याणच्या दिशेने जात होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आषाणे गावाजवळ असलेल्या वळणावर …

Read More »

18000 फूट उंचीवर लोकनेते दि. बा. पाटील यांचा जयजयकार

नेरळ, बदलापूरमधील तरुणांनी झळकावला फलक कर्जत : बातमीदार नेरळ आणि बदलापूर अभियंते असलेल्या सहा तरुणांनी लेह लडाखला जाऊन समुद्र सपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर असलेल्या खरडुंगला पास येथे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा जयजयकार केला. तेथे या तरुणांनी तिरंगा झेंडा फडकवत ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, या …

Read More »

मोदी है तो मुमकीन है -केंद्रीय मंत्री कपिल पाटील

पेणच्या मूर्तिकारांसह नागरिकांशी साधला संवाद पेण : प्रतिनिधी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत असून यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 17) पेण येथे केले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी पेणमध्ये …

Read More »

रस्त्यांच्या कामात शिवसेनेचा अडथळा

नशा, मग ती कोणतीही असो, एकदा डोक्यात भिनली की, वाईटच असते. सत्तेची नशा तर सगळ्यात वाईट. त्यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे नेते किंवा कार्यकर्ते असले, तर मग बघायलाच नको. सेनेच्या बाबतीत असेच घडलेले दिसते. त्यामुळेच केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना राज्यातील महामार्गांच्या कामात अडथळे येत असल्याची तक्रार मुख्यमंत्री …

Read More »

एक राखी देशासाठी उपक्रमात राजमुद्रा फाउंडेशनचा सहभाग

धाटाव : प्रतिनिधी स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान तर्फे एक राखी देशासाठी या उपक्रम अंतर्गत दरवर्षी सीमेवरील सैनिकांना राख्या पाठविण्यात येतात. त्यासाठी राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित घाग, अध्यक्ष राजेश डाके, कार्याध्यक्ष राजेश भगत यांच्या पुढाकारातून सोमवारी (दि. 16) 100 राख्या स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानकडे सुपूर्द करण्यात आला. सुराज्य  सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष रोशन चाफेकर, …

Read More »