Breaking News

Ramprahar Team

खोपोली शिळफाटा येथील इंदिरा गांधी चौक बनतेय अपघाताचे केंद्र

खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, रस्ते मात्र अरुंद आहेत.  टपर्‍या, हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे येथील रस्ते दिवसेंदिवस अपघातग्रस्त बनत आहेत.  शिळफाटा परिसरातील इंदिरा गांधी चौक तर अपघाताचे केंद्र बनत आहे. खोपोली शहरातून मुंबई – पुणे जुना महामार्ग जातो. यात खंडाळा घाटातून शिळफाटा येथून मुंबई दिशेने जाणार्‍या एकेरी रस्त्यावर …

Read More »

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला अलिबागमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबाग : प्रतिनिधी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला अलिबागमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यानेतृखाली निघालेल्या रायगडमधील जन आशीर्वाद यात्रेस मंगळवारी (दि. 17) अलिबागमधून प्रारंभ झाला. अलिबाग शहरात या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या सोबत परिषदेतील विरोध पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा उत्तर …

Read More »

भूमीपुत्रांवर अन्याय होणार नाही -कपिल पाटील

फार्मा पार्क प्रकल्पग्रस्तांचा अलिबागेत संवाद मेळावा अलिबाग : प्रतिनिधी रोहा, मुरूड तालुक्यातील फार्मा पार्क प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असताना या प्रकल्पासाठी भूसंपादनाची घाई कशाला, असा सवाल केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेवून स्थानिक …

Read More »

बुडत्याचा पाय खोलात

ज्या सरकारचा गृहमंत्रीच खंडणीखोरीच्या प्रकरणात अडकतो, त्याला काय म्हणावे? कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. विशेष म्हणजे प्रकरण इतक्या थराला जाऊनही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चेहर्‍यावरची माशी देखील उडालेली नाही. जनमताचा कौल नाकारून मागल्या दाराने सत्तेची खुर्ची बळकावणारे हे सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बिल्कुल चलबिचल झाले नाही …

Read More »

‘ऑल इंडिया सिफेरर्स’ची वार्षिक सभा

पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स यूनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी यूनियनचे पदाधिकारी, शिपिंग क्षेत्रातील मान्यवर आणि सभासद उपस्थित होते. या वेळी संस्थापक अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्यअध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे, खजिनदार शितल शिवाजीराव मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष संग्राम सोंडगे, सभेसाठी कॅप्टन सुनील पाठक, स्वरूप …

Read More »

सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेच्या नोंदणीचा प्रारंभ

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, सिडकोने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ रविवारी (दि. 15) झाला. त्याचप्रमाणे, भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांचाही प्रारंभ या दिवशी करण्यात आला. या योजनेकरिता अर्जदारांची ऑनलाइन नोंदणी …

Read More »

खालापूरात दिराचा वहिनीवर अत्याचार

खोपोली : प्रतिनिधी दिराने वहिनीवर बळजबरी करीत दोनदा अत्याचार केल्याची घटना खालापूर तालुक्यातील ढेकू गावात घडली असून नराधम दिराला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाला 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पीडित महिला ही पती, मुले आणि दिरासह शंकर ढेकू गावातील मंदिरसमोर राहते. घरामध्ये पती व मुलांसह …

Read More »

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात आग

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत एन्डकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात सायंकाळी अचानक आग लागली. येथील पादचारी पुलावर शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेन लाईनवरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात मुंबई एन्डकडील पादचारी पुलावर सायंकाळी सात वाजता आग लागली. फारसा वापर नसलेल्या या पादचारी पुलावर सायंकाळी लागलेली …

Read More »

राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान यशस्वी करा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन पुणे : प्रतिनिधी नागरिकांना चांगले आरोग्य देता यावे यासाठी भाजपने लक्ष केंद्रित केले असून, यासाठी ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरू करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या कार्यालयात स्वातंत्र्यदिनी वेशभूषा स्पर्धा

पनवेल : वार्ताहर सालाबादप्रमाणे या वर्षीही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी 15 वर्षांखालील मुलां-मुलींसाठी खास भारतमाता आणि स्वातंत्र सैनिक या विषयावर वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याकारणाने या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व …

Read More »