Breaking News

Ramprahar Team

भाजयुमोतर्फे इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन, अरूनिता यांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर इंडियन आयडॉल विजेते पवनदीप राजन आणि अरूनिता यांचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि सहकारी यांनी विशेष सन्मान केला. दोघांची भेट भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या सागर निवासस्थानी घडवून …

Read More »

खारघरमध्ये हॉटेल व्यावसायिकाला लाखोंचा गंडा

पनवेल : वार्ताहर फिल्म इंडस्टीमध्ये अ‍ॅनिमेशन व्हीएफएक्सचे काम करत असल्याचे भासवून एका भामट्याने खारघरमधील थ्रीस्टार हॉटेलमधील दोन डिलक्स रुममध्ये आपल्या 12 वर्षीय मुलासोबत आठ महिने बस्तान मांडून हॉटेल व रेस्टॉरंटचे तब्बल 25 लाख 15 हजार रुपयांचे बिल थकवून मुलासह पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुरली मुरुगेश कामत (वय 43) …

Read More »

पनवेलमधील व्यावसायिकांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी

नगरसेविका दर्शना भोईर यांचे आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 19 मधील रोजबाजार व मच्छीमार्केटमधील व्यावसायिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी पनवेल आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू असून, महापालिका हद्दीतील विविध ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर …

Read More »

रक्कम दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणार्याचा पोलिसांकडून शोध

पनवेल : वार्ताहर फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवलेली रक्कम चार वर्षांत दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने पनवेल व आजूबाजूच्या भागातील अनेक व्यक्तींकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. निनाद खानावकर असे या भामट्याचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध …

Read More »

माथाडींना 20 हजार लसींच्या मात्रा उपलब्ध करून देऊ

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ‘माथाडी कामगार नसेल तर बाजार चालणार नाही, लोक जगू शकणार नाहीत म्हणूनच माथाडी कामगारांचे करोना लसीकरण प्राधान्याने झाले पाहिजे. यामुळे माथाडी कामगारांसाठी 20 हजार लशींच्या मात्रा उपलब्ध करून देऊ,’ असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथील ‘माथाडी भवन’मध्ये दिले. …

Read More »

नवी मुंबईत कोरोना लसीकरण मोहीम जोरात

पहिल्या डोससाठी विशेष सत्राचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिक लसीकरणाद्वारे संरक्षित व्हावेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लसीकरण सत्रांचे नियोजन केले जात आहे. 31 ऑगस्ट रोजी 20,500 डोसेस उपलब्ध झाल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार 18 ते 30 वयोगटातील …

Read More »

माणगाव स्टेशनमधील समस्या सोडवाव्यात

रेल्वे प्रवासी संघटनेचे कोकण रेल्वेच्या प्रबंध निर्देशकांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी तालुका रेल्वे प्रवासी संघटना आणि मेवाड युवक मंडळाच्या प्रतिनिधींनी बुधवारी (दि.1) माणगाव रेल्वे स्थानकांत कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता यांची भेट घेवून स्थानकातील प्रवासी समस्या व सुविधांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. कोकण रेल्वेचे प्रबंध निर्देशक संजय गुप्ता …

Read More »

पेण-खोपोली बायपासवर कार व ट्रकची ठोकर

पेण : प्रतिनिधी पेण-खोपोली बायपासवरील गणपतीवाडी येथे मंगळवारी (दि. 31) कार आणि ट्रकची ठोकर झाली.  या अपघातात कार चालक सुरेश कदम (रा. गणपतीवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. पेण-खोपोली बायपास मार्गावर पनवेलच्या दिशेने जाणारी कार (एमएच-06,बीई-3242) आणि समोरून येणार ट्रक (एमएच-12,आरएन-2393) यांची मंगळवार समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात कार चालक सुरेश …

Read More »

राज्य शासनाच्या अनियमिततेचा शिक्षण व्यवस्थेला फटका -अमर वार्डे

पेणमध्ये गुणीजनांचा सत्कार पेण : प्रतिनिधी  राज्य सरकारच्या अनियमित कारभारामुळे शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली असून त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणार असल्याची भीती दत्ताजी खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी पेण येथे व्यक्त केली. पेण येथील सोबती संस्था व बापूसाहेब नेने फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने विविध …

Read More »

पालीतील नवीन बसस्थानकाच्या बांधकामास मुहूर्त काही मिळेना!

इमारत पाडली, पुनर्बांधणी रखडली! पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली येथील मोडकळीस आलेल्या एसटी बसस्थानकाची इमारत पाच महिन्यांपूर्वी पाडण्यात आली आहे, मात्र त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणीस अजूनही सुरुवात झालेली नाही. दरम्यान, बसस्थानक इमारती अभावी प्रवासी व परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षे धोकादायक स्थितीतल्या पाली बसस्थानकाची …

Read More »