कर्नाळा पक्षी अभयारण्यातील वन्यजीव असुरक्षित; महामार्गावर प्राण्यांचे वारंवार अपघात पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरात प्राणी सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. अभयारण्यातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारच्या अंतर्गत करोडो रुपये खर्च करून मुंबई-गोवा महामार्गावर प्राणी येणार नाहीत यासाठी महामार्गाच्या दुतर्फा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, परंतु या …
Read More »बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त वार्यावर
नागरी सुविधांसह गुणांकाची राहिलेली रक्कम त्वरित द्यावी, बाधित शेतकर्यांची मागणी पेण ़: प्रतिनिधी तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम 2010 पासून सुरू आहे. मात्र प्रकल्पबाधित गावांचे पुनवर्सन झाले नाही. तसेच जमिनीवर भूसंपादन शिक्का असल्याने शेतकर्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा तसेच संपादित जमिनीच्या गुणांकाची राहिलेली …
Read More »श्री भायदेच्या धैर्याला राज्यपालांची शाबासकी
राजभवनावर केला सन्मान रेवदंडा ़: प्रतिनिधी काशीद पुल दुर्घटनेत अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या भायदे कुटूंबियांचे प्राण वाचवून असीम धैर्याचे दर्शन घडविणार्या श्री भायदे (वय 10) या मुलाचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच राजभवनावर सन्मान करण्यात आला. सागर मनोहर भायदे (ऐरोली, नवी मुंबई) हे 11 जुलै रोजी त्यांच्या मालकीच्या इर्टिगा कार …
Read More »गोवंश हत्याप्रकाराविरोधात भाजप आक्रमक
आरोपींवर कठोर कारवाई करावी, माणगाव पोलिसांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी गोवंश हत्या करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या गोवंश हत्या करणार्या आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी व अशा घटनांना आळा घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी शुक्रवारी (दि. 20) माणगाव पोलीस ठाण्याला निवेदनाद्वारे …
Read More »पेणमध्ये सफाई, अग्निशमन दल कर्मचार्यांचा गौरव
पेण : प्रतिनिधी महाडमधील पूरग्रस्त भागात साफसफाईचे काम केलेल्या पेण नगर परिषदेच्या सफाई व अग्निशमन दल कर्मचार्यांचा येथील रोटरी क्लबच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. महाडमधील पूरग्रस्तांसाठी पेण नगरपालिका कर्मचार्यांनी केलेले काम मोलाचे असल्याचे गौरवोद्गार रोटरी क्लब अध्यक्ष सचिन शिगवण यांनी या वेळी काढले. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण …
Read More »कोळी बांधव नारळी पौर्णिमेसाठी सज्ज
श्रीवर्धन : प्रतिनिधी समुद्रात मासेमारी करून आपला चरितार्थ चालविर्या कोळी समाजाचा नारळीपौर्णिमा हा महत्वाचा व मोठा सण असतो. श्रीवर्धन तालुक्यामध्ये नारळी पौर्णिमाच्या 15 दिवस अगोदर मच्छीमार बांधव तांब्या किंवा कळशी भरून समुद्राचे पाणी घरी आणतात. देवघरात ठेवलेल्या या कलशाची ते पधंरा दिवस मनोभावे पूजा करतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र खवळलेला असतो. …
Read More »अलिबागमध्ये ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान
अलिबाग : प्रतिनिधी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आलिबाग फोटोग्राफर्स अॅण्ड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि. 19) येथील ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील आणि नितीन पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अलिबाग असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, वह्या वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबिर असे विविध कार्यक्रम …
Read More »दुकानात धान्य असूनही वितरणास अडथळा
दुकानदारांना ‘पॉस’ ठरतेय डोकेदुखी मुरूड : प्रतिनिधी पॉस मशीनमध्ये ऑनलाइन धान्य वितरणाचा डेटा न टाकल्यामुळे मुरूडमधील रेशन दुकांनातून शिधापत्रिकाधारकांना तीन आठवडे उलटून गेले तरीही ऑगस्ट महिन्याचे धान्य मिळालेले नाही. त्यामुळे जनतेमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. मुरूड शहरात चार रेशन दुकाने असून या दुकानातून दर महिना शहरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना पॉस …
Read More »कोरोनानंतर शाळा सुरू होताना…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तब्बल पंधरा महिन्यापासून शाळा बंद आहेत. शास्त्रज्ञांच्या संशोधनाला मिळालेल्या यशानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसी निघालेल्या आहेत. 18 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध झाली असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. मात्र अजूनही आपली 18वर्षाखालील बालके लसीपासून वंचित आहेत. कोरोना काळात शाळा बंद असल्याने, मुलांनी फक्त आपल्या आई, वडील …
Read More »खेळाडूंना प्रोत्साहित केल्याबद्दल कपिल देवकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच टोकियो ऑलिम्पिक 2020साठी गेलेल्या सर्व खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या खेळाडूंना शाळांमध्ये जाऊन तरुणांना प्रेरित करण्यास सांगितले आणि पालकांनाही क्रीडा क्षेत्रात तरुण पिढीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी केलेल्या या भेटीचे देशभर कौतुक होत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper