Breaking News

Ramprahar Team

‘तसे’ करणे अपमानास्पद होते -मरिन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील निराशाजनक कामगिरीमुळे 2018मध्ये पुरुष संघाची जबाबदारी काढून घेत महिला संघाची देणे हा निर्णय अपमानजनक होता, असे मत भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी व्यक्त केले आहे. नेदरलँड्सचे माजी हॉकीपटू मरिन 2017मध्ये भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात …

Read More »

अखेर केरळ सरकारला उपरती

ऑलिम्पिक खेळाडूंना जाहीर केले मोठे बक्षीस तिरुअनंतपूरम ः वृत्तसंस्था ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेशला अखेर केरळ सरकारने मोठे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या खेळाडूंवर त्यांच्या राज्यातील सरकारांनी बक्षिसांचा वर्षाव केला असतानाच दुसरीकडे केरळ सरकारने कोणतेही बक्षीस जाहीर न केल्याने नाराजी व्यक्त …

Read More »

लॉर्ड्सवरही पावसाची बॅटिंग

इंग्लंडविरुद्ध भारताची दमदार सुरुवात लंडन ः वृत्तसंस्था भारत-इंग्लंड दुसर्‍या कसोटी सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार बुधवारी (दि. 12) लॉर्ड्सवरील कसोटीत पाऊस पडण्याची तुरळक शक्यता वर्तवण्यात आली होती, पण पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावली अन् खेळ उशीरा सुरू करावा लागला. त्यानंतर पावसामुळेच सहा मिनिटे आधी लंच …

Read More »

तंदुरुस्त श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळणार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा कौशल्यवान फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल. मुंबईच्या 26 वर्षीय श्रेयसला मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. इंग्लंडमध्ये श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) …

Read More »

नीरजचा आणखी एक पराक्रम

जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी झेप हरियाणा ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचणार्‍या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नावे आणखी एका पराक्रमाची नोंद झाली आहे. सुवर्णपदक जिंकल्यामुळे नीरज चोप्राच्या गुणसंख्येत वाढ झाली असून जागतिक क्रमवारीत त्याने दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. नीरजची गुणसंख्या 1315 असून जर्मनीचा जोहान्स 1396 गुणांसहित पहिल्या क्रमांकावर …

Read More »

रायगडातील पूरग्रस्तांना लायन्स क्लबचा मदतीचा हात

अलिबाग : प्रतिनिधी महाड तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना लायन्स क्लबतर्फे जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.  अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात दरडी कोसळल्या. त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेक घर कासळली. पूरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. लायन्स क्लब ऑफ …

Read More »

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्या शाळेच्या विरोधात पालक आंदोलनाच्या पावित्र्यात

कर्जत : बातमीदार शाळेची फी भरली नाही म्हणून नेरळ येथील एलएईस शाळेतील 200 विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या बाबत कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे दाद मागूनही कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक शाळेच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. शाळेची फी भरली नाही, म्हणून नेरळ येथील लॉर्ड …

Read More »

नेरळ एसटी स्टँडकडे जाणार्या रस्त्याची साईडपट्टी गेली वाहून

रस्त्याला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी कर्जत : बातमीदार नेरळ एसटी स्टँडकडे जाणार्‍या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून साईडपट्टी बनविण्यात आली होती. मात्र जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत माती वाहून गेल्याने या रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खचली आहे.दरम्यान,रस्त्याच्या खालील भागात रायगड जिल्हा …

Read More »

बोरघाटात मैद्याचा ट्रक उलटला

खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावर बोरघाटातील मेकॅनिकल पॉईंटजवळ मैदा भरलेल्या पोत्यांचा ट्रक रस्त्यावरच उलटला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली, ही वाहतूक अन्य मार्गांनी वळवावी लागली. मैद्याची पोती भरलेला ट्रक पुण्याकडून मुंबईकडे जात होता.बोरघाटातील मेकॅनिकल पॉईंटजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यातच आडवा झाला. सुदैवाने या अपघातात …

Read More »

एमआयडीसीबाधित शेतकर्यांची भूमिका शासनाकडे मांडणार -आमदार रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील नियोजीत डोलवी औद्योगिक वसाहतीला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध असून, त्याबाबत लवकरच  संबंधित मंत्री आणि अधिकार्‍याकडे बैठक लावून शेतकर्‍यांची भूमिका शासनाकडे मांडण्यात येईल, अशी ग्वाही पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी दिली. डोलवी औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत पेण तालुक्यातील काराव, गडब, डोलवी, वडखळ बोरी ग्रामपंचायत …

Read More »