खोपोली : प्रतिनिधी युवा नेते अक्षय शणमुगम यांची खोपोली भाजपच्या दक्षिण भारतीय सेलच्या संयोजक पदी निवड करण्यात आली. त्यांना जिल्हा महिला आघाडी प्रमुख अश्विनी पाटील, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या हस्ते नियूक्तीपत्रक देण्यात आले. या वेळी शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, जिल्हा कामगार सेलचे सह संयोजक सुर्यकांत देशमुख, …
Read More »स्वत:सह परिवाराची काळजी घ्या
पनवेल पालिका आयुक्तांचे अधिकार्यांना आवाहन पनवेल : प्रतिनिधी महापालिकेच्या विविध विभागातील कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि .2) झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिकार्यांनी स्वत:ची व स्वत:च्या परिवाराची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापौर बंगल्याचे बांधकामाचे काम हाती घेण्याच्या दृष्टीने …
Read More »सव्वा दोन कोटींची वाहने हस्तगत
दोन जणांच्या मुसक्या आवळल्या पनवेल : वार्ताहर मोटार गाड्यांची फसवणुक व अपहार करणार्या दोन आरोपींच्या मुसक्या नेरूळ पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्या अटकेमुळे सात गुन्ह्यांची उकल करून 31 चार चाकी वाहने (किंमत दोन कोटी दहा लाख रुपये) हस्तगत करण्यात आली आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात वाहन फसवणुकीसंदर्भात गुन्हा नोंद (गुन्हा नोंद क्रं. …
Read More »खोटे बोलणारे सरकार
चंद्रकांत पाटील यांची ‘मविआ’वर हल्लाबोल पुणे : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत अद्याप राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोटे बोलणारे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार, असा हल्लाबोल केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या …
Read More »आश्वासनांचा महापूर
रोजचा खर्च भागवण्यासाठी एक दमडी देखील नाही आणि पुढला आठवडाभर तरी बँका सुरू होण्याची शक्यता नाही, अशा स्थितीत महापुरात सर्वस्व गेलेेल्या हजारो कुटुंबांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. 10 हजार रुपयांची तत्काळ मदत राज्य सरकारने तातडीने जाहीर केली असली, तरी एक नवा पैसा देखील पूरग्रस्तांच्या हाती लागलेला नाही. हे …
Read More »नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून महाडकरांना मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व जाणीव एक सामाजिक संस्थाचे संस्थापक नितीन जयराम पाटील यांच्याकडून महाड येथील पूरग्रस्तांना तांदूळ, दोन डाळी, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, अशी शिधासामुग्री देण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगरी यांच्या माध्यमातून ही …
Read More »‘इ स्टोर इंडिया’ची पूरग्रस्तांना मदत
पनवेल : प्रतिनिधी इ स्टोर इंडिया या सुपर बाजारच्या पनवेलच्या मालक व कार्यकर्त्या रेणुका पन्हाळे यांनी महाड येथील पूरग्रस्त बांधवाना मदतीचा हात दिला आहे. पनवेल शहरातील टपालनाका येथील मोमीनपाडामधील साई सारंग कॉ ऑप. हौ. सोसायटी या ठिकाणी सर्वांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता वेदिक आयुरकेअर कंपनीने इ-स्टोर इंडिया …
Read More »वडाळे तलावाच्या रस्त्यावर थर्मोप्लास्ट गतिरोधक
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या वडाळे तलावाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. नवीन पनवेलकडून जुन्या पनवेल आणि अमरधामकडे जाणारा हा रस्ता सुस्थितीत असल्याने वाहन चालक व बाईक स्वार वेगाने गाड्या चालवत असल्याची बाब काही सतर्क नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. …
Read More »भाजपच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील रहिवासी श्री देविदास जाधव हे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातून 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्काराचा कार्यक्रम भाजप कळंबोली आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक कमल कोठारी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कळंबोली शहर सरचिटणीस …
Read More »नवी मुंबईत वाढवल्या कोरोना चाचण्या
संभाव्य तिसर्या लाटेसाठी उपाययोजना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन ‘ब्रेक द चेन’ अर्थात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत जुलै महिन्यात तब्बल दोन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper