पाच जणांचा मृत्यू 245 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 11) कोरोनाचे 216 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 184 रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 162 रुग्ण बरे …
Read More »बैल कापून त्याची विक्री करणार्या एकास अटक
पनवेल : वार्ताहर बेकायदेशीररित्या दोन बैल कापून त्यांच्या मासांची विक्री करणार्या चौघांपैकी एकाला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने रिक्षासह पकडले असून इतर तिघांचा पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या बैल कापून त्यांच्या मासांची विक्री केली जात असल्याच्या …
Read More »गुजरातवरून विक्रीसाठी आलेला तब्बल 35 लाखांचा गुटखा जप्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गुजरातमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र, ट्रकमधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने रबाळे एमआयडीसी येथे छापा टाकून कारवाई करीत 35 लाखांचा गुटखा, 14 लाख रुपये किमतीची तीन वाहने असा 49 लाख 53 हजार रुपये …
Read More »राज्य सरकारच्या विरोधात आज आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अत्याचाराबाबत राज्य सरकार निष्क्रिय व उदासिन आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सुचनेनूसार सोमवारी (दि. 12) आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणार्या अत्याचाराचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील सरकार अत्याचार थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महिलांची सुरक्षितता …
Read More »बर्निंग कारचा थरार
उरण : वार्ताहर उरण शहरातील कोटनाका येथील क्सिस बँकेच्या समोर पार्कींग करुन ठेवण्यात आलेली शिफ्ट डिझायर या चारचाकी गाडीला शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक पेट घेतला. भर बाजारपेठेतील वर्दळीच्या रस्त्यावरच अचानक पेटलेल्या गाडीमुळे रस्त्यावरील पादचार्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.आगीमुळे दुचाकींना धोका पोहचण्यापुर्वीच अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानाने तत्काळ आग आटोक्यात …
Read More »नवी मुंबई पालिका करणार एचएफएनसी यंत्राची खरेदी
प्राणवायूची नितांत गरज असलेल्या रुग्णांना ठरणार संजीवनी पनवेल : बातमीदार कोरोनाबाधित रुग्णाला दुसर्या टप्प्यात प्राणवायूची गरज भासत असल्याचे आढळून आले आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमीत कमी व्हावा यासाठी पालिकेने आरोग्य यंत्रणेत अनेक बदल करण्याचे ठरविले असून यासाठी काही निष्णांत डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. प्राणवायूची नितांत गरज असलेल्या कोरोनाबाधित …
Read More »सामाजिक उपक्रमातून नवरात्र उत्सव साजरा करावा -सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार
मुरुड : प्रतिनिधी येथील जनतेने गणपती उत्सवात मोठे सहकार्य करून पोलिसांना मदत केली होती. त्याच प्रमाणे येणारा नवरात्र उत्सव सामाजीक भान राखून समजुतदारपणे साजरा करावा, असे आवाहन मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी येथे केले. नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक तत्वाची माहिती जनतेला व्हावी, यासाठी मुरुड पोलीस …
Read More »रोहे तालुक्यात बहरली भातशेती
कापणीची लगबग सुरु; पावसाचे सावट कायम रोहे ः महादेव सरसंबे यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रोहे तालुक्यात भातशेती बहरली आहे. बळीराजाचे पिवळे सोने तयार झाले असून, तालुक्यात काही ठिकाणी कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाचे सावट असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यात यंदा काही प्रमाणात भातशेती क्षेत्र वाढले आहे. रोहे तालुक्यात …
Read More »थंडीच्या दिवसांत जपा आरोग्य
आरोग्य प्रहर थंडीच्या दिवसांत भूक वाढून पचनशक्तीही सुधारते. हवेतील बदलामुळे सर्दी-खोकलाही होऊ शकतो. एकीकडे सकाळी अंथरुणातून बाहेर पडायला जिवावर येते, तर दुसरीकडे व्यायाम करायला उत्साहही वाटतो. तापमान घसरल्यावर आपल्याला भूक लागते व काही खाल्ले की शरीरात ऊर्जा तयार होऊन आपल्याला बरे वाटते. या मोसमात आहाराबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. थंडीत …
Read More »नागोठण्यात तुफान पर्जन्यवृष्टी; भातशेती धोक्यात
नागोठणे : प्रतिनिधी चित्रा नक्षत्रास प्रारंभ होताच शनिवारी (दि. 10) दुपारी दोन वाजल्यापासून वातावरणात अचानक बदल होऊन नागोठणे परिसरात पावसाचे विजांच्या कडकडाटासह आगमन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अर्धा ते पाऊण तास तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतात कापणी केलेल्या भातपिकाला धोका पोहोचला असून, तयार धान्य भिजून गेले आहे. त्यामुळे हातात आलेले पीक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper