सहा जणांचा मृत्यू 280 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 2) कोरोनाचे 311 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 260 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »सामाजिक कार्यकर्त्याला धमकी
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा अभयारण्य परिसरातील वृक्षतोडीप्रकरणी तुम्ही हस्तक्षेप करू नका, अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला गेला. तारा गावात राहणार्या दोघांविरोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाळा ग्रामपंचायत परिसरात रूपतारा फार्म येथे 12 एक …
Read More »उरण नगरपरिषदेतर्फे गांधी व शास्त्री जयंती साजरी
उरण : वार्ताहर उरण नगरपरिषद उरण यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री यांची जयंती उरण नगरपरिषद वतीने शुक्रवार (दि. 2) ऑक्टोबर रोजी ठिक-ठिकाणी साजरी करण्यात आली. उरण नगरपरिषद, गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा व मोरा (उरण) येथील माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे साबण वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावावर रोख घालण्याकरिता हात साबणाने साफ करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यापार्श्वभुमीवर पनवेल महापालिका चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महापालिकेतील सफाई कर्मचार्यांना महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत साबण वाटप करण्यात आले. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना महामरीचा प्रसार वेगाने होत आहे. त्यापार्श्वभुमीवर पनवेल …
Read More »भाजप कामोठे मंडळतर्फे स्वच्छता अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कामोठे मंडळ युवा मोर्चा तर्फे मायक्का मंदिर से-35 व शिवम कॉम्प्लेक्स समोरचे मैदान जेसीबी डंपरच्या साहाय्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर युवकांमध्ये स्वच्छतेप्रति जनजागृती निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी …
Read More »रानसई धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव
उरणकरांची पाणी टंचाईची समस्या सुटणार; धरणाची क्षमता दुपटीने वाढणार उरण : प्रतिनिधी मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या उरण परिसराला पाणी पुरवठा करणार्या रानसई धरणाची उंची वाढविण्याच्या नव्याने प्रस्तावाच्या तयारीला एमआयडीसी लागली आहे. तहानलेल्या दिड लाख लोकसंख्येच्या उरणकरांना भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार असुन या प्रकल्पावर 100 कोटी …
Read More »दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद
अलिबाग : प्रतिनिधी दरोडे टाकणारी आंतराज्यीय टोळी रायगड पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून एकूण 45 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने 14 सप्टेंबर रोजी पेण-खोपोली मार्गावर गागोदे येथे दरोडा टाकला होता. नागोठणे येथील सुप्रीम कंपनीचा एक ट्रक प्लास्टिकचे दाणे भरलेल्या गोण्या घेऊन चेन्नईला निघाला होता. …
Read More »पर्यटनाला हिरवा कंदील
रस्ते, समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजणार पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यासह कोकणचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारित आहे. रायगड जिल्ह्यात प्रख्यात पर्यटनस्थळे व निसर्गरम्य सागरी किनारे आहेत. यंदा कोरोनाच्या महामारीत पर्यटन ठप्प झाल्याने व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला, मात्र अनेक महिन्यांनी पुन्हा पर्यटनाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आता गजबजू लागली आहेत. …
Read More »एकदरात भीषण पाणीटंचाई
आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त मुरूड ः प्रतिनिधी मुरूड शहराच्या अगदी जवळ असणार्या एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सध्या आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सुमारे 3500 लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला आंबोली धरणातून पाणीपुरवठा होतो. आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने …
Read More »जागतिक पर्यटन दिनानिमित्त वृक्षारोपण
कर्जत ः बातमीदार जागतिक पर्यटनदिनानिमित्त येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमधील पर्यटकांनी वृक्षारोपण केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माथेरानमधील रिसॉर्ट व्यवस्थापनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थापक अमोल भारती यांनी रिसॉर्टमधील पर्यटकांना जागतिक पर्यटन दिनाचे महत्त्व पटवून देऊन जास्तीत जास्त पर्यटकांनी उपक्रमात सहभागी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper