Breaking News

Ramprahar Team

थंडीच्या दिवसांत जपा आरोग्य

आरोग्य प्रहर थंडीच्या दिवसांत भूक वाढून पचनशक्तीही सुधारते. हवेतील बदलामुळे सर्दी-खोकलाही होऊ शकतो. एकीकडे सकाळी अंथरुणातून बाहेर पडायला जिवावर येते, तर दुसरीकडे व्यायाम करायला उत्साहही वाटतो. तापमान घसरल्यावर आपल्याला भूक लागते व काही खाल्ले की शरीरात ऊर्जा तयार होऊन आपल्याला बरे वाटते. या मोसमात आहाराबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. थंडीत …

Read More »

नागोठण्यात तुफान पर्जन्यवृष्टी; भातशेती धोक्यात

नागोठणे : प्रतिनिधी चित्रा नक्षत्रास प्रारंभ होताच शनिवारी (दि. 10) दुपारी दोन वाजल्यापासून वातावरणात अचानक बदल होऊन नागोठणे परिसरात पावसाचे विजांच्या कडकडाटासह आगमन झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अर्धा ते पाऊण तास तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतात कापणी केलेल्या भातपिकाला धोका पोहोचला असून, तयार धान्य भिजून गेले आहे. त्यामुळे हातात आलेले पीक …

Read More »

प्रलंबित वेतनासाठी पेणमध्ये एसटी कामगार संघटनेचे आत्मक्लेश उपोषण

पेण : प्रतिनिधी प्रलंबित वेतन त्वरित मिळावे व एसटी कामगारांना दरमहा देय तारखेला पूर्ण वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 9) पेण रामवाडी येथील एसटी विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण करण्यात आले. एसटी कामगारांचे प्रलंबीत तीन महिन्याचे वेतन 7 ऑक्टोंबरपर्यंत न मिळाल्यास …

Read More »

घोटाळ्याचा फुसका बार

मुंबई पोलिसांना आणि राज्यातील आघाडी सरकारला कायम धारेवर धरणार्‍या एका इंग्रजी वाहिनीवर टीआरपी घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन मराठी मनोरंजन वाहिन्यादेखील या प्रकरणात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. टीआरपीचा हा तथाकथित घोटाळा हास्यास्पद मानून सोडून द्यायचा की याला सुडाचे राजकारण म्हणायचे हे यथावकाश स्पष्ट होईलच. जगातील सर्व समस्या संपल्याप्रमाणे …

Read More »

पनवेल तालुक्यात 247 नवे कोरोनाबाधित

एकाचा मृत्यू; 286 रुग्णांची कोरोना संसर्गावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 9) कोरोनाचे 247 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 286 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 196 रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 231 रुग्ण बरे झाले आहे. पनवेल …

Read More »

माणगाव तालुक्यात भातकापणीला सुरुवात

शेतात पाणी तुंबल्याने कामात अडथळा माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भातपिके तयार झाली असून, कापणीच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र परतीच्या पावसाचे पाणी शेतात तुंबून राहिल्याने कापणीच्या कामात शेतकर्‍यांना अनंत अडचणी येत आहेत. कोरोनाचे सावट तसेच निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचाही फटका बसला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तालुक्यातील भातशेती कापणीस …

Read More »

नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा -दादासाहेब घुटुकडे

नागोठणे : प्रतिनिधी आपल्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत असला तरी त्याचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवास 17 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, या सणाबरोबरच ईद ए मिलाद तसेच आगामी काळात येणारे सण साधेपणने साजरे करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांन केले. नवरात्रोत्सव तसेच येणार्‍या …

Read More »

कोरोना काळातही सेवा देणार्या शिक्षकांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाकाळात मास्क स्क्रिनिंग तसेच ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी करणे, आरोग्य केंद्रांवरील ड्युटी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन तास या दुहेरी जबाबदार्‍या प्रामाणिकपणे बजावून सुद्धा नवी मुंबईतील ठोक मानधनावर कार्यरत शिक्षक महापालिकेकडून तसेच राज्यसरकारकडून दुर्लक्षित केले जात असल्याने ह्या शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे. दरम्यान, …

Read More »

नवी मुंबईत बस स्थानकांवर लांबच लांब रांगा

पनवेल : बातमीदार टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व व्यवहार आता पूर्ववत सुरू झाले आहेत. नागरिकांनाही आता कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र या शहरांची जीवनवाहिनी असलेली लोकल मात्र अद्याप सुरू करण्यात न आल्याने नवी मुंबईतून मुंबई, ठाण्यात प्रवास करताना नोकरदारांचे नाकेनऊ येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्व ताण …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे उद्घाटन

उरण : वार्ताहर उरण शहरातील भाजप कार्यालयाजवळ असलेल्या श्री समर्थ कृपा फोटो स्टुडीओचे गुरुवारी (दि. 8) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्टुडीओचे मालक राहुल कांबळे यांनी आमदार बालदी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर …

Read More »