Breaking News

Ramprahar Team

सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा!

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे आवाहन पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोळवाडी येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले. सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा असा संदेश देत सुमारे 40हून अधिक कुटुंबांना गुरुवारी (दि. 9) कोळवाडी येथे वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास …

Read More »

उरणमध्ये कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. उरण नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उरण शहरातील कोट नाका येथे बुधवारी (दि. 8) निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निर्जंतुकीकरण कक्षात सोडियम हायपोक्लोराईडचा वापर केला असून नागरिकांनी निर्जंतुकीकरण कक्षाचा वापर करताना कक्षात …

Read More »

खारघरमधील घरकुल सेक्टर 15 कंटेन्मेंट झोन जाहीर

पनवेल : प्रतिनिधी खारघरमध्ये बुधवारी (दि. 8) संध्याकाळपर्यंत कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ही अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. राज्यात कोरोना विषाणू (कोविड-19) रोखण्यासाठी साथ रोग अधिनियम कायदा 1897 लागू करण्यात आलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करून महापालिका आयुक्तांनी खारघरमधील घरकुल सेक्टर 15 कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.  …

Read More »

आदिवासीवाडीतील 40 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वळवली, सागवाडी (ता. पनवेल) : सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आदिवासीवाडीतील 40 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी पोलीस नाईक माधव शेवाळे, पोलीस शिपाई दत्ता पाटील, महिला पोलीस नाईक नीलिमा म्हात्रे, वळवली गावचे माजी सरपंच विश्वास पेटकर उपस्थित होते.

Read More »

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाची ऑनलाइन लेक्चर्स

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदिन लेक्चर्स बंद आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर शैक्षणिक वर्ष संपण्यास अत्यंत कमी अवधी उरेल आणि मग घाईघाईने अभ्यासक्रम पूर्ण करावा लागल्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये याकरिता पनवेलच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी …

Read More »

रानसईच्या आदिवासींवर उपासमारीचे संकट

अन्नधान्याच्या कमतरतेने एकदाच जेवत असल्याची व्यक्त केली खंत; प्रशासनाचे दुर्लक्ष उरण : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यावर ठोस उपाययोजना म्हणून सर्वच सेवा बंद केल्या आहेत. गेले 10 ते 15 दिवस शहरात अथवा शेजारच्या गावातही जाता येत नसल्यामुळे रानसई आदिवासी …

Read More »

गंभीर होण्याची गरज

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात सामाजिक आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही मोदीजींनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी बुधवारी लोकसभा व राज्यसभेतील विविध पक्षांच्या नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. देशातील एकूण एका व्यक्तीचा जीव वाचवण्याला आपले सरकार प्राधान्य देत आहे, हे मोदीजींचे उद्गार केंद्रातील सरकारचे लक्ष्य …

Read More »

भागधारकांना सहाय्य करून जेएनपीटीत अत्यावश्यक सेवा

उरण : वार्ताहर भारत सरकारच्या नौकानयन मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशामध्ये पुरवठा साखळी (सप्लाय चेन) चालू ठेवण्यासाठी बंदर क्षेत्र हे अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले गेले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारताचे एक प्रमुख बंदर असून आवश्यक सेवांच्या कक्षेत येते त्यामुळे जेएनपीटीच्या सर्व टर्मिनल्सचे कार्य सुरूच राहील. जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय …

Read More »

मोहोपाडा परिसरात जंतुनाशक फवारणी

मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात टँकरच्या साहाय्याने जंतुनाशक औषध फवारणी करुन परिसर निर्जंतुक करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी नागरिकांना कोरोना विषाणुबाबत मार्गदर्शन व घ्यावयाची खबरदारी यावर सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश बाबूराव खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्याकडून मार्गदर्शन …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत धान्याचे वितरण

नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू नाका कामगार, दगडखाण कामगार यांना बुधवारी (दि. 8) तुर्भे येथील डॉ. आंबेडकरनगर, हनुमाननगर, व इंदिरानगर परिसरात 3000 किलो तांदूळ, 300 लिटर खाद्यतेल व 300 किलो डाळ अशा मोफत धान्याचे  वितरण करण्यात आले. हे  धान्यवाटप स्थानिक …

Read More »