उरण : वार्ताहर भारत सरकारच्या नौकानयन मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशामध्ये पुरवठा साखळी (सप्लाय चेन) चालू ठेवण्यासाठी बंदर क्षेत्र हे अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले गेले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारताचे एक प्रमुख बंदर असून आवश्यक सेवांच्या कक्षेत येते त्यामुळे जेएनपीटीच्या सर्व टर्मिनल्सचे कार्य सुरूच राहील. जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय …
Read More »मोहोपाडा परिसरात जंतुनाशक फवारणी
मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात टँकरच्या साहाय्याने जंतुनाशक औषध फवारणी करुन परिसर निर्जंतुक करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी नागरिकांना कोरोना विषाणुबाबत मार्गदर्शन व घ्यावयाची खबरदारी यावर सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश बाबूराव खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्याकडून मार्गदर्शन …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत धान्याचे वितरण
नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू नाका कामगार, दगडखाण कामगार यांना बुधवारी (दि. 8) तुर्भे येथील डॉ. आंबेडकरनगर, हनुमाननगर, व इंदिरानगर परिसरात 3000 किलो तांदूळ, 300 लिटर खाद्यतेल व 300 किलो डाळ अशा मोफत धान्याचे वितरण करण्यात आले. हे धान्यवाटप स्थानिक …
Read More »प्रवीण पाटील यांच्या वाढदिवशी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
खारघर : पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी बुधवारी त्यांच्या वाढदिवशी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अशाचप्रकारे मंगळवारी त्यांनी त्यांचा मुलगा हर्षिल याच्या वाढदिवसानिमित्तही वस्तूंचे वाटप केले होते. अमर म्हात्रे यांच्या पुढाकाराने बँकांमध्ये सॅनिटायझर फवारणी उलवे नोड : वहाळ ग्रामपंचायत व उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या पुढाकाराने परिसरातील बँकांमध्ये …
Read More »पत्रकार संघर्ष समितीकडून गोरगरीब आणि दानशूरांना आवाहन
पनवेल : वार्ताहर उपासमारीमुळे कोणाचा बळी जाऊ नये, या हेतूने पनवेलमधील पत्रकारांची सेवाभावी संस्था पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्याकडून ज्या ठिकाणी खरोखर उपासमार आहे व ज्याठिकाणी एका वेळचे अन्नदेखील काही लोकांना मिळत नाही अशा गरजू ठिकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यात अद्यापही अनेक अशा आदीवासी वाड्या, …
Read More »रायगड जिल्ह्यात पाच हजार 152 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप
अलिबाग ः प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये कोणीही उपाशी राहू नये म्हणून अन्न नागरी पुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात पाच हजार 152 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप केले. आतापर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना 16.5 मेट्रिक टन मोफत तांदूळ वितरित झाला. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे दोन हजार 598 शिधापत्रिकाधारकांनी ते …
Read More »‘तबलिगीं’नी पुढे यावे; अन्यथा गुन्हे दाखल करू!
नवी मुंबई पोलिसांचा मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना इशारा नवी मुंबई : बातमीदार मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगिंनीपुढे येऊन आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र त्यानंतरही अनेक जण आपली माहिती लपवत आहेत. शासकीय यंत्रणेला सहकार्य करीत नाहीत. अशा तबलिगिंनी येत्या 9 एप्रिलपर्यंत स्वतः हुन समोर यावे …
Read More »कर्जत नगर परिषदेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरात साथरोगाचा प्रसार होऊ नये यासाठी कर्जत नगर परिषदेच्या वतीने बुधवारी (दि. 8) विठ्ठलनगर परिसरात कोविड-19 विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता स्वच्छतेच्या दृष्टीने काही पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या वतीने 3 एप्रिलपासून वेगवेगळ्या प्रभागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली …
Read More »वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पवार दाम्पत्याने आपली मुलगी दुर्वाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 100 गरीब, गरजू व फुटपाथवरील निराधारांना सोशल डिस्टन्स ठेवून अन्नदान केले. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताची आवश्यकता असल्याने शिक्षक कुणाल पवार यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने आपल्या लेकीचा वाढदिवस साजरा केला.कुणाल पवार हे जिल्हा परिषदेच्या सुधागड येथील पायरीचीवाडी …
Read More »खोपोली पालिकेत कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष
खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाचे महाभयानक संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. खोपोलीतही संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. खोपोली पालिकेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 7) पालिकेच्या प्रवेशद्वारावर नगरपालिका प्रशासनाकडून कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता कांबळे-औटी, मुख्याधिकारी गणेश शेटे, खोपोलीचे वरिष्ठ पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper