रेवदंडा ः प्रतिनिधी साळाव पुलाला राधाकृष्ण-3 या बार्जने शुक्रवारी (दि. 8) धडक दिल्याने पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. बार्जने साळाव पुलास दिलेल्या धडकेची सार्वजनिक बांधकाम खात्याने दखल घेतली आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली असून बार्जचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळाव पुलास बार्जने शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास …
Read More »श्रमिक रेल्वेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात विविध व्यवसाय व कारखान्यातील परप्रांतीय मजुरांना काम नसल्याने त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे, परंतु त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी कोणतीही वाहने उपलब्ध नसल्याने मजुरांची गैरसोय होत होती. त्या अनुषंगाने या मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे व शासनाच्या वतीने विशेष श्रमिक रेल्वे गाडी सुरू करण्यात आली …
Read More »युरिक अॅसिड
आरोग्य प्रहर कोणतीही सांधेदुखी झाली आणि थोड्या दिवसांत बरी होत नसेल तर युरिक अॅसिड वाढले असे सहजपणे म्हटले जाते. युरिक अॅसिड वाढण्याचा त्रास आणि त्यायोगे होणारा संधिवात हा अनेक तरुण, मध्यमवयीन व्यक्तींना अस्वस्थ करणारा आहे. योग्य प्रकारे पथ्य अवलंबल्यास यातून कायमची सुटका मिळू शकते. युरिक अॅसिड वाढलेले असताना वा त्याची …
Read More »खालापुरास पाणीटंचाईचे चटके
ग्रामस्थांचे हाल; टँकरने पाणीपुरवठा सुरू खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात खालापूर तालुक्याच्या पाचवीला पुजलेले पाणीटंचाईचे संकटदेखील घशाची कोरड वाढवत आहे. ठोस उपचारांअभावी टँकरची मात्रा सध्या देण्यात येत आहे. खालापूर तालुक्यात प्रचंड जलसाठा असतानादेखील पावसाळा संपताच अनेक भागात पाणीटंचाई जाणवते. या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात वर्षानुवर्षे प्रशासनाला अपयश येत आहे. खालापूर तालुक्याच्या …
Read More »कोरोनासोबत जगायला शिकूया
एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असताना, नागरिकांनी कोरोनासोबत जगायचे कसे हे शिकले पाहिजे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत त्यांचा आपल्या वर्तनात पूर्णत: समावेश करून घेतल्यास कोरोनासोबत जगण्याचे आव्हान आपण पेलू शकू. जगभरातील परिस्थितीशी तुलना करता, भारतातील कोरोना …
Read More »नवी मुंबई, उरणच्या पाणथळ जागांचे संरक्षण आवश्यक
सिडको अधिकारी व जिल्हाधिकार्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे, डोंगरी, बेलपाडा, भेंडखळ तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कुल, एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी दुर्मिळ पक्षांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणार्या मॅन्ग्रोजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या पाणथळी, दळी जमिनींच्या संरक्षण, सवंर्धनाची …
Read More »अत्यावश्यक सेवा देणार्यांना पारदर्शक फेस शिल्डचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर शासनाने लॉकडाऊन जारी केले आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नसल्याने सफाई कामगार, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी मोठी कामगिरी बजावत आहेत. हे काम करताना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी या सर्व अत्यावश्यक सेवा देणार्यांना आय फ्लेक्स टेक्नॉलॉजिसचे डायरेक्टर …
Read More »उरणच्या ‘इंडियन ऑइल’कडून 10 लाख रुपयांची मदत
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यात गहिर्या होणार्या कोरोनासंकटाशी लढा देणार्या अलिबाग जिल्हा प्रशासनाच्या मदतीस उरण येथील इंडियन ऑइलटँकिंग कंपनीने हातभार लावत दहा लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी कार्यालयात भेट देऊन ही मदत सुपुर्द केली. यापूर्वी कोरोनाची टाळेबंदी जाहीर झाल्यावर कंपनीने उरण तालुक्यातील आपल्या टर्मिनलजवळील गावांमध्ये …
Read More »प्रजापिता ब्रह्माकुमारीजकडून जेवण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील प्रजापिता ब्रह्माकुमारिज विश्वविद्यालया ईश्वरीय सेवा केंद्र यांजकडून नवीन पनवेल सेक्टर 16 पोदी येथे 225 जणांना जेवण देण्यात आले. या वेळी पनवेल सेवा केंद्रप्रमुख तारादीदी, डॉ. शुभदा नील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे, तसेच सेवा केंद्रातील अनेक जण उपस्थित होते. लॉकडाऊनमध्ये उपाशी असलेल्यांना …
Read More »खालापूर भाजपने जपली माणुसकी
खोपोली : प्रतिनिधी परप्रांतीयांची मूळगावी जाण्यासाठी होणारी फरफट पाहून खालापूरातील भाजप पुढे सरसावली आहे. तालुक्याचे अध्यक्ष बापू घारे, राकेश गव्हाणकर, अनिल उत्तेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य कर्मचार्यांना सहाय्य केले. तसेच वावोशी हद्दीतील आदिवासी वस्तीत ग्रामपंचायतचे भाजपचे सदस्य महेश कडू तसेच जिल्हा परिषद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper