अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा पोलीस दलाकडून अलिबाग शहरातील पीएनपी परिसरात जंतुनाशक फवारणी यंत्रणा कार्यान्वित कऱण्यात आली आहे. बाजारात येणार्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा कार्यरत असणार आहे. अलिबाग येथील भाजी मार्केट आणि मच्छीमार्केट परिसरात ग्राहकांची नियमित वर्दळ असते, मात्र अशाच गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. ही …
Read More »दररोज 100 भुकेल्यांना अन्नदान
कर्जत शहर भाजपचा स्तुत्य उपक्रम कर्जत ः बातमीदार कर्जत शहरातील व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात रोजंदारी कामगार आणि मजुरांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यांच्या एकवेळच्या भोजनाची तारांबळ झाल्याचे पाहून कर्जत शहर भाजपने दररोज 100 भुकेल्या लोकांना जेवण आणि धान्यवाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. …
Read More »गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
भाजप तालुकाध्यक्षांचा मदतीचा हात माणगाव ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जनतेला मार्गदर्शनपर सूचना करीत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषाणूला डोके वर काढू न देण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. हे लॉकडाऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वाढण्याची शक्यता …
Read More »ट्रँक्विल ग्रुपकडून मदत
श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणार्या गोरगरीब कुटुंबीयांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून परिवर्तन सामाजिक विकास संस्था कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष शिवराज भोसले-पाटील व ट्रँक्विल ग्रुपच्या कर्मचार्यांनी माणुसकी दाखवत या संकटग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विजापूर येथील बांधकाम कामासाठी बाहेरून आलेल्या 35 मजुरांना 10 …
Read More »रोगप्रतिकारशक्ती वाढवा
भारताचे सर्व नागरिक ज्यामध्ये 70 टक्के ग्रामीण भाग असणार्या भागात लहान मुले, वृध्द किंवा हॉस्टेलमध्ये राहणारी लोक जी आता लॉकडाऊनमध्ये आहेत, त्यांच्यासाठी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी एक चिकित्सक होण्याच्या नात्याने मी काही सांगू इच्छिते. जे तुम्ही आरामात आपल्या घरामध्ये करू शकता. आपल्या रोगप्रतिकारशक्तीला वाढवून आपण कोरोना व्हायरसपासून वाचू शकतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवा …
Read More »नेरळमध्ये व्यापार करणार्यांना पोलिसांची ताकीद
अनेकांचे पासेस रद्द; व्यवसायाच्या ठिकाणीच राहण्याचे आदेश कर्जत ः बातमीदार नेरळ बाजारपेठेत किराणा व्यवसाय करणारे व्यावसायिक हे अंबरनाथ, उल्हासनगर व ठाणे येथून येऊन व्यवसाय करतात आणि पुन्हा घरी परततात. त्यामुळे नेरळ गावात याची चर्चा सुरू असून जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत, तर पोलिसांनी उल्हासनगरमधून येणारी एक …
Read More »आदिवासी बांधवांना मदत
उरण : लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर जगणार्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न अॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवार यांनी करून त्यांना रेशन, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे गाव संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा स्वराज्य रिक्षा संघटना अध्यक्ष अॅड. निग्रेश पाटील आणि मित्र परिवार यांच्या वतीने जांभुळपाडा आदिवासीवाडी, कंठवली आदिवासीवाडी, विंधणे …
Read More »उनपाचे कोरोना संसर्ग नियंत्रण पथक
उरण : रामप्रहर वृत्त जगासह आपल्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बळी जाणार्यांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संसर्ग नियंत्रण कक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. उरण नगरपालिकेनेही नोडल अधिकारी, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना संसर्ग नियंत्रण पथकाची नियुक्ती केली आहे. …
Read More »कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती
आई व बाळ दोघेही सुखरूप पनवेल, नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेच्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या वाशी येथील रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेची यशस्वीरित्या प्रसूती करण्यात आली. ही महिला व बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाचे ’कोविड-19’ रुग्णालयात काही दिवसांपूर्वी …
Read More »पत्रकार संघटनेकडून गरजूंना मदतीचा हात
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये हातावर पोट असणार्यांसाठी मात्र जगणे अत्यंत अवघड बनले आहे. लॉकडाऊन परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न ज्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी पनवेलची तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper