Breaking News

Ramprahar Team

प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदींनी केले तीन जागतिक विक्रम

प्रयागराज : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 29) केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रयागराज येथील एका भव्य कार्यक्रमात उपस्थित राहिले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 26 हजार 791 दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त उपकरणांचे वाटप केले. या वेळी पंतप्रधानांनी तीन जागतिक विक्रमदेखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांना सन्मान …

Read More »

शेलघर येथे प्रवेशद्वारावर स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेचे अनावरण

पनवेल : रामप्रहर वृत्त गोरगरीब-कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त शेलघर येथे प्रवेशद्वारावर स्वर्गीय जनार्दन भगत यांची प्रतिमा त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने बसविण्यात आली. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या प्रतिमेचे अनावरण शनिवारी (दि. 29) करण्यात आले. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त विविध …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात निबंध स्पर्धा उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय जनार्दन भगतसाहेब यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आंतरमहाविद्यालयीन निबंध लेखन स्पर्धा मंगळवारी (दि. 25) आयोजित केली गेली. संस्थेच्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते न्यू लूक सल्लोन अॅण्ड स्पा शॉपचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर खारघरमध्ये लक्ष्मी खिर्डीकर व त्यांचे पती दिनेश खिर्डीकर यांनी शहरात सेक्टर 12 या ठिकाणी न्यू लूक युनिसेक्स सल्लोन अ‍ॅण्ड अ‍ॅकॅडमीची सुरुवात केली आहे. या शॉपचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. दुकानाचा उद्घाटन सोहळा लक्ष्मी खिर्डीकर, त्यांचे पती दिनेश खिर्डीकर व अशरफ शेख यांच्या वतीने …

Read More »

बांगलादेशींची धरपकड

कळंबोलीतून नऊ महिलांना अटक पनवेल : बातमीदार घुसखोरी करून भारतात राहत असलेल्या बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. कळंबोली पोलिसांनी नुकतेच स्टील मार्केट व इतर परिसरातून अश्लील हावभाव व हातवारे करणार्‍या 11 महिलांना ताब्यात घेतले आहे. यातील नऊ महिला बांगलादेशी आहेत. त्यामुळे नवी मुंबई परिसरात बांगलादेशी …

Read More »

माले येथे गुरांचा गोठा आणि मोळ्या जळून खाक

कर्जत : बातमीदार तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील माले गावातील शेतकर्‍याच्या शेतावर असलेला गुरांचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा गुरुवारी (दि. 27) सायंकाळी अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माले गावातील शेतकरी हरिचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे. त्यामुळे …

Read More »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ येथील अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी वाजे (ता. पनवेल) येथील आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सदर पीडित मुलीबरोबर ऑक्टोबर 2019मध्ये  फेसबुकद्वारे बोलून तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर तिला वडखळ येथे बोलावून घेतले …

Read More »

म्हसळ्यात सीएए व एनआरसी समर्थनार्थ रॅली

म्हसळा : प्रतिनिधी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. 27)म्हसळा शहरात हिंदू संघटनांतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  विविध राजकीय पक्षांचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. केंद्र शासनाने पारित केलेल्या या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. सीएए व एनआरसी …

Read More »

‘सीकेटी’त सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी, जागतिक मराठी गौरव दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन आणि स्व. जनार्दन भगत यांची 92वी जयंती हे चारही दिवस एकत्रितपणे साजरे करण्यात आले. या वेळी विद्यावर्धिनी अ‍ॅकॅडमीच्या संचालिका वरदा जोशी या …

Read More »

नेरुळ गावातील रस्ते काँक्रीटीकरण कामास शुभारंभ

नवी मुंबई : बातमीदार प्रभाग क्रमांक 95 मधील नेरुळ गाव येथील मुख्य रस्त्यांचे थिन व्हाईट टॅपिंग पद्धतीने काँक्रिटीकरण होणार आहे. यासाठी भाजपचे नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी नेरुळ गावचे माजी सरपंच  के. एन. …

Read More »