Breaking News

Ramprahar Team

दुंदरे गु्रप ग्रामपंचायत उपसरपंचपदी दर्शना चौधरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुंदरेच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये उपसरपंचपदी दर्शना नारायण चौधरी यांची निवड करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अनुराधा विष्णू वाघमारे, माजी उपसरपंच रमेश सिताराम चौधरी, सदस्या निराबाई शांताराम चौधरी, मंगल गणेश उसाटकर, सदस्य किशोर आत्माराम पाटील, ग्रामविकास अधिकारी व्ही. आर. राठोड, …

Read More »

कर्जतमध्ये लाखोंचा गांजा जप्त

दोन जणांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पळसदरी परिसरातून साडे पंधरा किलो गांजा आणि त्याची वाहतूक करणारी गाडी असा सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांना  अटक केली आहे. कर्जत शहरातून अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची माहिती अलिबाग येथील स्थानिक …

Read More »

पनवेलमध्ये स्वरशंकरा कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त विरूपाक्ष देवस्थानच्या वतीने पनवेल येथे स्वरशंकरा या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक केदार केळकर व नेहा पुरोहित यांंचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन झाले. पं. अरुण कशाळकर व मंदार भिडे यांच्याकडे गायनाचे धडे घेणार्‍या नेहा पुरोहित हिने देव देव महादेव महेश्वर या यमनकल्याण …

Read More »

सीकेटी विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदू घरत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि. 27) मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

‘मराठी ही हृदयाची भाषा आहे, ती माणसाला मोठेच बनवते’

पनवेल : रामप्रहर वृत्त जगात बोेलणार्‍या भाषांमध्ये मराठी भाषेला मानाचे स्थान असून मराठी भाषिक व्यक्तींनी जगावर प्रभुत्व गाजवले, इंग्रजी बोला पण मराठी सोडू नका. मराठी ही हृदयाची भाषा आहे ती माणसाला मोठेच बनवते, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. महात्मा फुले कला, विज्ञान …

Read More »

पनवेल महापालिकेच्या कामावर सफाई कर्मचारी आयोग समाधानी

पनवेल : बातमीदार महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग पनवेल महानगरपालिकेच्या कामावर समाधानी असल्याचे  मत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेश सारवान यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुकेशजी सोनु सारवान व त्यांच्या सहकार्‍यांनी पनवेल महापालिका मुख्यालयास भेट देऊन महापालिकेत कार्यरत असणार्‍या स्थायी व कंत्राटी सफाई कामगारांच्या …

Read More »

लाभले आम्हांस भाग्य..?

अस्मितेचा अभिनिवेश भविष्य घडविण्यासाठी कामी येत नाही हे वास्तव आहे. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय नीट समजून घ्यायचे असले तर विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच ते शिकवले पाहिजेत असे देशोदेशीचे नाणावलेले शिक्षणतज्ज्ञ परोपरीने सांगत असतात. परंतु जपान, रशिया असे काही मोजके देश वगळता जगातील बहुतेक देशांनी इंग्रजी भाषेचाच ज्ञानभाषा म्हणून स्वीकार केलेला …

Read More »

विजेचा खांब अंगावर पडून चौघे जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खोपोली रेल्वेस्टेशन परिसरातील श्री भैरवनाथ मंदिराजवळ बुधवारी (दि. 26) दुपारी नगरपालिकेचा विजेचा खांब अंगावर पडल्याने चार पादचारी जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शहरातील श्री भैरवनाथ मंदिराजवळील रस्त्यावर असलेला  नगरपालिकेचा विजेचा खांब बुधवारी दुपारी अचानक कोसळला. या घटनेत चार पादचारी जखमी झाले. याचे वृत्त …

Read More »

वडाळे तलाव सुशोभीकरणाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी

पनवेल : महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या शहरातील वडाळे तलाव सुशोभीकरणाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी पाहणी केली. सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक  नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ सोबत …

Read More »

जिताडा व्हिलेज शहापूरला हवाय पाणंद रस्ता

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग म्हटले की जिताडा मासा सर्वांना आठवतो. तालुक्यातील खारेपाट भागात जिताड्यांची शेती केली जाते. खारेपाटातील घराबाहेर किंवा घरामागे जिताड्यांचे तलाव पाहायला मिळतात. शहापूर गावात पूर्वपार जिताडापालन केले जाते. जिताड्याचे गाव म्हणून हे गाव ओळखले जाते. गावात अशी 103 तळी आहेत. या सर्व तलावांना जोडणारा पाणंद रस्ता गावात …

Read More »