मिळूनी सार्या जणी..!
कामोठ्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात कामोठे : रामप्रहर वृत्त येथील श्री वरदविनायक भाजीविक्रेता सामाजिक संस्थेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ उत्साहात झाला. वर्षा प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल आणि अर्चना परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन एकमेकींना सतीचे वाण दिले. आयोजकांच्या वतीने …
Read More »‘मिस नवी मुंबई’साठी सौंदर्यवती सज्ज
नवी मुंबई ः प्रतिनिधी स्वतःवर विश्वास ठेवल्यास आपण मेहनत व समर्पणाच्या जोरावर सर्वकाही साध्य करू शकतो, याच विचाराने प्रेरित होऊन यू अॅण्ड आयने नवी मुंबईतील तरुणींना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी मिस नवी मुंबईची सुरुवात केली. नऊ वर्षांच्या प्रवासादरम्यान यू अॅण्ड आय टीमने वर्षानुवर्षे हा कार्यक्रम उत्तम करण्यास परिश्रम घेतले. …
Read More »नवी मुंबईत फिरत्या कचराकुंड्या
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कचराकुंडीमुक्त शहर असे नामाभिधान मिरविणार्या नवी मुंबईत काही ठिकाणी फिरत्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कचरा टाकला जात होता, त्या ठिकाणी या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी स्वच्छता मोहिमेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आधी ज्या ठिकाणी कचराकुंड्या …
Read More »पनवेलमधील वडाळे तलावाशेजारी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारावा
नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी; आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान व तमाम युवकांचे ऊर्जास्त्रोत असलेले स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची पनवेल शहरातील वडाळे तलावाशेजारी उभारणी करावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मनपा आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे. या निवेदनात नगरसेविका …
Read More »‘ते’ मंगळसूत्र सापडले घरातच
पनवेल : बातमीदार तालुक्यातील दुंदरे गावात राहणार्या शारदा माळी (55) या महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील मंगळसूत्र त्यांच्याच घरात सापडले आहे. तपासादरम्यान एका खिडकीजवळ सिलिंडरच्या मागे पडलेले मंगळसूत्र पोलिसांच्या हाती लागले. हे प्रकरण ज्या मंगळसूत्राच्या चोरीमुळे घडले ते मंगळसूत्र घरातच कसे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. दुंदरे गावातील …
Read More »विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
पेण : प्रतिनिधी नरविर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने महाल मिरा डोंगर परिसरातील आसणी आणि वेताळपट्टी देऊळवाडी येथील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना नंदेश पाटील यांनी स्वेटर वाटप केले. पेण तालुका धनगर समाज युवक विद्यार्थी विकास संस्थेचे संस्थापक विजय उघडे, अध्यक्ष सचिन र. उघडे, उपाध्यक्ष वरूण आखाडे, सल्लागार लक्ष्मण बोडेकर, सहखजिनदार योगेश कोकळे, …
Read More »संगीतकार अजय-अतुल बनले ‘खालापूरकर’
वावर्लेत फार्म हाऊस खरेदी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल गोगावले यांनी चौकजवळील वावर्ले येथे फार्महाऊससाठी जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीच्या खरेदी दस्तऐवज नोंदणीसाठी ते दोघे शुक्रवारी (दि. 7) खालापूरला आले होते. यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक श्री. वैद्य आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी त्यांचे स्वागत केले. अजय-अतुल यांना …
Read More »संवाद होत नसल्याने माणूसपण धोक्यात
ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे मत अलिबाग : प्रतिनिधी सध्याच्या शिक्षणात नैतिकता हा विषयच दिसत नाही. माणसे शिकत आहेत, परंतु सामाजाचे अध:पतन होत आहे. माणासांचा एकमेकांशी संवाद होत नसल्यामुळे माणूसपण धोक्यात आले आहे, असे मत सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी शनिवारी …
Read More »दिवेआगरजवळील डोंगराला वणवा
दुर्मीळ वनसंपदा खाक; वन्यजीवांनाही फटका श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील दिवेआगर-भरडखोल रस्त्याला लागून असलेल्या डोंगराला शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी वणवा लागला. त्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे खूप मोठया प्रमाणावर नुकसान झाले. दिवेआगर व आजुबाजुचा परिसर निसर्ग सौंदर्यााने नटलेला आहे. दिवेआगर-भरडखोल रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावर तर दुर्मिळ वनसंपदा असून व तेथे वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper