कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील बेकरे गावात सुरू असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. एकाच आठवड्यात नेरळ पोलिसांनी तीन ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरात गावठी दारू बनविली जात असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर …
Read More »वळवली रस्त्याचे लोकार्पण
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील बेलाशी ग्रामपंचायत हद्दीतील वळवली गावातील द्वारकाधीश मंदिरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. माजी उपसरपंच संतोष निगडे यांच्या हस्ते या रस्त्याचे रविवारी (दि. 25) सकाळी लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी या रस्त्याचे काँक्रीटीकरण स्वखर्चाने केले आहे. या वेळी नंदकुमार पाटील, …
Read More »खोपोली सिटी बस स्थानकाची दुरवस्था
खड्डे, चिखल व सांडपाणी तुंबत असल्याने प्रवाशांत संताप खोपोली : प्रतिनिधी नागरिकांची नाराजी, नगरसेवकांच्या मागणीनंतरही खोपोली सिटी बस स्थानक समस्यांच्या गर्तेत आहे. खोपोली नगरपालिका परिवहन सेवेचे मध्यवर्ती सिटी बस स्थानक विविध गैरसोयी व समस्यांमुळे विद्यार्थी व नागरिकांच्या संतापाचे कारण बनत आहे. या स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्थानकात मोठ्या …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी
आरोपीस दोन वर्षांचा कारावास, 20 हजार रुपयांचा दंड खालापूर : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी खालापूर न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी प्रकाश बबन आखाडे (42) याला दोषी ठरवत दोन वर्षे कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. खोपोली वासरंग येथील चाळीत भाड्याने राहणार्या प्रकाश बबन …
Read More »तिसर्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या
अलिबाग : प्रतिनिधी मानसिक आजाराला कंटाळून एका रुग्णाने तिसर्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सादिक महंमद सय्यद (46) असे उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही जिल्हा रुग्णालयात उडी मारून आत्महत्या केल्याच्या दोन घटना …
Read More »कार्यकर्त्यांनी कामगिरी चोख पार पाडावी
कार्यकर्ता बैठकीत भाजप नेते रविशेठ पाटील यांचे आवाहन पेण : प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर देशातील आम जनता खूश असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी पेण मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपली कामगिरी चोख पार पाडावी व भाजपच्या विजयी अभियानास प्रारंभ करावा, असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी येथे केले. रविशेठ …
Read More »साईतेज प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव
नवीन पनवेल ः पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष असलेल्या तेजस कांडपिळे यांच्या साईतेज प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव रंगला. या वेळी प्रसिद्ध सिनेअभिनेता अंकुश चौधरी याची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »तिज महोत्सव उत्साहात साजरा
पनवेल ः बंजारा समाज श्रावण महिन्यात तिज महोत्सव उत्साहात साजरा करत असतो. खारघर येथे श्री संत सेवादास बहुउद्देशीय बंजारा समाज उन्नती मंडळातर्फे आयोजित तिज उत्सवास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, वासुदेव पाटील, भीमराव लोंढे, बंजारा समाजाचे आबाराव …
Read More »पनवेल तालुक्यात दहिहंडी उत्सव
पनवेल ः गोविंदा रे गोपाळाचा जयघोष करत पनवेल तालुक्यात दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त कामोठे, कंळबोली, पनवेल तसेच खारघर येथील दहीहंडी उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली.
Read More »कळंबोलीत दहिहंडी उत्सवाचे आयोजन
पनवेल ः भारतीय जनता पार्टी कळंबोली शहराचे अध्यक्ष अमर ठाकूर यांच्या पुढाकाराने कळंबोलीतील साखरशेठ चौका स्व. त्रिंबक जोमा ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अजिंक्यतारा मित्र मंडळ रोडपाली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहिहंडी उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper