कळंबोली ः गणेशोत्सवानिमित्त भाई भाई ग्रुप आणि भाजप कळंबोली शहर उपाध्यक्ष नितीन काळे यांनी आरती संग्रह तयार केले आहेत. या आरती संग्रहाचे प्रकाशन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी ओम साईराम इंटरप्रायजेसचे श्रीनिवास म्हात्रे, माजी उपसरपंच विश्वास म्हात्रे, कळंबोली शहर उपाध्यक्ष नितीन काळे, श्रीकांत …
Read More »‘सीकेटी’त आरोग्यविषयक व्याख्यान
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामधील महिला विकास कक्षातर्फे 30 ऑगस्ट 2019 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत नॅचरल हेल्थ अॅन्ड एजुकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. दीपक खाडे यांचे मासिक पाळी एक वरदान आणि जैविक सॅनिटरी पॅॅडचा …
Read More »‘सीकेटी’ एनएसएसच्या स्वयंसेवकांचा अमलीपदार्थ विरोधी कार्यशाळेत सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीस स्वयंसेवकांनी पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल येथे नवी मुंबई कॉलेज असोसिएशन, आशा की किरण फाऊंडेशन तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई …
Read More »उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल ः वार्ताहर पनवेल शहर व परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार असून पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सातत्याने शासनाकडे तसेच वीजवितरण कंपनीच्या संबंधीत अधिकार्यांकडे पाठपुरावा करून शहरासाठी नवीन अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित सबस्टेशन उभारावे, अशी मागणी केली होती. ही मागणी पूर्ण होताना दिसून येत आहे. …
Read More »ट्रान्सफॉर्म पनवेल 2019 रिसर्च पेपर स्पर्धेला प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि इन्फिनिटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात ट्रान्सफॉर्म पनवेल 2019 या कार्यक्रमाचे 29 व 30 ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत शुक्रवारी आंतर महाविद्यालयीन रिर्सच पेपर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा …
Read More »गणेशभक्तांसाठी वाहतूक पोलीस सज्ज, ठिकठिकाणी नेमणार बंदोबस्त
पनवेल ः बातमीदार दि. 2 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. परिसरातल्या बाजारपेठा देखील बाप्पाच्या आगमनासाठी सजलेल्या आहेत. गणेशभक्तचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. त्यासाठी दिवस-रात्र पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्त नेमणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या उपस्थितीत पळस्पे येथे …
Read More »एपीएमसी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार!
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचा मानस असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि.29) सांगितले. येथील भाजीपाला संकुलाच्या छत्रपती संभाजी महाराज भाजीपाला आवारातील अतिरिक्त 285 …
Read More »उत्सव पर्यावरणस्नेही व्हावा
गरीब असोत वा श्रीमंत सर्व स्तरांतील वस्त्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव तितक्याच उत्साहात साजरा केला जाताना दिसतो. हा उत्सव जसा लोकांना एकत्र आणतो, सार्वजनिक जीवनाची रंगत वाढवतो, तसाच तो काही प्रमाणात प्रदूषणातही भर घालतो हे आपण मान्य करायलाच हवे. तसे ते केले तरच आपण हे प्रदूषण रोखण्यास वा कमी करण्यास हातभार लावू …
Read More »गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदाम, पिस्त्याचे दर वधारले
पनवेल ः वार्ताहर गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपला असताना पनवेल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सुक्या मेव्याची आवक वाढू लागली आहे. सद्यस्थितीत प्रतिदिन 50 ते 60 टन आवक होऊ लागली आहे. काजूसह अक्रोडचे दर स्थिर असले तरी बदाम, पिस्त्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. पावसाळ्यामुळे दोन महिने बाजारपेठेत सुक्यामेव्याची आवक कमी झाली …
Read More »तिहेरी तलाकच्या पाठिंब्यासाठी मराठमोळ्या महिलेचा बुरखा घालून प्रचार
पनवेल ः वार्ताहर नुकताच केंद्र सरकारने तिहेरी तलाक कायदा मंजूर केल्याने मुस्लीम महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद दिसून आला. हा कायदा खरोखरच मुस्लीम भगिनींसाठी फायद्याचा असून त्या कायद्याची प्रसिद्धी व्हावी व केंद्र सरकारचे अभिनंदन करावे, त्या कायद्याला पाठिंबा द्यावा, या उद्देशाने पनवेलमधील उद्योजिका मनीषा म्हात्रे या स्वतः बुरखा परिधान करून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper