कर्जत : बातमीदार रेल्वे प्रशासनाच्या अधिकारीवर्गाने अमन लॉज ते माथेरान रेल्वेमार्गाची पाहणी करीत माथेरान स्थानक गाठले. या वेळी त्यांनी नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे काम येणार्या दोन-चार महिन्यांत युद्धपातळीवर पूर्ण करून लवकरच मिनीट्रेनची सेवा सुरळीत केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले. त्याचप्रमाणे शटल सेवा सुरू करण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा आढावा घेतला. …
Read More »शासन आपल्या पाठीशी
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही; शिहू विभागातील पूरग्रस्तांची घेतली भेट पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पूरग्रस्तांची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 11) भेट घेतली. शासन आपल्या पाठीशी असून, सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दिलासा त्यांनी पूरग्रस्तांना या वेळी दिला. मुसळधार पावसाने पेण तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांमध्ये …
Read More »रापानुई
ऑगस्ट महिना उजाडला तोच मुळी जोरदार पाऊस घेऊन. राज्यात मुसळधार पावसामुळे कोकणासह सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पुराने थैमान घातले. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. उभी पिके बुडाली. ’जारे जारे पावसा, तुला देतो पैसा,’ असे म्हणण्याची वेळ आली. प्रशांत महासागरात असलेले रापानुई हे एकाच वेळी माणसांच्या सफलतेचे आणि विफलतेचे विशाल …
Read More »देशातील दुसरा टेली मेडिसिन दवाखाना नेरळच्या सगुणा बागेत
कर्जत ः बातमीदार उद्योजक डॉ. संकेत बर्हाळे यांनी पुणे येथे फिग एमडी ही संस्था स्थापन केली असून त्या संस्थेच्या वतीने टेली मेडिसिन दवाखान्याची संकल्पना राबविली जात आहे. अशी संकल्पना राबविणारी फिग एमडी ही देशातील पहिलीच संस्था असून देशातील दुसरा टेली मेडिसिन दवाखाना नेरळजवळील सगुणा बाग या कृषी पर्यटन केंद्रात सुरू …
Read More »वाकण पाली मार्गावर जिवंत विद्युत वाहिन्या पडल्या
पाली ः वार्ताहर वाकण पाली राज्य महामार्गावर वझरोली गावाजवळ विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळून विजेचा खांब कोसळला. यामुळे विजेच्या जिवंत वाहिन्या रस्त्यावर आडव्या येऊन लोंबकळत होत्या. परिणामी येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वीज वाहिन्यांवर रस्त्याच्या शेजारील शेतात असलेले झाड उन्मळून कोसळले. त्यावेळी येथून एक कार जात होती. सुदैवाने कार …
Read More »रायगडातील पूरस्थिती आली नियंत्रणात
अलिबाग : जिमाका कोकण विभागात मागील चार-पाच दिवसांपूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस बंद आहे. या भागातील पूरस्थिती नियंत्रणात असून त्यांना आवश्यक ते मदतकार्य करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील पूरस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 500 व्यक्ती, रत्नागिरी जिल्ह्यातील 757, तर रायगड जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. …
Read More »कर्जत-लोणावळादरम्यान दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात
कर्जत ः बातमीदार जुलै महिन्यात कर्जत-लोणावळा मार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मेन लाइनवरील दक्षिण-मध्य मार्गावर वाहतूक थांबवून दुरुस्तीची कामे केली जात आहेत.दरम्यान, मध्य रेल्वेच्या या कामांमुळे बोरघाट अधिक सुरक्षित होत असून त्या कामाची पाहणी मध्य रेल्वेचे मुंबई येथील वरिष्ठ अधिकारीवर्गाने केली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक …
Read More »मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक 16 ऑगस्टपर्यंत बंद
खोपोली ः वार्ताहर सिग्नल व्यवस्था, रेल्वे टॅ्रकची दुरुस्ती व घाटातील दरड भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई-पुणे सर्व प्रकारची रेल्वेसेवा दि. 16 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकडील प्रवासी लोकलने खोपोलीला येऊन खोपोलीहून महामार्गमार्गे पुण्याकडे जात आहेत. खोपोली सिटी बसस्थानक व खोपोली मध्यवर्ती बस स्थानकांत पुण्याकडे जाणार्या प्रवाशांची …
Read More »रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे मदत
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक रोहे ः प्रतिनिधी रोहे तालुक्यातील कवलठे या गावी भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. तेथील नागरिकांना तातडीची मदत म्हणून रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे तूरडाळ, गोडेतेल, पोहे, मसाले, खोबरेल तेल, पेस्ट, लोणचे, अंगाचे साबण, कपड्याचे साबण आदी जीवनावश्यक जिन्नस असलेले पॅकेट्स 25 कुटुंबाना देण्यात आली. रायगडचे पालकमंत्री ना. …
Read More »सोन्याच्या वाडीचे पुनर्वसन
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही; ग्रामस्थांना दिलासा माणगाव ः रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे गोरेगाव विभागातील सोन्याच्या वाडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या वाडीचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या जलप्रलयामुळे संपूर्ण सोन्याच्या वाडीला पुराच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातला होता. या पूरस्थितीतून जीवाची पर्वा न करता जिगरबाज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper