सरकारकडून पगारवाढ; कर्मचारी मात्र विलिनीकरणावर ठाम मुंबई ः प्रतिनिधीगेले अनेक दिवस सुरू असलेल्या संपाची राज्य सरकारने दखल घेत अंतरिम पगारवाढ केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी (दि. 24) पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. सध्या एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची बाब ही उच्च न्यायालयाच्या समितीसमोर असल्याने तो निर्णय …
Read More »‘अंगारकी’निमित्त बाप्पाची मंदिरे भाविकांनी फुलली!
दिवेआगरमध्ये सुवर्णगणेशाची पुन:प्रतिष्ठापना अलिबाग ः प्रतिनिधीसुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाच्या अंगारक चतुर्थीनिमित्त जिल्ह्यातील गणेश मंदिरे मंगळवारी (दि. 23) भाविकांनी फुलली होती. कोरोनानंतर प्रथमच आलेला अंगारक योग साधून भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, दिवेआगर येथील सुवर्णगणेशाची पुन:प्रतिष्ठापनाही भक्तिभावाने करण्यात आली.कोरोना महामारीमुळे गेले दीड वर्ष मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांना देव-देवतांचे …
Read More »भाजपतर्फे विविध विकासकामांचा शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा झाला. याचेच औचित्य साधून चिंध्रण येथे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून तयार झालेल्या काँक्रिट रस्त्याचे आणि चिंध्रण ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या गटारांच्या कामाचे उद्घाटन तसेच स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 23) झाले. या कामांचा शुभारंभ …
Read More »जनतेचे प्रश्न राज्य सरकारला दिसत नाही -आमदार प्रशांत ठाकूर
नागोठण्यात भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नागोठणे ः रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक जण स्वतःच्या पक्षाचा करता विचार करून आपले अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचा प्रत्यय रायगडवासीयांना माणगाव येथील एका मंत्रीमहोदयांच्या कार्यक्रमातून आला. एकीकडे सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे एकमेकांवर आरोप करायचे अशी परिस्थिती असल्याने सामान्य लोकांचे प्रश्न यांच्या …
Read More »सातारा जिल्हा बँक निवडणूक; देसाई, शिंदे यांचा पराभव
सातारा, सांगली ः प्रतिनिधीसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत बड्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामध्ये शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे, तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.पाटण सोसायटी मतदारसंघात …
Read More »रायगडात राष्ट्रवादीला मोठा धक्का ; जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांचा राजीनामा
आघाडीत घुसमट होत असल्याची भावना कर्जत ः बातमीदारराज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. रायगडमधील कर्जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी आघाडीत आपली घुसमट होत असल्याचे सांगत जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »पेट्रोल-डिझेलऐवजी दारूवरील शुल्क घटवले
ठाकरे सरकारवर भाजपचा निशाणा मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारने विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, तेव्हा राज्याने आपले कर कमी करावेत, अशी …
Read More »अमरावती हिंसाचारप्रकरणी एकतर्फी कारवाई होतेय
देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप अमरावती ः प्रतिनिधीअमरावती हिंसाचारप्रकरणी राज्य सरकारकडून एकतर्फी कारवाई होत आहे. ज्यांचा याच्याशी संबंध नाही अशा हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते रविवारी (दि. 21) अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.अमरावतीला दौर्यावर गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »पनवेलमध्ये ओबीसी जागर
जनजागरण रथयात्रेस उत्तम प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तओबीसी जागर अभियान अंतर्गत भाजप उत्तर रायगड व पनवेल शहर ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन रविवारी (दि. 21) पनवेलमध्ये करण्यात आले होते. भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष जयंत पगडे …
Read More »विद्यापीठे, कॉलेज कर्मचार्यांचा सोमवारी लाक्षणिक बंद
मुंबई : येथील विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. पाठपुरावा करूनदेखील हे प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वतीने सोमवारी (दि. 22) राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठे व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper