Breaking News

Ramprahar Reporters

…तर राज्यात कडक निर्बंध !

आरोग्यमंत्र्यांचे संकेत; लसीकरणाबाबतही चिंता मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य …

Read More »

थर्टी फर्स्ट अन् नववर्ष स्वागतासाठी नियमावली जारी

मुंबई : कोरोनासह ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने आधीच निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर आता थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृहात आसनक्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी (दि. 27) ओमायक्रॉनबाधित पाच रुग्ण आढळले असून यातील तीन रुग्ण परदेश दौरा करून आलेले आणि उर्वरित दोन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे निकटवर्तीय आहेत. या सर्वांचे आजाराचे स्वरूप सौम्य असून चौघांना कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये, तर एकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खारघरमधील …

Read More »

गुळसुंदेतील पाणीसमस्या अधिवेशनात

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाली असून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गुळसुंदे परिसरातील या पाणीसमस्येवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या …

Read More »

रामशेठ ठाकूर यांचा ‘रयत’च्या विकासात मोठा वाटा – खासदार शरदराव पवार

सातारा येथे उभारलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे शानदार उद्घाटन   कर्मवीरभूमी, सातारा : हरेश साठे थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्याकडील धनाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करीत रयत शिक्षण संस्थेला भरभरून दिले आहे. या संस्थेच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे, …

Read More »

देता, देता इतुके द्यावे… देणार्‍याने ‘रामशेठ’ व्हावे…

आज एका वेगळ्या विषयावर लिहीत आहे. 27 डिसेंबरला सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज संकुलात एका भव्य इमारतीचे लोकार्पण होत आहे. 50 वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेत पदवीधर झालेले, नंतर शिक्षक झालेले, नंतर व्यावसायिक झालेले, नंतर राजकारणात आलेले, पण राजकारण अंगाला चिकटवून न …

Read More »

पनवेलमधील कोळवाडीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि 25:15 या मूलभूत सुविधा विकास योजनेतून 10 लाख निधीतून कोळवाडी गावातील जोडरस्त्याचे डांबरीकरण होत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) झाले. या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी एसटी कर्मचार्‍यांचा प्रश्न मांडला विधिमंडळात

10 तारखेच्या आत वेतन देण्याचे परिवहनमंत्र्यांकडून आश्वासन निधीच्या पूर्ततेनंतर वैद्यकीय देयकेही देणार पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील एसटी कामगारांचा संप दीर्घकाळ चालला असून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपकर्‍यांना पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर सध्या मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचार्‍यांच्या हितासाठी प्रश्न मांडून त्यांना वेळेवर …

Read More »

फक्त सीमेवरच नाही तर त्या पलीकडेही घुसून मारणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा धुळे ः प्रतिनिधी भारतीय सैन्य हद्दीत घुसणार्‍या आणि सीमेपलीकडील अशा दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी राष्ट्र पाकिस्तानचे नाव न घेता दिला आहे. संरक्षणमंत्र्यांच्या  हस्ते शुक्रवारी (दि. 24) दोंडाईचा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत …

Read More »

कर्नाळा बँक ठेवीदारांसाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा अधिवेशनात बुलंद आवाज

पनवेल, मुंबई ः प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये झालेल्या 500 कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याबाबत राज्य सरकारकडून अद्यापही कायद्यानुसार आवश्यक ती कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे या बँकेतील ठेवीदार, खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा एकदा विधिमंडळ अधिवेशनात …

Read More »