Breaking News

Ramprahar Reporters

अखेर प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधीपहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक …

Read More »

एसटी कर्मचारी विलिनीकरणावर अजूनही ठाम

मुंबई : प्रतिनिधीराज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांसाठी पगारवाढीची घोषणा करूनही कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचार्‍यांना पाठिंबा देणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाबाबतचा यापुढील निर्णय एसटी कर्मचारीच घेतील, असे सांगून त्यांना गुरुवारी (दि. 25) शुभेच्छा दिल्या आहेत.राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत …

Read More »

सलग दुसर्‍या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत

मुंबई : हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार की मुंबईला यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर अधिवेशनाची तारीख ठरली असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अधिवेशन नागपूरला घ्यावे …

Read More »

नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

राज्यातील 105 ठिकाणी 21 डिसेंबरला मतदान मुंबई ः प्रतिनिधीराज्यात विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान, तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी (दि. 24) येथे केली.मदान यांनी …

Read More »

‘रवि डायवेअर’च्या कामगारांना वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत करार पनवेल ः रामप्रहर वृत्तजय भारतीय जनरल कामगार संघटनेने रवि डायवेअर कंपनीतील कामगारांना 10 हजार 500 रुपयांची भरघोस पगारवाढ मिळवून दिली आहे. या संदर्भातील करार बुधवारी (दि. 24) भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात संघटनेचे सल्लागार तथा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत …

Read More »

मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडातील फक्त 24 टक्के निधीचा झाला वापर

आरटीआयमधून धक्कादायक खुलासा मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडात लोकांनी भरघोस देणगी दिली, मात्र कोविडग्रस्तांना यातून संपूर्ण मदत करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीचा अधिकार (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात महाराष्ट्र मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडमध्ये सुमारे 799 कोटी रुपये जमा झाले. लोकांनी मोठ्या प्रमाणात दिलेल्या …

Read More »

पनवेल महापालिकेच्या 783 कोटींच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीची मंजुरी

मालमत्ता करात 47 टक्के सवलत पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या सन 2021-22च्या सुमारे 783 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला बुधवारी (दि. 24) झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये मालमत्ता करामध्ये वार्षिक भाडेमूल्याच्या 30 टक्के सूट व 17 टक्के सवलत अशा एकूण 47 टक्के सवलतीला या वेळी मंजुरी देण्यात आली.पनवेल महापालिकेच्या …

Read More »

एसटी संपाचा तिढा कायम

सरकारकडून पगारवाढ; कर्मचारी मात्र विलिनीकरणावर ठाम मुंबई ः प्रतिनिधीगेले अनेक दिवस सुरू असलेल्या संपाची राज्य सरकारने दखल घेत अंतरिम पगारवाढ केली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी बुधवारी (दि. 24) पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. सध्या एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची बाब ही उच्च न्यायालयाच्या समितीसमोर असल्याने तो निर्णय …

Read More »

‘अंगारकी’निमित्त बाप्पाची मंदिरे भाविकांनी फुलली!

दिवेआगरमध्ये सुवर्णगणेशाची पुन:प्रतिष्ठापना अलिबाग ः प्रतिनिधीसुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाच्या अंगारक चतुर्थीनिमित्त जिल्ह्यातील गणेश मंदिरे मंगळवारी (दि. 23) भाविकांनी फुलली होती. कोरोनानंतर प्रथमच आलेला अंगारक योग साधून भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, दिवेआगर येथील सुवर्णगणेशाची पुन:प्रतिष्ठापनाही भक्तिभावाने करण्यात आली.कोरोना महामारीमुळे गेले दीड वर्ष मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांना देव-देवतांचे …

Read More »

भाजपतर्फे विविध विकासकामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा झाला. याचेच औचित्य साधून चिंध्रण येथे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून तयार झालेल्या काँक्रिट रस्त्याचे आणि चिंध्रण ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या गटारांच्या कामाचे उद्घाटन तसेच स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 23) झाले. या कामांचा शुभारंभ …

Read More »