Breaking News

Ramprahar Reporters

ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना

पनवेल ः कोरोना रुग्णांना प्राणवायू अर्थात ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणण्याकरिता कळंबोली येथून विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस सोमवारी रवाना झाली. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेथे भेट देत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली.

Read More »

रेल्वे कर्मचार्‍याने वाचविले चिमुकल्याचे प्राण

वांगणी स्थानकावर थरार कर्जत ः बातमीदारपॉईंटमन मयूर शेळके यांच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. वांगणी रेल्वेस्थानकात शनिवारी (दि. 17) ही घटना घडली. काळजाचा ठोका चुकवणारा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.वांगणी रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळी 5च्या सुमारास मुलासह चालत होती. चालता …

Read More »

बनावट सोनेप्रकरणी आंतरराज्य टोळी जेरबंद

एका महिलेसह चौघांना बेड्या; 68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत अलिबाग ः प्रतिनिधीसोन्याचे शिक्के देतो असे सांगून चक्क पितळेचे शिक्के देत गंडा घालणार्‍या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. यात चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे.प्रभूभाई गुलशनभाई सोलंकी ऊर्फ कल्पेश …

Read More »

उद्धव ठाकरेंनी पीपीई किट घालून बाहेर पडावे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सल्ला पुणे ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत असून, त्याचा अतिरिक्त भार आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पीपीई किट घालून घराबाहेर पडत कारखानदारांच्या भेटीगाठी घेण्याचा सल्ला दिला आहे.पाटील यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार …

Read More »

देशातील रुग्णसंख्येचा नवा उच्चांक; एकूण दीड कोटींचा टप्पाही पार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14 कोटींवर गेली आहे, तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सोमवारी (दि. 19) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल …

Read More »

राज्यात संपूर्ण लॉकडाऊन?

मंत्री वडेट्टीवार यांचे संकेत; दोन दिवसांत निर्णय मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत या संबंधी निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून, त्याची …

Read More »

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी एबी डिव्हिलियर्स उत्सुक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाकडून तुफान फटकेबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. यंदा भारतात होणार्‍या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. याबाबत तो दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर याच्याशी चर्चा करणार आहे.कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयानंतर डिव्हिलियर्स म्हणाला, मागच्या वर्षी त्याने …

Read More »

ऑरेंज कॅप आली ‘गब्बर’कडे

मुंबई ः प्रतिनिधीआयपीएल 2021 स्पर्धेत दिल्ली संघातून खेळण्यार्‍या शिखर धवनने आपल्या नावावर ऑरेंज कॅप केली आहे. काही तास बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलच्या डोक्यावर मानाची कॅप राहिली, मात्र पंजाबविरुद्ध धवनने चांगली कामगिरी करीत ऑरेंज कॅपचा मान पटकावला.यापूर्वी धवनने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 54 चेंडूंत 85 धावांची खेळी केली होती. त्यात 10 चौकार आणि दोन …

Read More »

कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेचे बार्सिलोनाला जेतेपद

माद्रिद ः वृत्तसंस्थालिओनेल मेस्सीच्या शानदार दोन गोलमुळे बार्सिलोनाने अ‍ॅथलेटिक बिलबाओचा 4-0 असा धुव्वा उडवत कोपा डेल रे चषकावर नाव कोरले.दुसर्‍या सत्रात अवघ्या 12 मिनिटांच्या अंतराने चार गोल लगावत बार्सिलोनाने या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. अँटोनी ग्रिझमन याने 60व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर तिसर्‍याच मिनिटाला फ्रँकी डे जाँग याने बार्सिलोनाची आघाडी …

Read More »

दिल्लीकडून विजयाचे ‘शिखर’ सर

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जच्या 196 धावसंख्येच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या शानदार खेळीमुळे दिल्लीने पंजाबवर सहा गडी राखून हा विजय मिळवला.नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 20 षटकांत 4 बाद 195 धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार के. …

Read More »