मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पनवेल शहरातील झोपड्यांचे पुनर्वसन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुनर्विकासाच्या काळात झोपडीधारकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी …
Read More »संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात येणार आहे. त्यांच्या समतावादी विचारांचा प्रसार, सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘समरसता संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. …
Read More »विरार-अलिबाग मार्गिकेचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा : आमदार प्रशांत ठाकूर
मोबदल्याबाबत शासन स्तरावरील निर्णय होईपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पनवेल : रामप्रहर वृत्तविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका (राज्य महामार्ग विशेष क्र. ४) प्रकल्पासाठी पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे सुरू असलेले सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करण्यात यावे, अशी ठाम मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली असून जोपर्यंत बाधित …
Read More »साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी
असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तआगामी दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासारख्या मोठ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना कायदेशीर नियमांचे पालन करून व्यवसाय करण्याची संधी द्यावी तसेच नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांवर पोलीस प्रशासनाकडून होणारी कठोर कारवाई थांबवून सहकार्याची भूमिका घेण्यात यावी, अशी मागणी साऊंड, …
Read More »राम तेरी गंगा मैली @४१ वर्षे; राज कपूरच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट
चित्रपटाच्या नावात त्याचं व्यक्तिमत्त्व अथवा ओळख व्हायला हवी. त्यातही दिग्दर्शक दिसतो. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे ते खास वैशिष्ट्य. चित्रपटाच्या पोस्टरवरही त्या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढायला हवी. राज कपूर दिग्दर्शित चित्रपटाबाबत तसं दिसते.‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाबाबतही असेच दिसते. हा चित्रपट मुंबईत १६ ऑगस्ट १९८५ रोजी प्रदर्शित झाला. म्हणजेच त्याच्या प्रदर्शनास …
Read More »पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांनी सर्व चारही प्रभाग समित्यांवर विजय मिळवत महापालिकेवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पीठासीन अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन …
Read More »पनवेल महापालिका एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी (दि. १०) मनपा मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध आरोग्यसेवांचा आढावा घेतला. आरोग्य सुविधांचे …
Read More »‘जनसेवेचे अमृतपर्व’ ग्रंथाचे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रकाशन
मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आदिवासी दिनाचे औचित्य साधून संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ‘जनसेवेचे अमृतपर्व : लोककल्याणाच्या अखंड सेवेचा प्रेरणादायी जीवनप्रवास’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी उत्साहात …
Read More »पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारो उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शनिवारी (दि. ८) चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे झालेल्या या मेळाव्यात तब्बल …
Read More »दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…
एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी चित्रपट, सिनेमा, फिल्म असं न म्हणता मुव्हीज म्हणते म्हणून तसं म्हटलं. चित्रपटाची थीम (अर्थात गोष्ट, कथा) त्या चित्रपटाचे वय जाणवून देत नाही की त्या मुव्हीजचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण (सोप्या भाषेत सांगायचे तर दिग्दर्शन) त्या मुव्हीजला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper