मित्र-नातलगांसोबतची चॅटिंग ‘सेफ’बदल फक्त बिजनेस अकाऊंटसाठी नवी दिल्ली : वृत्तसंस्थानवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे व्हॉट्सअॅपवर जगभरातून टीका होत असल्याने कंपनीने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबीयांसोबत केलेल्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे, असे कंपनीने म्हटले आहे.व्हॉट्सअॅपने ट्विटसोबतच आपल्या ब्लॉगची …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार
आमदार महेश बालदी यांचा विश्वास उरण : वार्ताहरउरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, म्हातवली व नागावमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 11) मोठे नागाव येथील पोखरण मैदानात भव्य सभा झाली. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार, असा …
Read More »पनवेलच्या मिडलक्लास सोसायटी मैदानात लॉन टेनिस व बॅडमिंटन कोर्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबविणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात लॉन टेनिस व बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »मंत्री धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार
तरुणीची पोलिसांत धाव मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला असून, ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे, मात्र याबाबत कारवाई झाली नसल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.माझ्यावर 2006पासून अत्याचार सुरू होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा …
Read More »आत्मनिर्भर भारतासाठी पुढे या!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तरुणाईला आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 12) व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून दुसर्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात तरुणाईला मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून आत्मनिर्भर भारताची वाट तयार करण्यासाठी देशातील युवा पिढीने पुढे यायला हवे, असे आवाहन केले.पंतप्रधान मोदींनी म्हटले की, …
Read More »सुकापूर ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य अशोक पाटील, अनिता पाटील भाजपत दाखल
पनवेल : प्रतिनिधीपाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य अशोक पाटील आणि अनिता आत्माराम पाटील यांनी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 11) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे सुकापूरमध्ये ‘कमळा’चे खाते उघडले. पनवेल तालुक्यात 24 पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायती भाजपच्या निवडून येतील, असा विश्वास आमदार …
Read More »‘विरूष्का’च्या घरी आली ‘नन्ही परी’
नवी दिल्ली : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आई-बाबा बनले आहेत. अनुष्काने सोमवारी (दि. 11) दुपारी मुलीला जन्म दिला असून, विराटने ट्विट करीत ही आनंदाची बातमी सर्वांनाना सांगितली.‘आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी …
Read More »ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला दंड
दुबई : वृत्तसंस्थासिडनी येथे तिसर्या कसोटी सामन्यात पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे. तिसर्या दिवशी पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पेनवर कारवाई करण्यात आली आहे. सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात करण्याचा दंड पेनला करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन आंतरराष्ट्रीय …
Read More »सेहवागकडून पाँटिंग गुरुजी ट्रोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि समालोचक रिकी पाँटिंगला भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक नेटकर्यांनी पाँटिंगच्या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करीत टीकास्त्र सोडले. यामध्ये भारताचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर यांचाही समावेश आहे. चौथ्या डावात भारतीय फलंदाज 200 धावाही करू शकणार नाही, असे वक्तव्य पाँटिंगने …
Read More »चेतेश्वर पुजारा बनला सहा हजारी मनसबदार
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाबॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटीत सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. अशी कामगिरी करणारा पुजारा भारताचा 11वा फलंदाज ठरला आहे.तिसर्या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजाराने सहा हजार धावा पूर्ण केल्या. सिडनी कसोटीत पुजाराने निर्णायक क्षणी 77 धावांची खेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper