पनवेल : प्रतिनिधीभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्ह्यातील विविध सेलच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.भाजप उत्तर रायगड जिल्हा ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या संयोजकपदी सी. सी. भगत, सहकार सेलच्या जिल्हा संयोजकपदी कुंडलिक काटकर, प्रज्ञा प्रकोष्ठ जिल्हा संयोजकपदी डॉ. मयुरेश जोशी, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजकपदी अभिषेक पटवर्धन, कायदा सेल जिल्हा …
Read More »…तर महाराष्ट्राचेच नाव बदला!
अबू आझमींची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी’औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचे नाव बदलणे योग्य नाही. त्यामुळे विकास होणार नाही. बदलायचेच असेल तर आधी महाराष्ट्राचे नाव बदला,’ असे आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या भलताच गाजत आहे. …
Read More »पोसरीच्या माजी सरपंच सुनिता शीद भाजपमध्ये
पनवेल : पोसरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनिता शीद व त्यांचे पती कमलाकर शीद यांनी नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले. सोबत तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, सुनील माळी, डॉ. अविनाश गाताडे, शिवाजी माळी, …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग सुरूच
बेलवलीतील शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीपासून लागलेली गळती सुरूच असून, सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत अनेक सक्रिय कार्यकर्ते शेकापला राम राम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे पनवेल तालुक्यातील शेकापच्या अनेक कायर्कर्त्यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले आहे. या सर्वांचे …
Read More »सिद्धगड बलिदान दिनी हुतात्म्यांना अभिवादन
कर्जत : बातमीदारभारतीय स्वातंत्रलढ्याच्या इतिहासाचे सोनेरी पान आपल्या बलिदानाने लिहिणार्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या भारतमातेच्या दोन सुपुत्रांना शनिवारी (दि. 2) नेरळ येथील स्मारकात अभिवादन करण्यात आले. दरम्यान, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे होणारा बलिदान दिन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जतच्या कळंब येथून सिद्धगड येथे …
Read More »गणेश दर्शनाने नववर्षाची सुरुवात
महड, पाली येथे भाविकांनी साधला संकष्ट योग मोहोपाडा, पाली : प्रतिनिधीनववर्षाच्या प्रारंभी आलेल्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीचा योग साधत भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. त्यामुळे अष्टविनायकांपैकी असलेले महड येथील वरदविनायकाचे आणि पालीच्या बल्लाळेश्वराचे मंदिर शनिवारी (दि. 2) भाविकांनी फुलून गेल्याचे दिसून आले.कोरोना काळात मंदिरे बंद होती. आता राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे खुली …
Read More »26/11 मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला पाकमध्ये अटक
कराची : वृत्तसंस्था26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर जकी-उर-रहमान लखवी याला पाकिस्तानात अटक झाली आहे, मात्र या अटकेचा मुंबई हल्ल्याशी संबंध नाही.दहशतवाद्यांना मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर ही कारवाई करण्यात आली आहे. लखवीने हाफीज सईदसोबत मिळून 26/11 च्या हल्ल्याचा कट रचला होता.लखवीला मुंबई …
Read More »फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद
खोपोलीतील प्रकार; पालकांची शिक्षणाधिकार्यांकडे धाव खालापूर : प्रतिनिधीखोपोलीतील वसंत मेमोरियल स्कूलच्या इयत्ता सहावीतील 38 विद्यार्थ्यांना फी न भरल्याने शाळेने ऑनलाइन शिक्षण देणे बंद केले आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी खालापूर पंचायत समितीचे प्रभारी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब पोळ यांच्याकडे धाव घेत तक्रार केली आहे.विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी शैक्षणिक संस्थेला ऑनलाइन शिक्षण देण्याचे …
Read More »आताची शिवसेना ही बाळासाहेबांची राहिलेली नाही
औरंगाबादच्या नामांतरावरून मनसेने लगावला टोला मुंबई : प्रतिनिधीऔरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणात आता महाराष्ट्र नवननिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून त्याला थेट विरोध करण्यात आला आहे. त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते. आता मनसेनेही शिवसेनेची …
Read More »लसीकरणाची रंगीत तालीम
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लशीची ड्राय रन मुंबई : प्रतिनिधीकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. 2) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरू झालेे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांत ही रंगीत तालीम घेण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper