Breaking News

Ramprahar Reporters

नालासोपार्‍यात रेल्वेरूळावर आढळले तीन जणांचे मृतदेह

नालासोपारा : प्रतिनिधीपालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह रेल्वेरुळावर आढळून आले असून, 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसत आहे, असे पोलिसांनी म्हटलेय, तर मालगाडीसमोर चौघांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.नालासोपारा स्टेशनजवळ रेल्वेरूळावर शनिवारी (दि. 19) एका पुरुष व …

Read More »

आरएसएसचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचे निधन

नागपूर : प्रतिनिधीविचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांचे शनिवारी (दि. 19) दुपारी 3.30च्या सुमारास वाजता नागपूर येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.मा. गो. वैद्य यांनी 1966पासून पत्रकारिता सुरू केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध …

Read More »

भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचाही विश्वास

पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग मंडळाच्या (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंटस्ट्री ऑफ इंडिया-एएसएसओसीएचएएम) संमेलनात ते बोलत होते. कोरोना काळातही भारतात विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक झाली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.पंतप्रधान मोदी …

Read More »

प. बंगालमधील 11 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ममतादीदी, ही तर सुरुवात..निवडणुकीपर्यंत पक्षात एकट्याच राहाल : अमित शाह मेदिनीपूर (प. बंगाल) : वृत्तसंस्थापश्चिम बंगालच्या दौर्‍यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील 11 आमदारांनी तसेच एका माजी खासदाराने शनिवारी (दि. 19) भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या …

Read More »

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्थादुसर्‍या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण करणार्‍या भारतीय संघाचे आव्हान शनिवारी (दि. 19) तिसर्‍या दिवशी अवघ्या काही तासांमध्ये नाट्यमयरित्या संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने भारतावर आठ गडी राखून मात करीत चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक मार्‍यापुढे भारताचा दुसरा डाव …

Read More »

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सोनिया गांधी नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र मुंबई : प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतेच एक वर्ष झाले. असे असले तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा …

Read More »

अ‍ॅडलेड कसोटी रंगतदार अवस्थेत

भारताची भेदक गोलंदाजी; ‘कांगारूं’ना रोखले अ‍ॅडलेड : वृत्तसंस्थारविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 191 धावांवर रोखले. पहिल्या डावात भारतीय संघाने 53 धावांची आघाडी घेतली होती. दुसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाने एक गड्याच्या मोबदल्यात नऊ धावा केल्या आहेत. नाइट वॉचमन म्हणून आलेला बुमराह (0) …

Read More »

महिला सक्षमीकरणासाठी पनवेल मनपाचे मोठे पाऊल!

महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजना पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेने महिला सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल उचलले असून, महिला व मुलींसाठी खास 12 नवीन योजनांना शुक्रवारी (दि. 18) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे महिला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वास महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनी व्यक्त …

Read More »

‘…म्हणून विरोधकांना कृषी कायद्यांवरून पोटदुखी’

रायसेन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील रायसेन येथील शेतकरी संमेलनाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पुन्हा एकदा सुधारित कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले आहे. कृषी कायदे हे एका रात्रीत आलेले नाहीत, तर गेल्या 20 ते 22 वर्षांमध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने त्यावर व्यापक चर्चा केलेली आहे. आज देशातील सर्वच राजकीय …

Read More »

आणखी एका नेत्याचा ‘तृणमूल’ला राम राम

ममतांसमोर गळती रोखण्याचे आव्हान कोलकाता ः वृत्तसंस्थापश्चिम बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले नेते सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागील दोन दिवसांत तीन नेत्यांनी पक्ष सोडल्याने मुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे.ममता यांचे मंत्रिमंडळातील सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी नुकताच …

Read More »